22 सप्टेंबर शारदीय नवरात्री हत्तीवर सवार होऊन येणार, पूजा मुहूर्त, पूजा साहित्य व पूजाविधी
Sharadiya Navratri 22 September Mata Durga Come Riding On An Elephant In Marathi
22 सप्टेंबर 2025 सोमवार पासून शारदीय नवरात्री सुरू होत आहे. ह्या वर्षी 10 दिवस नवरात्री आहे. नवरात्रीचे दिवस वाढणे व श्रद्धाचे दिवस कमी होणे ही शुभ मानले जाते. ह्या वर्षी श्राद्ध कमी दिवस व नवरात्रीचे दिवस वाढणार आहेत. म्हणूनच ह्या वर्षी 10 दिवस नवरात्री आहे.
शारदीय नवरात्री 22 सप्टेंबर 2025 सोमवार पासून सुरू होत असून 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसरा हा सण आहे. ह्या वर्षी 10 दिवस असून माता दुर्गा हत्तीवर विराजमान होऊन धर्तीवर येत आहे. जेव्हा माता दुर्गा हत्तीवर विरजमान होऊन येत असेल तेव्हा ते खूप शुभ मानले जाते.
हिंदू पंचांग नुसार दरवर्षी 4 वेळा नवरात्री येते. त्यामधील दोन नवरात्री ह्या गुप्त असतात व दोन प्रमुख नवरात्री एक म्हणजे चैत्र नवरात्री व दुसरी शारदीय नवरात्री होय. गुप्त नवरात्री ही तंत्र, मंत्र व साधना करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते व चैत्र नवरात्री व शारदीय नवरात्री मुख्य रूपात घरात बसवून साजरी केली जाते.
आश्विन शारदीय नवरात्रीची सुरवात आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीला असते. ती संपूर्ण देशात धुमधडाक्यात श्रद्धा पूर्वक साजरी केली जाते. नऊ दिवस माता दुर्गा नऊ रूपात येते व तिची विविध रूपात पूजा केली जाते.
शारदीय नवरात्री ह्या वर्षी 10 दिवस आहे.
आश्विन मास मधील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी 21 सप्टेंबर 2025 रात्री 1:30 वाजता प्रारंभ होत आहे. सूर्योदय तिथी अनुसार 22 सप्टेंबर 2025 नवरात्री प्रारंभ होत असून 30 सप्टेंबर मंगळवार रोजी दुर्गा अष्टमी कन्या पूजन आहे व 1 ऑक्टोबर रोजी महानवमी पूजा आहे.
कलश स्थापना शुभ मुहूर्त:
22 सप्टेंबर सोमवार सकाळी 6 :09 मिनिट पासून 8:15 पर्यन्त
दूसरा शुभ मुहूर्त: 8:15 ते 10:36 पर्यन्त
अभिजीत मुहूर्त: 11:49 ते 12:38 पर्यन्त
नवरात्री मध्ये माता दुर्गाची पूजा विशेष फलदायी आहे.
नवरात्री मध्ये माता दुर्गाच्या पूजे बरोबर कलश स्थापना करून जवचे बीज पेरले जाते. त्याच बरोबर अखंड ज्योत लावली जाते. श्री दुर्गा सप्तशती, श्री दुर्गा स्तुति, श्री दुर्गा चालीसा व अजून काही स्तोत्र माता दुर्गाची स्तुति करण्यासाठी म्हंटले जातात. पूजा अर्चा केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन भक्ताला धन-धान्य, लक्ष्मी, सुख-शांती प्रदान करते.
शारदीय नवरात्रि पूजा साहित्य:
शारदीय नवरात्री मध्ये माता दुर्गाची 9 दिवस 9 रूपांची विधी पूर्वक पूजा केली जाते. पूजा साहित्यमध्ये कुंकू, फूल, माता देवीची मूर्ती किंवा फोटो, पाण्यांनी भरलेला कलश, मातीचे भांडे, माती, जवस, लाल रंगाची ओढणी, लाल वस्त्र, मौली, नारळ, तांदूळ, पान सुपारी, लवंग, इलायची, बत्तासे, कपूर, शृंगार साहित्य,, दिवा, तुपाचा निरंजन, तूप, तेल, धूप, फळ-मिठाई व कलावा

शारदीय नवरात्री पूजा व कलश स्थपना विधी:
सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्त वर स्नान करून स्वच्छ कपडे घालावे.
आपले संपूर्ण घर साफ करून घराच्या चौकटीवर आंब्याच्या पानाचे तोरण लावावे.
पूजेची जागा स्वच्छ करून गंगाजल शिपडून पवित्र करा.
मग त्याजागी चौरंग ठेवून माता दुर्गाची मूर्ती किंवा फोटो ठेऊन श्री गणेश व माता दुगाचे नामस्मरण करा.
मग उत्तर-पूर्व दिशेला कलश स्थपना करा.
कलश स्थापना करण्यासाठी एक मातीचे भांडे घेऊन त्यामध्ये जवस बीज पेरा मग एका तांब्याच्या कलश मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडे गंगाजल टाका.
कलशाला कालावा बांधा व आंब्याची पाने त्यामध्ये ठेवा. मग त्यामध्ये अक्षता व सुपारी टाका.
मग त्या कलशावर एक चुनरी व मौली बाधा व त्यावर नारळ ठेवा.
मग विधी पूर्वक माता दुर्गाची पूजा करा.
दुर्गा सप्तशतीचे वाचन करा.
विधी पूर्वक पूजा झाल्यावर माता दुर्गाची आरती म्हणून प्रसाद वाटा.