Wheat Flour+Potato Healthy Nashta For Kids Tiffin In Marathi
गव्हाचे पीठ + बटाटा हेल्दी नाश्ता मुलांच्या डब्यासाठी इडली डोसा विसरून जाल करून पहा
मुलांच्या साठी रोज रोज काय नाश्ता बनवायचा ते सुद्धा हेल्दी हा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. आज आपण बटाटा वापरुन एक मस्त नाश्ता बनवणार आहोत, त्यासाठी आपण गव्हाचे पीठ वापरणार आहोत, नाश्ता बनवताना मी बटाटा,कांदा, टोमॅटो वापरला आहे, जर आपल्याला पाहिजे तर आपण गाजर शिमला मिरची किंवा कोथिंबीर च्या आवयजि पालक सुद्धा वापरू शकता.
साहित्य:
2 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
1 छोटा कांदा (चिरून)
1 छोटासा टोमॅटो (चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
2 टे स्पून बेसन
2 टे स्पून गव्हाचे पीठ
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
1 टे स्पून पाणी
मीठ चवीने
तेल शालो फ्राय करण्यासाठी

कृती: प्रथम बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची चिरून घ्या.
एका बाउलमध्ये किसलेले बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून, लाल मिरची पावडर, हळद, चिलीफ्लेस्क, बेसन, गव्हाचे पीठ व मीठ घालून मिक्स करून एक टे स्पून पाणी घालून परत चांगले मळून घ्या.
आता मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून त्याला गोल किंवा लांबट किंवा बदामा सारखा आकार द्या.
नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवा त्यावर थोडेसे तेल घालून बनवलेले बटाट्याचे गोळे ठेवून बाजूनी तेल सोडा, मग मध्यम विस्तवावर दोन्ही बाजूनी छान क्रिस्पि भाजून घ्या.
आता गरम गरम नाश्ता टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.