झटपट सोपी उपवासाची साबुदाणा भेळ
Zatpat Tasty Bhel For Fasting In Marathi
उपवास म्हंटले की आपण साबूदाणा खिचडी बनवतो. पण बरेच वेळा आपल्याला खिचडी खायचा कंटाळा येतो. तर उपवासाची साबूदाणा भेळ बनवून पहा मस्त टेस्टि लागते. आपण साबूदाणा भेळ इतर वेळी सुद्धा नाश्तासाठी बनवू शकतो.
उपवासाची साबूदाणा भेळ बनवायला सोपी आहे सगळे आवडीने खातील बनवून पहा. आपण खिचडी बनवण्यासाठी जसा साबुदाणा भिजवतो फक्त तसाच साबूदाणा आपल्याला 4-5 तास भिजत ठेवायचा आहे.
साहित्य:
1/2 कप साबुदाणा
1 मध्यम आकाराचा बटाटा (उकडून)
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
2 टे स्पून शेंगदाणे
1 टे स्पून काजू
1 टे स्पून कोथिंबीर
1/2 टी स्पून चाट मसाला
2 टे स्पून तूप, मीठ चवीने
1 टी स्पून लिंबू रस

कृती: उपवासाची भेळ बनवण्यासाठी अगोदर साबूदाणा 4-5 तास भिजत ठेवा जसे आपण साबूदाणा खिचडीसाठी भिजवतो तसे. बटाटे उकडून सोलून चिरून घ्या, शेगदाणे भाजून घ्या, काजू सुद्धा ब्राऊन होई पर्यन्त भाजून घ्या,
एका पॅनमध्ये तूप गरम करून घ्या, त्यामध्ये साबूदाणा भाजून घ्या, साबूदाणा नरम होऊन शिजला पाहिजे, साबुदाणा शिजण्यासाठी साधारणपणे 4-5 मिनिट लागतात. साबूदाणा शिजला की मग एका बाउलमध्ये काढून घ्या, त्यामध्ये चिरलेले बटाटे, शेगदाणे, काजू, कोथिंबीर, लिंबूरस, लाल मिरची पावडर, चाट मसाला व मीठ घालून मिक्स करून घ्या.
उपवासाची साबूदाणा भेळ सर्व्ह करताना वरतून कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.
टीप: उपवाससाठी वरील साहित्या पैकी कोणते साहित्य आपल्याला उपवासासाठी चालत नसेल तर वापरू नका.