अविधवा नवमी श्राद्ध कोणी करावे व कोण करू शकत नाही? संपूर्ण माहिती
Awidhwa Navami Shradh Full Information In Marathi
अविधवा नवमी पितृ पक्षमध्ये केली जाणारी एक विशेष तिथी मानली जाते. जी विवाहित महिलांचे श्राद्ध केले जाते ज्यांचे निधन पतीच्या निधनाच्या अगोदर होते. जी मृतुच्या वेळी विधवा नसते. ह्या दिवशी सौभाग्यवती महिला ला बोलवून तिला व ब्राह्मनाना भोजन दिले जाते. विवाहित महिलेला 16 शृंगार वस्तु दिल्या जातात. त्यामुळे पितर खुश होऊन सुखी जीवनाचा आशीर्वाद देतात.
अविधवा नवमी म्हणजे काय?
* अविधवा नवमी म्हणजे पितृ पक्ष मधील येणारी नवमी तिथी त्या दिवशी श्राद्ध केले जाते.
* अविधवा नवमी ही तिथी विवाहित महिलांसाठी असते ज्यांचे निधन पतीच्या अगोदर झालेले असते.
* अविधवा नवमी च्या दिवशी विवाहित मृत महिलांचे श्राद्ध करून त्यांची आठवण करून त्याचे श्राद्ध केले जाते.
श्राद्ध का करावे?
पितृ पक्ष मध्ये नवमी ह्या तिथीला विवाहित मृत महिलांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्माला शांती मिळते.
* ह्या दिवशी श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात व परिवाराला सुख समृद्धी जीवनाचे आशीर्वाद देतात.
कोणी हे श्राद्ध करावे व कोणी करू नये?
कोण करू शकते?
ज्या महिलाचे निधन झाले आहे व त्यांचा मुलगा जीवंत आहे त्या मुलाने हे श्राद्ध करावे. जर सख्या आईचे निधन झाले आहे व सावत्र आई आहे तरी सुद्धा मुलाने हे श्राद्ध करावे.
कोणी हे श्राद्ध करू शकत नाही?
* जर मृत महिलाचे पती जीवंत आहेत त्या महिलाचे अविधवा नवमी ह्या दिवशी श्राद्ध करीत नाहीत.
* जर मृत महिलेला मुलगा नाही किंवा मुलाचे सुद्धा निधन झाले आहे तर त्या मुलाची मुले अविधवा नवमी श्राद्ध करू शकत नाही.
* जर मृत महिलाला मुलगा नाही, तर अविधवा नवमी ह्या दिवशी तिची मुलगी किंवा जावई हे श्राद्ध करू शकत नाही.

अविधवा नवमीचे श्राद्ध कर्म कसे करायचे:
आश्विन मास कृष्ण पक्ष नवमी ह्या तिथीला मृत व्यक्तिच्या मोठ्या मुलांनी श्राद्ध कर्म केले पाहिजे. सकाळी लवकर उठून स्नान ध्यान करून महिला पूर्वजांच्या आत्माच्या शांतीसाठी तर्पण व पिंडदान केले जाते. ह्या दिवशी दिवंगत सुहागण, महिला, सुन, मुली ह्यांच्या साठी श्राद्ध केले जाते. त्यासाठी घराच्या मुख्य दरवाजा बाहेरील मुख्य अंगणात दक्षिण दिशेला हिरव्या रंगाचे वस्त्र अंथरूण त्यावर पूर्वजांचे फोटो ठेवा. फोटो समोर फुल अर्पित करा तिळाच्या तेलाचा दिवा व सुगंधित धूप लावा. मग स्वछ पाणी घेऊन त्यामध्ये तीळ घालून हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूनी पूर्वजांचे स्मरण करून तर्पण अर्पित करा.
मग दिवा लावून खीर पुरी व गुळाचा नेवेद्य अर्पित करा. मग आपल्या कडून काही चूक झाली असेलतर माफी मागा, तसेच ह्या दिवशी सुहागन महिलांना शृंगाराचे साहित्य दान करतात व दक्षिणा देवून आशीर्वाद घेतात.