Don’t Waste Leftover Rice, Make Healthy Tikki For Nashta Recipe In Marathi
उरलेला भात वाया नघालवता बनवा मस्त टेस्टि हेल्दि टिकी नाश्तासाठी
आपल्याकडे कधीतरी भात उरतो. मग तो टाकून द्यायला जिवावर येते. अश्या वेळी उरलेला भात वापरुन मस्त हेल्दि नाश्ता बनवता येतो. त्यासाठी आपल्याला उरलेला भात 1 कप घेऊन त्यामध्ये गाजर, शिमला मिरची, कांदा, कोबी घालून मस्त कुरकुरीत नाश्ता बनवता येतो.
साहित्य:
1 कप भात 1 मोठ्या आकाराचा बटाटा (उकडून, सोलून, किसून)
2 टे स्पून कांदा (बारीक चिरून)
2 टे स्पून गाजर (बारीक चिरून)
2 टे स्पून शिमलामिरची (बारीक चिरून)
1 हिरवी मिरची (चिरून)
1 टी स्पून आल-लसूण पेस्ट
2 टे स्पून कोथिंबीर
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
तेल टिकी शालोफ्राय करण्यासाठी

कृती: एका बाउलमध्ये उरलेला भात घ्या, कांदा, कोथिंबीर, गाजर, शिमला मिरची व कोबी बारीक चिरून घ्या, हिरवी मिरची चिरून घ्या. बटाटा उकडून, सोलून, किसून घ्या. आल-लसूण कुटून घ्या.
बाउलमध्ये उरलेला भात, चिरलेला कांदा, गाजर, शिमला मिरची,, कोबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आल-लसूण घालून लाल मिरची पावदरम चिलीफ्लेस्क, मीठ घालून मिक्स करून घ्या, जास्त कोरडे वाटले तर एक पाण्याचा हबका मारून मिक्स करून घ्या.
आता मिक्स केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे बनवून घ्या. नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर तेल टाकून टीक्की शालोफ्राय करून घ्या.
गरम गरम टीक्की टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.