Sarva Pitru Amavasya 2025 Full Information In Marathi
सर्व पितृ अमावस्या, पितृ ना खुश करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवा स्नान-दान मुहूर्त
सर्व पितृ अमावस्याचे हिंदु धर्मामध्ये खूप महत्व आहे. ह्यालाच पितृ मोक्ष अमावस्या सुद्धा म्हणतात. सर्व पितृ अमावस्या ह्या तिथीला ज्या पितरांचे श्राद्ध करतात ज्यांची तिथी माहिती नसते. ह्या वर्षी 21 सप्टेंबर 2025 रविवार ह्या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे. ह्या दिवशी काही विशेष गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो.
सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी आपले पितृ पृथ्वीवर येतात असे म्हणतात. ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून पितृन तर्पण दिले जाते. आपण विधी पूर्वक श्राद्ध केलेतर पितृ दोषा पासून मुक्ती मिळते.
सर्व पितृ अमावस्या कधी आहे?
अमावस्या तिथी सुरुवात 20 सप्टेंबर शनिवार रात्री 12 वाजून 17 मिनिट पर्यन्त
अमावस्या तिथी समाप्ती 21 सप्टेंबर रविवार रात्री 1 वाजून 24 मिनिट पर्यन्त
उदय तिथी 21 सप्टेंबर रविवार ह्या दिवशी आहे. ह्या वर्षी सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग व शुभ योग आहे.
सर्व पितृ अमावस्या तिथी श्राद्ध नियम:
ह्या दिवशी स्नान केल्यावर स्वछ पवित्र नदी काठी आसन घालावे.
मग हातात थोडे तांदूळ घेऊन सर्व पितरांनचे स्मरण करून श्राद्ध करण्याचा संकल्प करावा.
मग पाण्यात अक्षता टाकून देवांना अर्पित कराव्या. मग पितरांच्या नावांनी तर्पण द्या.
पितरांना तर्पण देताना पाण्यामध्ये काळे तीळ व पांढरी फुले घालून तर्पण द्या.
तर्पण देताना अंगठ्याच्या बाजूनी तर्पण द्या.एक थाळी मध्ये तर्पण द्या. तर्पण देताना पितरांचे नाव घेऊन तीन वेळा तर्पण द्या. व त्याच बरोबर ॐ पितृभ्य नम: ह्या मंत्राचा जाप करा.
मग ते थाळी मधील पाणी झाडांना घाला मग ब्राह्मण ना घरी बोलवून जेवण द्या.
महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:
सात्विक भोजन बनवा – सर्व पितृ अमावस्या हहया दिवशी आपल्या पितृ साठी शुद्ध व सात्विक भोजन बनवा, जेवणात कांदा, लसूण व मसालेदार साहित्य वापरू नका.

तर्पण व पिंडदान – सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी पितरांना तर्पण व पिंडदान जरूर करा. ते करण्यासाठी योग्य पंडितची मदत घ्या. तर्पण देताना पाण्यात तीळ व जव जरूर घाला.
कावळ्याला भोजन द्या – सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी पितरांच्या नावांनी कावळ्याला जेवण द्या, आपल्या जेवणतील एक भाग कावळ्याला काढून जरूर द्या.
पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा – पिंपळाच्या वृक्षामध्ये पितरांचा वास असतो असे म्हंटले जाते. सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करून संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
क्षमा मागा – सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी आपल्या पितरांची क्षमा मागितली पाहिजे आपल्या कडून चुकून माकून जर काही चूक झाली असेलतर आपल्या चुकांची क्षमा मागून त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे.