झटपट सोपा स्पॉन्ज कॉफी केक (बिना बटर, बेकिंग सोडा, अंडे, ओव्हन) मुलांसाठी
Easy Spongy Eggless Coffee Cake Bina Butter Baking Soda In Pan In Marathi
आज आपण मऊ लुसलुशीत कॉफी केक कसा बनवायचा ते पाहू या. केक बनवताना आपण अगदी सोप्या पद्धतीने बिना अंडे, बिना बेकिंग सोडा, किंवा बिना खायचा सोडा केक बनवणार आहोत. तसेच आपण ओव्हन सुद्धा वापरणार नाही. आपण कॉफी केक पॅनमध्ये बनवणार आहोत.
कॉफी केकची टेस्टि लागतो. मुलांना खूप आवडेल बनवून पहा. आपण डेझर्ट म्हणून किंवा पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो.
साहित्य:
1 कप मैदा
1/2 कप दूध गरम
1/2 कप साखर
1/4 कप तेल (रिफाइंड)
2 टे स्पून कॉफी
1 टी स्पून व्हनीला एसेंस
1 टी स्पून इनो

कृती: मैदा सपेटीच्या चाळणीने चाळून बाजूला ठेवा. केकच्या मोल्डला आतून तेल लाऊन खाली बटर पेपर ठेवा. यान पॅन किंवा कुकरमध्ये केक बेक करणार असला तर त्यामध्ये मीठ घालून आत एक स्टँड ठेवा, झाकण ठेवून मंद विस्तवावर 10 मिनिट गरम करायला ठेवा. जर कुकरमध्ये केक बेक करणार असाल तर कुकरच्या झाकणाची रिंग व शिट्टी काढून बाजूला ठेवा.
एका बाउलमध्ये गरम दूध घेऊन त्यामध्ये साखर विरघळवून घ्या, मग त्यामध्ये तेल घालून मिक्स करून घ्या, आता त्यामध्ये व्हनीला एसेन्स घालून मिक्स करा.
आता मिक्स केलेल्या मिश्रणात चाळलेला मैदा घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये इनो घालून ए टे सपू दूध घालून मिश्रण एक सारखे करून घ्या.
मग केकचे भांडे कुकरमध्ये किंवा पॅनमध्ये ठेवा झाकण लाऊन 35 ते 40 मिनिट मंद विस्तवावर केक बेक करायला ठेवा. केक बेक झालाकी विस्तव बंद करून केक तासच आतमध्ये 15 मिनिट ठेवा. मग बाहेर काढून बटर पेपर काढून सर्व्ह करा.