13 January Bhogi Pongal 2026 Tithi Sampurn Mahiti In Marathi
13 जानेवरी 2026 भोगी मकर संक्रांतीच्या अगोदरचा महत्वाचा दिवस संपूर्ण माहिती
13 जानेवारी 2026 मंगळवार ह्या दिवशी भोगी हा दिवस साजरा करायचा आहे. दक्षिण भारतात हा 4 दिवस सण पोंगल म्हणून साजरा करतात. कृतज्ञता कहा दिवस म्हणून परिवाराचे मिलन म्हणून साजरा करावा. ह्या सणाला हिरवी गार शेत चा सन्मान करतात त्याच बरोबर शुद्धी करणाला जास्त जोर दिला जातो. सांस्कृतिक परंपरांवर जास्त लक्ष दिले जाते. म्हणजेच येणारे नवीन वर्ष चांगले जावो व घरातील नकरात्मकता दूर होऊन सकारात्मकता येतो.
दक्षिण भागात 13 जानेवारी 2026 सकाळी सूर्य किरणाची पहिली गरम किरणे अंगावर घेण्यासाठी लोक बाहेर पडतात. भोगी सणबरोबर पोंगल चा पण शुभरंभ होतो. ह्या दिवसापासून 4 दिवस खूप भव्य उत्सव साजरा करतात. त्यातील बहुतेक भाग तामिळनाडू, आंध्रप्रदेश व तेलंगणा मध्ये साजरा करतात. हा दिवस म्हणजे फक्त कॅलेंडर मधील फक्त एक दिवस नसून खूप शुभ, उल्हास निर्माण करणारा दिवस आहे.
पोंगल हा सण पीक कापण्याचा सण व भोगीचा दिवस, कृतज्ञता, व पारिवारीक बंधन व शुद्धताचा प्रतीक असणार दिवस आहे. ह्या दिवशी मागील वर्षातील कटू आठवणी, दुशमनी सोडून नवीन सकारात्मक ऊर्जा आणणारा दिवस आहे. भोगीची अग्नि जुने कपडे, लाकड व अजून काही सामाना पासून केली जाते. त्यामध्ये नवीन वर्षाचे स्वागत करायचे असते. वातावरण, अगरबत्ती, फुलांचा सुगंध व पारिवारीक मिलन च्या उबेने भरून जातो. त्यामध्ये भरपूर पिकांचा सन्मान व भविष्यसाठी आशीर्वाद मिळण्यासाठी केला जातो. ह्या दिवशी संगीत, नृत्य व परिवारीक भोजन केले जाते.
तिथि व महत्व:
13 जानेवारी मंगळवारी भोगी हा सण साजरा करायचा आहे. हा दिवस भगवान इन्द्र ह्यांना समर्पित आहे. त्यांचा आपल्या शेतातील पिकासाठी आशीर्वाद घेतला जातो.
भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्नान करताना पाण्यात थोडेसे तीळ घालावे. घर साफ करून घरच्या समोर रंगोली काढावी.
जानेवारी महिन्यात शेतात चांगल्या बऱ्याच प्रकारच्या भाज्या पिकतात. त्यामुळे भोगीच्या दिवशी मिश्र भाजी व बाजरीची तिळाची भाकरी बनवतात, असे म्हणतात की भोगीच्या दिवशी जो न खाई भोगी तो होई रोगी अशी म्हण आहे. म्हणून भोगी च्या दिवशी आवर्जून भोगीची भाकरी बनवतात.
आता आपण पाहू या भोगीची भाजी कशी बनवायची:
साहीत्य:
पाव किलो प्रतेकी वांगी, गाजर, वालपापडी
2 शेवगा शेगा, 1 बटाटा, 1 वाटी पावटा दाणे, 1वाटी मटार दाणे
1 मोठा कांदा (चिरून), 2 टी स्पून लाल मिरची पावडर
2 टी स्पून काळा मसाला, 2 टे स्पून तीळ (भाजून) कुट
2 टे स्पून सुके खोबरे कीस भाजून कुट
2 टे स्पून चिंच कोळ, मीठ व गूळ चवीने
फोडणी करीता: 2 डाव तेल, 1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे, 1/4 टी स्पून हिंग
1/2 टी स्पून हळद, 6-7 लसूण (ठेचून)

कृती: प्रथम सर्व भाज्या धुवून घ्या. वांग्याचे देठ कापून मोठे तुकडे करावेत. गाजराचे साल काढून त्याचे तुकडे करावेत. वालपापडी सोलून चिरून घ्या. शेवगा शेगा सोलून चीतून घ्या. कांदा बारीक चिरावा.
जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे,लसूण, हिंग, हळद घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
कांदा परतून झालकी त्यामध्ये चीरलेल्या वांग्याच्या फोडी, गाजराचे तुकडे, चिरलेली वालपापडी, शेवगा, बटाटे, मटार, पावटा घालून मिक्स करावे. पातेल्यावर झाकण ठेवून झाकणात पाणी घालून वाफेवर भाजी शीजवावी.
भाजी वाफेवर शिजल्यावर त्यामध्ये तिलकूट, खोबर्याचा कूट, लाल मिरची पावडर, मीठ, गूळ, काळा मसाला व दोन कप पाणी घालून भाजी चांगली शीजू द्यावी.
गरम गरम भाजी तिळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
