कुनाफा अविस्मरणीय स्वीट डेझर्ट एकदा बनवा सगळे आवडीने खातील
Arabian Kunafa Sweet Dessert In Indian Style In Marathi
कुनाफा डेझर्ट ही डिश अरेबियन डिश आहे. कुनाफा डेझर्ट हे शेवया पासून बनवले जाते. कुनाफा डेझर्ट हे खूप छान टेस्टि लागते. आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो.
कुनाफा बनवायला अगदी सोपे आहे तसेच झटपट होणारे आहे. तसेच दियासायाल सुद्धा आकर्षक आहे.
साहित्य:
2 कप दूध
2 टे स्पून कस्टर्ड पावडर
1 टे स्पून कॉर्नफ्लोर
2 टे स्पून साखर
2-3 ड्रॉपस व्हनीला एसेन्स
ड्रायफ्रूटस व गुलाबाच्या पाकळ्या सजावटी करिता
100 ग्राम बारीक शेवया
1 टे स्पून तूप
2 टे स्पून पिठीसाखर
1 टी स्पून वेलची पावडर

कृती: एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा. एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोर, कस्टर्ड व 1/2 कप दूध मिक्स करून बाजूला ठेवा. ड्रायफ्रूटचे तुकडे करून बाजूला ठेवा.
एका नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शेवया 2 मिनिट भाजून घ्या, मग त्यामध्ये 2 टे स्पून पाणी घालून मिक्स करून घेऊन पिठीसाखर व वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊन बाजूला ठेवा.
दूध गरम झालेकी त्यामध्ये साखर घालून विरघळलिकी त्यामध्ये कॉर्नफ्लोर व कस्टर्डचे मिश्रण घालून मिक्स करून मंद विस्तवावर थोडे घट्टसर होई पर्यन्त गरम करून घ्या. मिश्रण घट्ट झाले की थंड करायला बाजूला ठेवा.
आता शेवयाचे 3 भाग करा. एक ट्रे घेऊन प्रथम शेवयाचा थर देवून त्यावर निम्मे कस्टर्डचे मिश्रण घालून त्यावर परत शेवयांचा थर देऊन परत राहिलेले कस्टर्ड घालून परत त्यावर राहिलेला तिसरा शेवयांचा थर देवून त्यावर ड्रायफ्रूटने सजवून गुलाबाच्या पाकळ्या घाला.
आता 2-3 तास डेझर्ट फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. मग थंडगार डेझर्ट सर्व्ह करा.