10 जुलै 2025 गुरुपूर्णिमा 5 किंवा 7 दिवसांची श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा सर्व मनोकामना पूर्ण करतील नियमांचे पालन नकरता
10 July Guru Purnima 5 kiwaa 7 Divsachi Prabhavi Seva In Marathi
10 जुलै 2025 गुरुवार ह्या दिवशी गुरुपूर्णिमा आहे. ह्या दिवशी आपण आपल्या गुरूंची कृपा मिळण्यासाठी काही सोप्या सेवा करू शकता. आपण दत्त गुरूंची किंवा श्री स्वामी समर्थ ह्यांची किंवा साई बाबांची सेवा करू शकता. आपण मनोभावे सेवा केली तर आपल्याला त्याचे चांगले फळ नक्कीच मिळेल. आपल्या जीवनातील सर्व अडचणी, प्रश्न, आजार, नोकरी प्रश्न किंवा लग्नाचे प्रश्न किंवा आर्थिक समस्या सुद्धा दूर होतील.
आपल्याला ही सेवा 5 किंवा 7 दिवसांची करायची असेलतर करू शकता. त्याचे आपल्याला 100% फळ मिळेल. आपण सेवा सुरू करताना विशेष असे काही कडक नियम पाळायचे नाहीत. अगदी सोपे छोटेशे नियम आहेत.
प्रथम आपण नियम काय आहेत ते पाहू या:
1. आपल्याला जेव्हा 7 दिवसांची करायची असेलतर 4 जुलै पासून सुरू करू शकता किंवा 5 दिवसांची सेवा करायची असेलतर 6 जुलै पासून सुरू करू शकता. सेवा कोणी सुद्धा करू शकतात, म्हणजे मुले, मुली विवाहित महिला किंवा पुरुष सुद्धा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मासिक काळा मध्ये ही सेवा करू नये.
2. स्वामींची सेवा आपण सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता. आपल्याला जी वेळ योग्य आहे त्यावेळी करू शकता पण तीच वेळ आपण 5 दिवस किंवा 7 दिवस नियमित पाळावी कारण की स्वामिना शिस्त खूप प्रिय आहे. फक्त आपण दुपारी 12:00 ते 12:30 ह्या वेळा करायची नाही कारणकी ही वेळ स्वामची भिक्षा मागायची आहे.
3. सेवा सुरू केल्यावर आपण स्वतः मांसाहर करू नये पण घरातील इतर व्यक्तिनि केला तरी चालेल. आपण बनवून देवू शकता पण सेवन करू नये.
4. आपण जेव्हा सेवा सुरू करणार तेव्हा स्वामीच्या समोर बसून संकल्प करून मगच सेवा सुरू करा. संकल्प करताना आपल्याला शक्य असेलतर स्वामींच्या मठात जाऊन किंवा दत्त मंदिरात जाऊन संकल्प करू शकता किंवा आपल्या घरातील देवघरात सुद्धा स्वामीच्या समोर बसून संकल्प करू शकता. संकल्प करताना अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे हातात थोडे पाणी घेऊन संकल्प करून पाणी ताम्हणात सोडावे. आपल्या अडचणी आपल्याला पडलेले प्रश्न आपण स्वामीच्या समोर मनोभावे मांडावे.
5. सेवा सुरू करताना स्वच्छ आसन घ्या, ते आसन फक्त आपणच वापरायचे दुसऱ्यां ना वापरायला द्यायचे नाही. स्वामीच्या फोटो किंवा मूर्ती समोर हळद-कुंकू, फूल, दिवा व आगरबत्ती लाऊन निर्मल मनानी सेवा करा. असे हे सोपे नियम आहेत ते पाळून आपण सेवा पूर्ण करू शकता. आपण मंत्र जाप करणार असाल तर मंत्र जापची माळ सुद्धा आपणच वापरावी दुसऱ्या कोणाला वापरायला देवू नये.
6. ब्रह्मचाऱ्याचे पालन केले नाहीतरी चालेल कारणकी काहीजण मुल व्हावे म्हणून सुद्धा प्रयत्न करीत असतील.

आता आपण पाहू या स्वामींच्या कोणत्या प्रभावी सेवा आहेत.:
1. पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्रचे पारायण म्हणजे स्वामी सारामृतचे पारायण होय. ह्या मध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. श्री स्वामी चरित्रचे पारायण म्हणजे स्वामी सारामृतचे पारायण ही एक खूप प्रभावी सेवा आहे. आपण मनोभावे केली तर आपल्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतील.
आपल्याला रोज एका बैठकीत 1 ते 21 अध्याय वाचन करायचे आहेत. एकाच दिवशी 1 ते 21 अध्याय वाचन म्हणजे एक पारायण पूर्ण होते. मग आपण 5 दिवस किंवा 7 दिवस करू शकता.
दुसरी सेवा म्हणजे आपण तारक मंत्राचा जाप करू शकता. आपण एक संकल्प करून 5 दिवस किंवा 7 दिवस रोज 11 माळ जाप करू शकता किंवा रोज 5, 11 किंवा 21 माळ जाप करू शकता.
तिसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करणे. आपण रोज 5,7,11 किंवा 21 माळ जाप करू शकता. आपण रोज 3 श्री स्वामी चरित्रचे अध्याय व श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करू शकता. आपण मंत्र जाप सुरू करताना उजव्या हातात एक छोटा पाण्याचा लोटा घेऊन मंत्र जाप करावा. मग मंत्र जाप पूर्ण झाल्यावर मंत्र अभिमंत्रित जल तीर्थ म्हणून घरातील सर्वांना द्या किंवा आजारी माणसाला द्या.
आपल्याला ही चांगली संधि आहे. आपण 5 दिवस किंवा 7 दिवस स्वामींची सेवा करून आपले प्रश्न, अडचणी दूर करू शकता. आपण वेळ काढून ही सेवा करा, वेळ नाही असे म्हंटले तर आपली सेवा कधीच पूर्ण होणार नाही.