Cooking tips: 15 Amazing Cooking Hacks With Cleaning And Cooking In Marathi
कूकिंग टिप्स: किचनचे काम होईल सोपे जेव्हा 15 अमेझिंग कुकिंग हैक्स, साफ सफाई बरोबर स्वयंपाक होईल झटपट
15 कूकिंग टिप्स: आपण संपूर्ण दिवसातील 1/4 दिवस तरी किचन मध्ये असून निरनिराळे पदार्थ बनवत असतो व नंतर साफ सफाई करीत असतो. ही सर्व कामे करण्यासाठी बराच वेळ जातो. तर काही काम अशी असतात की त्या कामाला खूप वेळ जातो किंवा त्रास सुद्धा होतो. अशीच काही काम आहेत ती कमी वेळात करता येतील.
आता आपण 15 कुकिंग व किचन टिप्स आहेत त्या आपण आचरणात आणल्या तर वेळ व त्रास कमी होऊ शकतो.
किचनमध्ये बरीच काम असतात, काही काम सोपी व काही मुश्किल असतात. आपण काही काम वेळ मिळेल तसा करतो. आपण नेहमी भाजी कापतो त्याच बरोबर किचनची सफाई करतो. आज मी आपल्याला काही अश्या किचन टिप्स सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला काम लवकर संपवून रिकामा वेळ मिळेल.
15 अगदी सोप्या कुकिंग टिप्स:
1. बरेच वेळा आपण भाजी बनवताना दही वापरतो व ते फुटते म्हणजे खराब होते तर जेव्हा पान आपण ग्रेवीची भाजी बनवाल तेव्हा विस्तव मिडियम आचवर ठेवून उकळी आलीकी मग मीठ घाला, असे केल्याने दही फाटणार नाही व भाजी स्वादिष्ट बनेल.
2. आपण लिंबुचा वापर केल्यावर साल फेकून देत असाल, तर साल टाकून न देता ती थोडे मीठ लावून उन्हात ठेवा. मग काही दिवसांनंतर त्या लिंबाच्या सालीचे शिजवून लोणचे घालू शकता.
3. आपण जेव्हा स्वयंपाकाचे काम पूर्ण करतो मग किचन ओटा साफ करावा लागतो नाहीतर मुंग्या, माशा किंवा झुरळ होऊ शकतात.
4. बऱ्याच लोकांना नाश्तासाठी पोहे खाणे आवडते. बरेच वेळ पोहे बनवण्याच्या अगोदर पोहे भिजवलेकी चिकट होतात तर काय करायचे पोहे धुतले की त्याला लिंबुरस लाऊन ठेवा. असे केल्याने पोहे मोकळे होतात चिटकट नाही.
5. कच्चे केळे उकडून घेताना ते काळे पडते तर आपण उकडून घेताना थोडेसे मीठ व हळद घालून केळे उकडतान घालावे मग केळे काळे पडणार नाही.
6. आपण चपाती बनवताना बरेच वेळा तव्यावर चिटकते मग ती फुलत नाही. तर मग काय करायचे तवा गरम करायला ठेवला की त्यावर मीठ शिंपडायचे मग पुसून घ्यायचे असे केल्याने तव्यावर चपाती चटकात नाही व छान फुलते.
7. काही लोक केळी फ्रीजमध्ये ठेवतात त्यामुळे ती लवकर खराब होतात. खर म्हणजे केले नॉर्मल वातावरणात चांगले राहते. फ्रीजमध्ये लवकर खराब होते.
8. किचन ओटा साफ करताना पाण्यात थोडे मीठ घालून पुसा त्यामुळे ओट्यावर किडे, मकोडे, माशा, मुंग्या येत नाहीत व पॉजिटिव एनर्जि येते.
9. आपण कांदा कापतो तेव्हा डोळ्यातून पाणी येते तर काय करायचे कांद्याचे साल काढून कांदा थोडा वेळ पाण्यात ठेवा. मग कट करायला घ्या डोळ्यातून पाणी येणार नाही.

10. आपण सण, पार्टी किंवा उपवास असेल त्यादिवशी पुऱ्या बनवतो, पण गडबडीत सोफ व खुशखुशीत पुरी बनत नाही तर पुरीसाठी पीठ भिजवताना पिठामध्ये एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ मिक्स करा, असे केल्याने पुऱ्या छान होतात. तसेच पुरीचे पीठ भिजवताना चांगले घट्ट मळावे. म्हणजे पुरीचा आकार छान गोल येतो व तळताना तिचा आकार बदलत नाही.
11. आपण भेंडी आणतो मग ती फ्रीज मध्ये ठेवलीकी विसरली जाते मग ती सुकते तर काय करायचे भेंडी वर थोडेसे मोहरीचे तेल लावले तर ती जास्त दिवस ताजी राहते.
12. मेथीची भाजी कडवट असते, तर तिचा कडवट पणा कमी करण्यासाठी त्यावर थोडेसे मीठ शिंपडुन ठेवा काही वेळांनी तिचा कडवट पणा कमी होईल.
13. इडली सॉफ्ट बनण्यासाठी जेव्हा आपण उडीद डाळ व तांदूळ भिजत घालतो तेव्हा त्यामध्ये साबूदाणा घाला मग वाटून ठेवा, असे केल्याने इडली खूप सॉफ्ट बनते.
14. लाल मिरची पावडर 1 महिन्यात खराब व्हायला लागतो. त्यामध्ये दमट पणा यायला लागतो तर काय करायचे त्यामध्ये एक हिंगाचा तुकडा ठेवायचा. लाल मिरची पावडर खराब होत नाही.
15. माइक्रोवेव मध्ये भात किंवा भाजी लवकर गरम होत नाही तर काय करायचे एक प्लेट घेऊन त्यामध्ये भात पसरवून मध्य भागी थोडी जागा सोडायची म्हणजे भात किंवा भाजी लवकर गरम होईल.