Parama Ekadashi 2026 | Rare Ekadashi of Adhik Maas | Vrat, Puja Vidhi, Benefits & Parana Time
11 का 12 जुन परमा (दुर्लभ) एकादशी तिथी महत्व पूजाविधी लाभ उपाय काय करावे-काय करू नये?
परमा एकादशी 2026 | 100 यज्ञांचे पुण्य देणारी दुर्लभ एकादशी | व्रत, पूजा, उपाय, पारण वेळ
सनातन धर्मामध्ये परम एकादशीचे विशेष महत्व आहे. ही एकादशी फक्त अधिक मासमध्ये येते. म्हणूनच हिचे महत्व इतर एकादशीच्या तुलनेने जास्त आहे. अधिक मास मध्ये येणारी एकादशीला पुरुषोत्तम एकादशी किंवा कमला एकादशी असे सुद्धा म्हणतात. धार्मिक मान्यता अनुसार भगवान विष्णुची आराधना व व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती, मानसिक शांती व आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते. ह्या दिवशी व्रत ठवल्याने 100 यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. परम एकादशीही दुर्लभ व पवित्र एकादशी आहे.
अधिक मास मधील एकादशी 11 जून, 2026 गुरुवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. ही एकादशी अधिक मास मधील कृष्ण पक्ष मध्ये येते. ही अत्यंत दुर्लभ मानली जाते. कारणकी ती तीन वर्षातून एकदाच येते.
परमा एकादशी 2026 तिथि व वेळ:
•एकादशी: परमा (परम) एकादशी – 11 जून 2026
•एकादशी तिथि प्रारम्भ: 11 जून 2026 सकाळी 12:59 वाजता
•एकादशी तिथि समाप्त: 11 जून 2026 रात्रि 10:37 वाजता
• व्रत पारण: 12 जून 2026 सूर्योदय झाल्यावर
परम एकादशी म्हणजे काय?
अधिक मास मध्ये शुक्ल पक्ष मध्ये येणारी एकादशीला पद्मिनी एकादशी ह्या नावाने ओळखले जाते. तसेच अधिक मास मध्ये कृष्ण पक्ष मध्ये येणारी एकादशीला परम एकादशी किंवा कमला एकादशी संबोधले जाते. ही एकादशी अत्यंत पवित्र , दुर्लभ व आध्यात्मिक रुपानी फलदायी मानली जाते.
पुराणा नुसार अधिक मास भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे, म्हणूनच ह्या पवित्र महिन्यात साजरी केली जाणारी एकादशी महत्वाची आहे. परम एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील दुख दूर होतात व भगवान विष्णु ह्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
परम एकादशी आर्थिक समस्या, मानसिक तनाव, परिवारीक कलह किंवा जीवनातील सारख्या येणाऱ्या अडचणीचवव निराकरण करण्यासाठी लाभकारी मानली जाते. धार्मिक मान्यता अनुसार श्रद्धापूर्वक व्रत केल्याने सुख-समृद्धी व आध्यात्मिक विकास प्राप्त होतो.
परम एकादशीचे धार्मिक महत्व:
सनातन धर्ममध्ये परम एकादशीला मोक्ष प्रदान करणारी एकादशी मानले जाते. पद्म पुराण नुसार ह्या दिवशी उपवास करणे, प्रार्थना करणे, तपस्या करणे, दान देणे व भगवान विष्णुची पूजा केल्याने आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते.
अधिक मास असल्या कारणांनी ही एकादशी महत्वपूर्ण मानली जाते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या पवित्र दिवशी भगवान विष्णु ह्यांची पूजा केल्याने मागच्या जन्माचे पाप नष्ट होते व जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.
असे म्हणतात, की जे भक्त परमा एकादशीचे व्रत ठेवेल त्यांना भगवान विष्णु ह्यांचा आशीर्वाद, धन, समृद्धी, सुख, सफलता व मानसिक शांती प्राप्त होते. हे व्रत आध्यात्मिक विकास व मोक्ष प्राप्तीसाठी लाभकारी मानले जाते.
परम एकादशी व्रत पूजाविधी:
अधिक मास मधील कृष्ण पक्षची शुभ दशमी तिथीवर भक्तानि सकाळी लवकर उठून श्रद्धापूर्वक स्नान केले पाहिजे. दुपारी फक्त एक वेळा भोजन केले पाहिजे व रात्री जमिनीवर झोपले पाहिजे.
भगवान विष्णुह्यांची पूजा करताना धूप, भोग दाखवून भगवान विष्णु ह्यांची आराधना केली पाहिजे व रात्री जागून आराधना करून जाप केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीच्या दिवशी श्रद्धापूर्वक भगवान विष्णु ह्यांची आराधना केली पाहिजे. मग ब्राह्मण लोकांना भोजन दिले पाहिजे भोजन करताना परिवार किंवा नातेवाईक ह्यांच्याशी मौन ठेवले पाहिजे.
परम एकादशी काय केले पाहिजे?
भगवान विष्णु ह्यांचे ध्यान करावे व त्याची पूजा करावी
ॐ नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करावा
भगवान विष्णु ह्यांना तुळशी पत्र अर्पित करा
गरीब व जरूरतमंद लोकांना दान करा
सात्विक भोजन सेवन करा
भजन-कीर्तन करून रात्री जागरण करून नामस्मरण करावे
परम एकादशी काय करू नये?
तामसी भोजन सेवन करू नका
क्रोध व भांडण ह्या पासून दूर रहा
कोणाचा अपमान करू नये
नकारात्मक विचार व व्यवहार करू नका

परम एकादशी व्रत 12 जून 2026 सूर्योदयच्या नंतर समाप्त होईल. धार्मिक मान्यता अनुसार द्वादशी तिथी ला व्रत विधीपूर्वक संपन्न केल्यास व्रताचा पूर्ण लाभ प्राप्त होईल.
व्रताची समाप्ती नेहमी सात्विक भोजन करून मगच करावी असे म्हणतात की उचित पारण वेळ पाळल्यास भगवान विष्णु ह्यांची विशेष कृपा प्राप्त होते तसेच व्रताचे आध्यात्मिक पुण्य राखण्यासाठी मदत मिळते.
परमा एकादशी व्रत लाभ:
भक्तांना भगवान विष्णु ह्यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील
पाप व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मदत करते.
आर्थिक समस्या कमी होतात.
मानसिक शांती व सकारात्मकतामध्ये वृद्धी मिळते.
परिवारात सुख-समृद्धीचे आगमन होते
आध्यात्मिक विकास व मुक्तीचा मार्ग मोकळा होतो.
जीवनात येणाऱ्या बाधा व अडचणी दूर होण्यास मदत होते.
परमा एकादशीच्या दिवशी आर्थिक लाभ मिळण्यासाठी पुढे दिलेले उपाय करा:
1. भगवान विष्णु ह्यांना एकादशी तिथी खूप प्रिय आहे. धार्मिक मान्यता अनुसार परम एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपा जवळ तुपाचा दिवा लावावा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व धन लाभ होण्याचा योग बनतो.
2. परम एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला खीरचा भोग दाखवून प्रसाद लोकांना वाटावा असे केल्याने माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांनी कृपा प्राप्त होते.
3. परम एकादशी च्या दिवशी पूजेच्या वेळी पिवळे वस्त्रमध्ये 11 कवड्या किंवा नाणी बांधून माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांच्या समोर ठेवावे, मग जेथे आपण धन ठेवतो तेथे किंवा तिजोरी मध्ये ठेवावे असे केल्याने धन स्थितिमध्ये सुधार होतो व आर्थिक तंगी दूर होते.
4. एकादशीच्या अधल्या दिवशी सात्विक भोजन करून ब्रम्हचाऱ्याचे पालन करावे, एकादशीचे व्रत करून द्वादशीच्या दिवशी व्रत सोडावे. जर आपली काळी मनोकामना असेलतर हातात जल घेऊन संकल्प करून आपली मनोकामना सांगून जल सोडावे.
5. भगवान विष्णु ह्यांची 1000 नावे घेऊन भगवान विष्णु ह्यांच्या वर एक एक फूल अर्पित करावे त्याच बरोबर श्री यंत्राची पूजा करावी.
