आषाढी एकादशी 2025 देवशयनी एकादशी पूजा मुहूर्त, पूजाविधी, मंत्र
Ashadhi Ekadashi 2025 Pooja Muhurt, Pooja Vidhi, Mantra In Marathi
देवशयनी एकादशीलाच आषाढी एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशी ही दरवर्षी आषाढ शुक्ल पक्ष ह्या दिवशी आहे म्हणजेच 6 जुलै 2025 रविवार ह्या दिवशी आहे. सनातन धर्ममध्ये ह्या एकादशील खूप महत्व आहे.
हिंदू धर्ममध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे ह्या दिवशी भगवान विष्णु 4 महिने योगनिद्रामध्ये जातात. म्हणून ह्या दिवसा पासून चातुर्मास चालू होतो. असे म्हणतात की ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास ठेवल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपल्याला माहिती आहेका ह्या एकादशीलाच देवशयनी एकादशी, पदमा एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हणतात.
आषाढ़ी एकादशी- 6 जुलै 2025, रविवार ह्या दिवशी आहे.
एकादशी तिथि प्रारम्भ – 05 जुलै 2025 06:58 संध्याकाळी
एकादशी तिथि समाप्त – 06 जुलै 2025 09:14 रात्री
आषाढ़ी एकादशी चौघड़िया मुहूर्त 2025
चर – सामान्य – 07:13 ते 08:57
लाभ – उन्नति – 08:57 ते 10:42
अमृत – सर्वोत्तम – 10:42 ते 12:26
शुभ – उत्तम – 14:10 ते 15:54
शुभ – उत्तम – 19:23 ते 20:39
अमृत – सर्वोत्तम – 20:39 ते 21:54
आषाढ़ी एकादशी व्रत मध्ये काय सेवन करू शकता:
एकादशी व्रतसाठी साबुदाणा, शिंगाडा, रताळू, बटाटे, शेंगा सेवन करू शकता. त्याच बोरबर दूध, ताक, खवा, लोणी, तूप, पनीर सुद्धा सेवन करू शकता.
आषाढी एकादशी ह्या दिवशी उपवास करणाऱ्या साधकांनी श्री भगवान विष्णु किंवा विठलाच्या मूर्तीची मनोभावे पूजा करावी. पांडुरंगाची मूर्ती असल्यास पीतांबर नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्यावर त्या मूर्तीला झोपवावे असा विधी आहे.

आषाढी एकादशी पूजाविधी व नियम:
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे.
घरातील देवी देवतांची पूजा करावी., तसेच भगवान विषणूला पिवळी फुल, चंदन, तुळस, अर्पण करावी, धूप-दिवा लाऊन आरती करावी.
पूजा झाल्यावर “ॐ नमो भगवते वासुदेवाय” हा मंत्र जाप व विष्णु सहस्त्रनाम जप करावा. मग भगवान विष्णु ह्यांना नेवेद्य दाखवावा.
शेवटी भगवान विष्णु ह्यांची आरती करून कुटुंबातील व्यक्तिनि प्रार्थना करावी.