3 दिवसांची स्वामींची प्रभावी सेवा, सर्व प्रश्न अडचणी रोग दूर होतील
10 July Guru Purnima Shri Swami Samarth Yancha 3 Divsachi Prabhavi Sewa In Marathi
8 , 9 व 10 जुलै आता शेवटची संधि स्वामींची सेवा करण्यासाठी
10 जुलै 2025 गुरुवार ह्या दिवशी गुरु पूर्णिमा आहे. आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त करायची असेलतर 8 जुलै ते 10 जुलै मंगळवार, बुधवार व गुरुवार सेवा करा. स्वामींची सेवा कशी करायची ते आपण थोडक्यात पुढे पाहू व त्यासाठी जास्त काही कडक नियम पळायची गरज नाही.
आपण ह्या अगोदर 21 दिवसांची व 5 ते 7 दिवसांची सेवा कशी करायची ते अगदी सविस्तर पाहिले आहे. आपल्याला 21 किंवा 5 व 7 दिवसांची सेवा करणे शक्य झाले नसेल तर आपण ही 3 दिवसांची प्रभावी सेवा करू शकता.
आपण 8 तारीख मंगळवार पासून सकाळी लवकर उठून आपल्या देवघराची साफ सफाई करून पूजेची जागा सुद्धा साफ करून घ्या. मग स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून आसन घालून बसावे. स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्वछ करून हळद-कुकु, अक्षता, फुले अर्पित करावी, समई लाऊन अगरबती लावावी.
स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीला नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करावी. रोज 3 दिवस सकाळी नियमितपणे “संक्षिप्त श्री गुरुचरित्र” वाचन करावे व 1 माळ श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करावा. त्याच बरोबर 3, 5 7 किंवा 11 वेळा तारकमंत्रचा जाप करावा.

“संक्षिप्त श्री गुरुचरित्र” मध्ये 7 आध्याय आहेत. आपण रोज 7 ही आध्याय वाचन करायचे आहेत. आपण ही 3 दिवसांची सेवा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्याच बरोबर आपले प्रश्न, अडचणी सुटतील व आपले आरोग्य चांगले राहील.
आपण ही सेवा करताना काही सोपे नियम पाळायचे आहेत. सेवा करताना 3 दिवस आपण शाकाहारी भोजन सेवन करायचे आहे. जर घरात आपण मांसाहारी जेवण बनवले तरी ते आपण सेवन करायचे नाही. घरात साफसफाईचे ध्यान ठेवावे. कोणाची निंदा करू नये, अपशब्द बोलू नये.
गुरुपूर्णिमा ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून रात्री गोडाचा नेवेद्य दाखवून मग उपवास सोडावा.