दीप अमावस्या (हरियाली अमावस्या) किंवा आषाढ अमावस्या 2025 शुभ मुहूर्त दीप दान करण्याचे महत्व
Ashadh Amavasya, Deep Amavasya 2025 Shubh Muhurt, Dip Dan Karnyache Mahtaw In Marathi
भगवान शिव ह्यांना समर्पित श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलै 2025 शुक्रवार ह्या दिवसा पासून होत आहे. ह्या महियात येणारी अमावस्या 24 जुलै 2025 गुरुवार ह्या दिवशी आहे. ह्या अमावस्याला हरियाली अमावस्या किंवा दीप अमावस्या ह्या नावानी संबोधले जाते. दीप अमावस्या ह्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या आत्माला शांती मिळण्यासाठी व मोक्ष मिळण्यासाठी काही सोपे उपाय केले जातात. असे म्हणतात की ह्या दिवशी पितृकार्य व शिवपूजन केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून भगवान शिव सुद्धा प्रसन्न होतात व जीवनात सुख-समृद्धी प्रदान होते.
दीप अमावस्या किंवा हरियाली अमावस्या शुभ महूर्त, स्नान, दान व दीप दानचे काय महत्व आहे ते पाहू या:
हरियाली अमावस्या दीप अमावस्या 2025 तिथि:
अमावस्या तिथीची सुरवात 24 जुलै 2025 मध्य रात्री 2:28 मिनिट पासून सुरू होत असून समाप्ती 25 जुलै 2025सकाळी 6:15 पर्यन्त म्हणून 24 जुलै 2025 गुरुवार ह्या दिवशी अमावस्या आहे.
शुभ समय व शुभ योग:
ब्रह्म मुहूर्त- सकाळी 4:15 पासून ते 4:57 पर्यन्त
अभिजीत मुहूर्त- दुपारी 12:00 पासून ते 12:55 पर्यन्त
अमृत काल- दुपारी 2:26 पासून ते 3:58 पर्यन्त
सर्वार्थ सिद्ध योग- संपूर्ण दिवस
गुरु पुष्य योग- संध्याकाळी 4:43 पासून आरंभ होत असून दुसऱ्या दिवशी पर्यन्त सकाळी 05:39 पर्यन्त
हरियाली अमावस्या दीप अमावस्या ह्या दिवशी करा हे शुभ कार्य:
अमावस्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. जर नदीत स्नान करणे शक्य नसेलतर घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करा.
स्नान झाल्यावर आपल्या पितरांना तर्पण, पिंडदान व श्राद्ध कर्म केले पाहिजे.
पितृकार्य झाल्यावर भगवान शिव ह्यांना जलाभिषेक व रुद्रभिषेक अवश्य करा.
अमावस्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करणे व दवा लावणे पुण्यदायक मानले जाते.
जरूरत गरीब लोकांना भोजन, वस्त्र व दान देणे अत्यंत फलदायी मानले जाते.
हरियाली अमावस्या दीप अमावस्या महत्व:
पुराणा अनुसार श्रावण महिन्यात दान, स्नान, पूजन किंवा तप केल्याने विशेष पुण्य मिळते. तसेच दीप आमवस्याच्या दिवशी व्रत, पूजा-पाठ व तर्पण दिल्याने व्यक्तिला पूर्व जन्मीच्या व वर्तमान जीवनातील चुकून केलेल्या पापा पासून मुक्ती मिळते. त्याच बरोबर हा दिवस जीवनात सुख, शांती व समृद्धी देणारा मानला जातो.
आषाढ अमावस्या ह्या दिवशी दीप दान करण्याचे मुख महत्व आहे त्यामुळे सुख, समृद्धी व आनंद मिळतो व नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यासाठी आपल्याला पुढे दिलेल्या जागी दिवा लावावा.

आषाढ़ अमावस्या दीप दान करण्याचे उपाय: (Do These Remedies With Lamp On Ashadh Amavasya)
1. घराच्या मुख्य दरवाजा जवळ अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी दिवा जरूर लावावा. मुख्य दरवाजा जवळ दिवा लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा नयेता सकारात्मक ऊर्जाचे आगमन होते. त्यामुळे घरात सुख समृद्धी व शांती येते.
2. तुळशीच्या रोपा जवळ दिवा लावावा: आपल्या घरात जर तळशीचे रोप असेलतर आषाढ अमावस्या ह्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपा जवळ दिवा लावावा. तुळशीचे रोप पूजनीय मानले जाते. असे म्हणतात की तुळशीच्या रोपा जवळ दिवा लावल्याने माता लक्ष्मी खुश होऊन घरात धन-धान्यची कमतरता होत नाही.
3. स्वयंपाक घरात दिवा लावावा: स्वयंपाक घर म्हणजे माता अन्नपूर्णा हिचा वास असतो. आषाढ आमवस्या ह्या दिवशी रात्री स्वयंपाक घरात दिवा लावावा त्यामुळे अन्न व धनची कधी सुद्धा कमतरता होत नाही. त्याच बरोबर जीवनात समृद्धी व खुशाली येते.
4. पिंपळाच्या वृक्षा जवळ दिवा लावावा: आपल्या घराच्या जवळ पिंपळाचे झाड असेलतर संध्याकाळी दिवा जरूर लावावा. पिंपाळच्या झाडांमद्धे भगवान ब्रह्मा. विष्णु व शिव ह्याचा वास असतो. पिंपळाच्या वृक्षा जवळ दिवा लावावा त्यामुळे पितृ दोष पासून मुक्ती मिळून त्यांचा आशीर्वाद मिळेल.
5. घरातील देवघरा जवळ दिवा लावावा: आषाढ अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी 9 छोटे दिवे लावावे त्यामुळे देवी देवतांची कृपा मिळेल व घरात आनंद व समृद्धी मिळेल.