6 January 2026 Angarki Chaturthi Tithi Mahatva Katha Ke Labh In Marathi

Angarki Chaturthi
6 January 2026 Angarki Chaturthi Tithi Mahatva Katha Ke Labh

6 जानेवारी 2026 अंगारकी चतुर्थी तिथी, पूजाविधी, महत्व, कथा व व्रत लाभ

6 January 2026 Angarki Chaturthi Tithi Mahatva Katha Ke Labh In Marathi

अंगारकी चतुर्थी चांगली वेळ: दुपारी 12:40 ते दुपारी 2:02 पर्यन्त
राहू काल: दुपारी 3:24 ते संध्याकाळी 4:46 पर्यन्त
संकट काल: सकाळी 9:56 ते 11:18 पर्यन्त

अंगारकी चतुर्थी तिथी:
6 जानेवारी 2026 सकाळी 8:01 प्रारंभ
7 जानेवारी 2026 सकाळी 6:52 मिनिट पर्यन्त समाप्ती
अंगारकी चतुर्थी चंद्रोदय: 6 जानेवारी मंगळवार रात्री 9:16 मिनिट

अंगारकी चतुर्थीची माहिती:
अंगारकी चतुर्थी हा दिवस हिंदू लोकांचा शुभ दिवस मानला जातो. जेव्हा संकष्टी चतुर्थी (कृष्ण पक्ष चतुर्थी) मावळत्या चंद्राचा चौथा दिवस मंगळवार येतो तेव्हा गणेश भक्त भगवान गणेश ह्यांचे व्रत ठेवतात. त्याच दिवसाला अंगारकी चतुर्थी ह्या नावांनी ओळखले जाते.

अंगारकी चतुर्थी ही नेहमी मंगळवार ह्या दिवशी येते महाराष्ट्रामध्ये गणेश भक्त विशेष रुपानी व्रत ठेवून हा दिवस साजरा करतात. महाराष्ट्रामध्ये ह्या दिवशी गणेश मंदीरामध्ये विशेष पूजा अर्चा केली जाते.

अंगारकी चतुर्थी महत्व:
संस्कृत भाषेमध्ये “अंगारकी” ह्याचा अर्थ लाल रंगाचा जळलेला कोळसा असा होतो. गणेश पुराण व स्मृति कौस्तुभ मध्ये सारख्या वैदिक ग्रंथामध्ये अंगारकी चतुर्थीचे महत्व सांगितले आहे. अंगारकी चतुर्थी हा दिवश मुक्तीचा दिवस आहे व ह्या दिवशी पूजा अर्चा केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेश भगवान ह्यांचे व्रत ठेवल्याने सर्व समस्या दूर होऊन आपले जीवन सुखमय जाते.

अंगारकी चतुर्थीही दर सहा महिन्यांनी एकदा येते. त्यामुळे ह्यादिवशी बुद्धीचे देवता स्वामी भगवान गणेश ह्यांची विशेष पूजा अर्चा केली जाते त्यामुळे आपल्याला जीवनात सुख-समृद्धी व शांती मिळून भगवान गणेश ह्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

अंगारकी चतुर्थीची विशेष पौराणिक कथा:
गणेश पुराण मधील उपासना खंड (वेदांमधील तीन भागा पैकी एक) नुसार, देवी पृथ्वीने ऋषि भारद्वाजचे पुत्र मंगल ह्यांचा 7 वर्षा पर्यन्त पालन पोषण करून मग त्याचा वडिलांकडे सुपूर्त केले होते. त्या लहान मुलानी आपल्या वडिलांकडून वेद पुराणचे अध्यायन केले. त्या लहान मुलानी भगवान गणेश ह्यांच्या बदल श्रद्धा दाखवली व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तपस्या केली. ऋषि भरद्वाज ह्यांनी त्याला गणेश मंत्र शिकवले व भगवान गणेश ह्यांची साधना करण्यासाठी पाठवले.

त्या लहान मुलानी भगवान गणेश ह्यांची बरेच वर्ष श्रद्धा पूर्वक प्रार्थना केली व माघ कृष्ण पक्ष चतुर्थी च्या दिवशी गणेश जीनचे विश्वरूप दर्शन करवून आशीर्वाद दिला. भगवान गणेश ह्यांनी त्या मुलाला कोणते सुद्धा वरदान माग असे सांगितले. कारण ते त्या मुलाच्या भक्तिनी प्रसन्न झाले होते. तर त्या मुलानी उत्तर दिले “हे प्रभू मी स्वर्गामध्ये सर्व देवता बरोबर अमृतपान करावे अशी इच्छा व्यक्त करतो.”

माझ नाव मंगला हे तिन्ही लोकांत प्रसिद्ध व्हावे. कारण की मी तुम्हाला माघ कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या दिवशी पाहिले होते. म्हणून हा दिवश खूप विशेष आहे. म्हणून ह्या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

अंगारकी चतुर्थी व्रत विधि (उपवास):
अंगारकी चतुर्थी ह्या दिवशी भक्त सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान गणेश ह्यांची पूजा आराधना करून त्यांचे आवडतीचे मोदक नेवेद्य म्हणून दाखवतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेश भगवान ह्यांना हळद-कुंकू, अक्षता, फूल व 21 दूर्वा अर्पण करून गणेशजीनची आरती म्हणावी.

अंगारकी चतुर्थी ह्यादिवशी भक्त सूर्योदय पासून चंद्र दर्शन पर्यन्त व्रत ठेवतात मग चंद्र दर्शन झाल्यावर भोग दाखवून व्रत सोडतात. चंद्राची पूजा करताना चंदन पेस्ट, अक्षता व फूल अर्पित करून भगवान चंद्र ह्यांची पूजा करतात.

अंगारकी चतुर्थी ह्यादिवशी काही भक्त फळ, दूध किंवा साबूदाणा खिचडी खाऊन उपवास करतात. अंगारकी चतुर्थी ह्यादिवशी भक्त गणेश जीनचे भजन किंवा ‘गणपति अथर्वशीर्ष’ म्हणतात. ह्या दिवशी दारू, धूम्रपान किंवा नॉनव्हेज खाणे वर्ज आहे.

Angarki Chaturthi
6 January 2026 Angarki Chaturthi Tithi Mahatva Katha Ke Labh

अंगारकी चतुर्थी व्रत करण्याचे लाभ:
अंगारकी चतुर्थी व्रत ठेवणे व भगवान गणेश ह्यांची आराधना केल्याने पुढील लाभ प्राप्त होतात.
* आपल्या जन्म कुंडलीमध्ये जर मंगळ हा ग्रह दूषित असेल किंवा विवाहिक जीवनात बाधा आणणारा असेलतर अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने दोष दूर होतो.
* अंगारकी चतुर्थीचा उपवास हा हिंदू पंचांग नुसार प्रतेक चंद्र मास कृष्ण पक्ष च्या चौथ्या दिवशी जी चतुर्थी तिथी येते त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी म्हंटले जाते. व हा दिवस खूप शुभ मानला जातो.
* अंगारकी चतुर्थी च्या दिवशी उपवास केल्याने सुख, चांगले स्वास्थ व समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
* आपल्या जन्म कुंडली मधील मंगळ जर अशुभ स्थिति उत्पन्न करणारा असेलतर आर्थिक, पारिवारीक, स्वास्थ व विवाहिक समस्या पासून मुक्ती मिळू शकते.
* आपल्या जीवनातील सर्व बाधा दूर होऊन बुद्धिमत्ता वाढते.
* आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन सर्व कार्यामध्ये सफलता प्राप्त होते. पापा पासून मुक्ती मिळते.
* आपल्याला जर चतुर्थीचे व्रत करायचे असेलतर आपण अंगारकी चतुर्थी पासून आपले व्रत चतुर्थीचे व्रत सुरू करू शकता.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.