पांच करणासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, फक्त ह्या वेळी पिंपळाच्या झाडा जवळ जाऊ नये
Why We Are Doing Everyday Peepal Tree Puja In Marathi
पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे लाभ:
सनातन धर्मात पिंपळाच्या वृक्षाला पवित्र मानले जाते. असे म्हणतात की पिंपळाच्या वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो व त्याची पूजा केल्याने लाभ होऊन शनिदोषा पासून मुक्ती मिळते. म्हणूनच धार्मिक क्षेत्रामध्ये पिंपळाच्या वृक्षाला देव वृक्ष असे म्हणतात. पिंपाळच्या वृक्षाची पूजा कधी सुद्धा केली जाते मग अमावस्या असो किंवा पूर्णिमा असो. पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णु व माता लक्ष्मीचा वास आहे. त्यामुळे पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने पुण्य मिळते व पितरांचा आशीर्वाद मिळतो. हा वृक्ष 24 तास ऑक्सिजन सोडतो ते मनुष्यच्या साठी खूप जरूरी आहे. पिंपळाच्या वृक्षाखाली महात्मा बुद्ध व अनेक ऋषि मुनिनी ज्ञानार्जन केले होते.
पुराणात पिंपळाच्या वृक्षाचे महत्व:
स्कंद पुराण मध्ये पिंपळाच्या वृक्षाच्या विषयी माहिती सांगितली आहे.
पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णु, मध्ये केशव, शाखामध्ये नारायण, पानांमध्ये भगवान हरी व फळामध्ये सर्व देवतांचा वास आहे. पिंपळ वृक्ष भगवान विष्णु स्वरूप आहेत. महात्मा ह्या वृक्षाची सेवा करतात. त्याच बरोबर हा वृक्ष मनुष्याची पापान पासून व शनि दोषा पासून मुक्ती करतो.
भगवान विष्णु स्वरूप आहे पिंपळ वृक्ष:
भगवत गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व वृक्षामध्ये सर्वात श्रेष्ट पिंपळ वृक्ष आहे. त्याच बरोबर पिंपळाला भगवान विष्णु स्वरूप मानले जाते. जेथे भगवान विष्णु तेथे माता लक्ष्मी असते. भगवान श्रीकृष्ण ह्यांनी पिंपळाच्या वृक्षा खाली बसून गीताचे महत्व दुनियला सांगितले होते. म्हणून पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णु व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊन आशीर्वाद मिळतो.
देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो:
ज्योतिष शास्त्र नुसार दररोज पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली पाहिजे. कारणकी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या देवी देवतांचा वास असतो. आपल्यालासर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळून अक्षय पुण्य पण मिळते. पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्यावर प्रदक्षिणा मारल्याने सर्व पाप नष्ट होतात.
पितृ दोषा पासून मुक्ती मिळते:
पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पिंपळाची पूजा करणे सर्वोत्तम मानले आहे. त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाची लागवड केली पाहिजे. त्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते. व पुण्य सुद्धा मिळते व पितृ दोष दूर होतो.
शनि साडेसाती पासून मिळते मुक्ती:

शनिवार ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे लाभदायक मानले जाते. असे म्हणतात की पिंपळाच्या वृक्षावर नेहमी शनिची छाया राहते. शनिवार ह्या दिवशी पिंपळाच्या मुळाशी पाणी अर्पित करून दिवा लावल्याने शनि संबंधित कष्ट दूर होतील. ज्यांची शनि साडेसाती चालू आहे त्यांनी शनिवारि पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा मारावी. असे केल्याने शनि महादशा पासून मुक्ती मिळते.
ह्या वेळेस पिंपळाच्या वृक्षाची पूजा करू नये:
शास्त्रामध्ये सांगितले आहे की सुर्योदयच्या अगोदर कधी सुद्धा पिंपळाच्या वृक्षाची पूजा करू नये. कारण की ह्या वेळी ल=माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा वास असतो. अलक्ष्मी ही दरिद्रताची देवी मानली जाते.तसेच ती नेहमी गरीबी व जीवनात परेशानी आणते. म्हणून सुर्योदयच्या अगोदर कधी सुद्धा पिंपळाच्या वृक्षाची पूजा करू नये किंवा त्याचा जवळ सुद्धा जाऊ नये. म्हणून सुर्योदय नंतर पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली पाहिजे.