Budhwar Karavyache Upay Pratek Kamat Milel Safalta In Marathi
बुधवारच्या दिवशी करा सटीक उपाय प्रतेक कामात मिळेल सफलता (धन,संपत्ति, वास्तुदोष,व्यापार वृद्धी,कृपा)
बुधवार हा दिवस श्री भगवान गणेशजी ह्यांना समर्पित आहे. बुधवार ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा केली जाते. त्यामुळे भगवान गणेश प्रसन्न होतात. बुधवारी भगवान गणेश ह्यांना दूर्वा अर्पित करणे खूप शुभ मानले जाते.
हिंदू धर्मामध्ये बुधवार हा दिवस भगवान गणेश ह्याचा आहे. आपल्या येथे प्रतेक मंगल कार्यमध्ये प्रथम गणेश भगवान ह्यांची पूजा केली जाते. त्यांची पूजा झाल्यावर मगच पुढील मंगल कार्याला सुरवात केली जाते. त्याच बरोबर भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा केल्याने घरात सुख-समृद्धी व शुभता येते. बुधवार ह्या दिवशी काही उपाय केले तर प्रतेक कामात सफलता मिळते. चला तर मग जाणून घेऊया कोणते उपाय आहेत.
बुधवार ह्या दिवशी करा ही सटीक उपाय:
बुधवार ह्या दिवशी गणेश मंदीरामध्ये जाऊन गणेश जिना गुळाचा भोग दाखवा. असे केल्याने भगवान गणेश बरोबर माता लक्ष्मीपण प्रसन्न होते. त्यामुळे घरामध्ये कधी सुद्धा धन व अन्नची कमतरता होत नाही.
बुधवार ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांना 21 दूर्वा वाहिल्या पाहिजेत. असे केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात.
बुधवार ह्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घातला पाहिजे. त्यामुळे कृपा मिळून आर्थिक स्थिति सुद्धा सुधारेल व जीवनातील सर्व समस्या पासून मुक्ती मिळेल.
बुधवार ह्या दिवशी माता दुर्गाची सुद्धा पूजा केली पाहिजे, त्याच बरोबर बुध दोष मुक्तीसाठी ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे‘ ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करावा.
बुधवार ह्या दिवशी श्री गणेश ह्यांना सिंदूर अर्पित केला पाहिजे. त्यामुळे आपल्या प्रतेक कामात सफलता मिळेल.
बुधवार ह्या दिवशी आपल्या करंगळीच्या बोटात पन्ना घातला पाहिजे. असे केल्याने कुंडली मधील बुध ग्रह स्थिति कमजोर असेलतर मजबूत होईल. जर पन्ना घालायचा असेलतर ज्योतिषीचा सल्ला घ्या.
बुधवार ह्या दिवशी ‘ॐ गं गणपतये नम:’ किंवा ‘श्री गणेशाय नम:’ ह्या मंत्राचा जाप करा. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व परेशानी दूर होतील.
आपल्या कुंडली मधील बुध ग्रह कमजोर असेलतर बुधवार ह्या दिवशी जरूरत मंद व्यक्तिला हिरवे मुग किंवा हिरवा कपडा दान करावा. त्यामुळे लाभ होतात.
आपण जर पैशाच्या तंगी पासून परेशान आहात व त्यापासून मुक्ती पाहिजे असेलतर बुधवार ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची पूजा करा व पूजा करतेवेळी उसचा रसानी भगवान गणेश ह्यांना अभिषेक करा. असे म्हणतात की असे केल्याने भगवान गणेश लगेच प्रसन्न होतात.

आपणाला जर भगवान गणेश ह्यांना प्रसन्न करायचे असेलतर बुधवार ह्या दिवशी पूजा करताना शमी च्या झाडाची पाने व विडयाची पाने अर्पित करा. ही दोन्ही पाने अर्पित करताना ‘ॐ गं गणपतये नम:’ या ‘श्री गणेशाय नम:’ ह्या मंत्राचा जाप करावा.
घरातील वास्तु दोष पासून मुक्ती पाहिजे असेलतर बुधवार ह्या दिवशी स्नान-ध्यान च्या नंतर भगवान श्री कृष्णला बासरी अर्पित करून उत्तर दिशेला असणाऱ्या खोलीत ठेवा. असे केल्याने घरातील वास्तु दोष दूर होईल.
आपल्याला जर आर्थिक तंगी पासून मुक्ती पाहिजे असेलतर बुधवार ह्या दिवशी भक्ति भावाने भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा करून पूजेच्या वेळी भगवान गणेश ह्यांना दूर्वा व मोदक अर्पित करा हा उपाय केल्याने धन संबधित सर्व परेशानी दूर होतील.
आपल्याला जर आपल्या व्यवसायात उन्नती व नफा पाहिजे असेलतर बुधवार ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांना पूजेमध्ये 11 किंवा 21 दूर्वा अर्पित करा. दूर्वा अर्पित करताना भगवान गणेश ह्यांची स्तुति करा. हा उपाय केल्याने व्यापारात सफलता मिळेल.
भगवान गणेश ह्यांची कृपा मिळण्यासाठी बुधवार ह्या दिवशी पूजा झाल्यावर मका, गहू,बाजरी , तांदूळ व हिरवी भाजी, हिरवी फळे दान केली पाहिजेत. असे केल्याने बुध देवाची व गणेश भगवान ह्यांची कृपा मिळेल.