वर्षाचे शेवटचे सूर्य ग्रहण, सर्व पितृ अमावस्या वर काय परिणाम होणार
Surya Grahan-Sarva Pitru Amavasya 2025 Full Information In Marathi
सूर्य ग्रहण 21 सप्टेंबर 2025 रविवार ह्या दिवशी आहे. ही सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. पण त्याचा महत्वाचा परिणाम हा दान-धर्म व पुण्य ह्या वर होणार आहे. सूर्य ग्रहण व सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी कोणते सुद्धा चांगले कार्य होत नाही. विशेष करून गर्भवती महिलांसाठी खास महत्वाचे आहे त्यांनी ह्या वेळेत खूप काळजी घेतली पाहिजे. पितृ अमावस्या ह्या दिवशी श्राद्ध, तर्पण, ब्राह्मण भोजन व दान-धर्म केले पाहिजे त्यामुळे पितरांना शांती मिळेल.
परंपरेनुसार सूर्य व चंद्र ग्रहणच्या वेळी कोणते सुद्धा शुभ कार्य होत नाही. स्नान, दान व पूजा खर म्हणजे ग्रहण काळ संपल्यावर केले जाते, करणकी नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव होत नाही. ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते त्याचा परिणाम मानसिक स्थिति व स्वास्थ ह्यावर होतो.
जेव्हा पितृ अमावस्याच्या दिवशी सूर्य ग्रहण आलेतर दान-पुण्यचे महत्व अधिक वाढते. सूर्य ग्रहण ऑस्ट्रेलिया, अंटार्कटिका, अफ्रीका, हिंद महासागर, दक्षिण प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, दक्षिणी महासागर, पोलिनेशिया, मेलानेशिया व आशिया खंडात काही भागात दिसणार आहे.
भारतात सूर्य ग्रहण ही अंशीक दिसणार आहे. भारताच्या वेळे नुसार 21 सप्टेंबर रात्री 10:59 मिनिट सुरू होणार असून 3:23 मिनिट पर्यन्त आहे. खर म्हणजे भारतात ही ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळाचे नोयं लागू होत नाहीत.
भारतातील भक्तजन सर्व पितृ अमावस्याची पूजा अर्चा करू शकतात. ह्या दिवशी भारतात ग्राहणाचा नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे उपवास, पूजा व काही अमावस्याचे धार्मिक कार्य करू शकतात.
सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी सूर्य ग्रहण असले तरी आपण ही 4 सटीक उपाय करू शकता त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून पितरांच्या आत्माला शांती मिळेल म्हणून श्राद्ध कर्म, पिंडदान व तर्पण करण्याचे विशेष महत्व आहे. आपल्या घरात सुख समृद्धी पाहिजे असेलतर नक्की ही उपाय करा.
21 सप्टेंबर ह्या दिवशी करावयाचे उपाय:
दान:
ह्या दिवशी पितरांच्या आत्माला शांती व ग्रहण च्या नंतर पुण्य काळमध्ये अवश्य दान-धर्म करावे. हिंदू धर्मामध्ये दान-धर्मला विशेष महत्व आहे. ह्या दिवशी धू, तांदूळ,वस्त्र,दूध व साखर दान करणे शुभ मानले जाते. त्याच बरोबर आपण सूर्य देवाची सुद्धा कृपा मिळवू शकतो.

पिंपळाच्या वृक्षाची पूजा:
21 सप्टेंबर ह्या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे तर ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे महत्वाचे मानले आहे. कारणकी पिंपळाच्या वृक्षामध्ये पितरांचा वास असतो. त्यामुळे जल अर्पित करावे व दिवा सुद्धा लावावा, त्यामुळे पितृ दोषा पासून मुक्ती मिळेल हा एक अत्यंत फलदायी उपाय आहे.
पंचबलि करा:
सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी पंचबलि जरूर करा म्हणजे पांच जीवांना भोजन द्या. असे करणे शुभ मानले जाते. करणकी ही भोजन आपल्या पितरांना मिळते. पांच जीव कोणते तर गाय, कुत्रा, कावळा, मुंग्या व मासे ह्यांना भोजन द्या.