Dev Diwali 2025 Tithi, Shubh Muhurt, Shubh Yog Full Information In Marathi
देव दिवाळी, त्रिपुरी पूर्णिमा 2025 महत्व, तिथी,शुभ मुहूर्त,शुभयोग कोणते? व काय करावे?
देव दिवाळी ह्या वर्षी 5 नोव्हेंबर 2025 बुधवार ह्या दिवशी आहे. सनातन धर्मानुसार कार्तिक अमावस्या ह्या दिवशी दिवाळी साजरी करतात तर कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी देव दिवाळी साजरी करतात. जी माता लक्ष्मी व भगवान गणेश ह्यांना समर्पित आहे.कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी सर्व देव पृथ्वीवर येतात. ह्या वर्षी 5 नोव्हेंबर 2025 बुधवार संध्याकाळी 5:15 मिनिट पासून 7:50 मिनिट पर्यन्त शिववास योग आहे हा शुभ संयोग आहे. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यास सुख व सौभाग्यमध्ये वृद्धी होते.
दरवर्षी कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी देव दिवाळी साजरी करतात. ह्या शुभ दिवशी सर्व देव पृथ्वीवर दिवाळी साजरी करण्यासाठी येतात. सनातन शास्त्र नुसार कार्तिक पूर्णिमा पुण्यकारी तिथी आहे ह्या तिथीला देवांचे देव महादेव ह्यांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. व सर्व देवांनी भगवान शिव ह्यांची पूजा केली होती. म्हणून कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी दिवाळी साजरी करतात. चला तर मग पाहू या तिथी व शुभ मुहूर्त कोणता आहे.
देव दीपावली मुहूर्त (Dev Deepawali muhurat 2025)
वैदिक पंचांग अनुसार कार्तिक महिन्यात पूर्णिमा तिथी 4 नोव्हेंबर रात्री 10 वाजून 36 मिनिट नी सुरू होत असून 5 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिट पर्यन्त आहे.
देव दीपावली 2025 पूजा वेळ:
कार्तिक महिन्यातील पूर्णिमा तिथी 5 नोव्हेंबर ह्या दिवशी पूजा व आरती संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिट पासून 7 वाजून 50 मिनिट पर्यन्त आहे. ह्या वेळी गंगा आरती व दीपदान केले पाहिजे.
शुभ योग:
ज्योतिष शास्त्रा नुसार देव दिवाळी ह्या दिवशी शिववास योग हा मंगलकारी संयोग आहे. ह्या शुभ योग वेळी शिव-शक्तिची पूजा केल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात.
भद्रावास योग:
देव दिवाळी ह्या दिवशी भद्रवास योग सकाळी 8 वाजून 44 मिनिट पर्यन्त आहे. ह्या वेळी भद्रा स्वर्ग लोकमध्ये राहतात. शास्त्रा नुसार असे म्हणतात की भद्रा जर ह्या वेळी पाताळ व स्वर्ग लोक मध्ये राहिले तर पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांचे कल्याण होते. ज्योतिष भद्रावास योग शुभ मानला जातो. ह्या योग मध्ये भगवान शिव ह्यांची पूजा केल्याने सुख व सौभाग्यमध्ये वृद्धी होते. त्याच बरोबर सर्व दुख व संकट दूर होतात.
शिववास योग:
ज्योतिष शास्त्रा नुसार देव दिवाळीच्या दिवशी शिववास योग हा मंगलकारी संयोग आहे. ह्या योग संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिट पासून सुरू होत आहे. ह्या योग मध्ये शिव-शक्तिची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच बरोबर घरात सुख समृद्धी व आनंद येतो.
करण:
देव दिवाळी ह्या दिवशी करण चा संयोग येत आहे. करण चा संयोग संध्याकाळी 8 वाजून 44 मिनिट पर्यन्त आहे. मग बालव करण योग आहे. ह्या योग मध्ये शिव शक्तिची पूजा केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात.

कार्तिक पूर्णिमा हयादीवशी गंगा स्नानचे महत्व:
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी गंगा स्नान करणे खूप पवित्र मानले जाते. सूर्योदय होण्याच्या पूर्वी उठून गंगा, गोदावरी किंवा यमुना नदीमध्ये स्नान केल्याने आत्मा शुद्ध होऊन सर्व पापा पासून मुक्ती मिळते. ज्याना तीर्थ स्थळी जाणे शक्य नाही त्यांनी घरीच विष्णु व भगवान शिव ह्यांचा मंत्र जाप करत स्नान करावे.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने 1000 अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. त्यादिवशी गंगा नदीच्या किनारी हजारो दिवे लावले जातात. ह्या दिवशी दान करणे महत्वाचे मानले जाते. त्यामुळे पुण्य मिळते.
कार्तिक पूर्णिमा अनुष्ठान:
– सूर्योदय पूर्वी उठून स्नान (गंगा स्नान)करावे
– उपवास व भगवान विष्णु व शिवची पूजा
– मंदिर, घर व जलाशय मध्ये दिवे लावावे
– तुलसी विवाह करा
– देवांना भोग, फळ, फूल व मिठाई अर्पित करा
– ब्राह्मणों और गरीबों को दान और भोजन दान।