रथ सप्तमीला दूध का उतू घालावे? कोणत्या शुभ रंगाचे कपडे घालावे?
Ratha Saptami Auspicious Colour & Why Milk Poured In Clay Pots In Marathi
रथसप्तमी ह्या दिवशी दूध उतू घालायची पद्धत ही फार पूर्वी पासून अंमलात आणली जात आहे. बऱ्याच वेळा इतर वेळी आपल्या घरात दूध उतू जाते तेव्हा घरातील महिला दूध उतू गेले म्हणून हळहळतात. पण रथ सप्तमी ह्या दिवशी दूध उतू जाणे शुभ मानले जाते. कारण रथ सप्तमी ह्यादिवशी आपण सूर्य देवाची जशी पूजा करतो म्हणजे जल अर्पण करतो तसेच अग्निला सुद्धा दूध अर्पण करण्याची प्रथा आहे. असे केल्याने घरात सुख समृद्धी येते.
रथ सप्तमी ही माघ शुक्ल पक्ष सप्तमी ह्या दिवशी येते त्या दिवशी सूर्याच्या उत्तरायणनाचा सातवा दिवस, त्यादिवशी सूर्य आपल्या 7 घोड्यांच्या रथामध्ये बसून उत्तरेकडे वळतो. त्यामुळे ऋतुमनात बदल घडतो. वसंत ऋतूची सुरवात होते. ह्या वर्षी रथ सप्तमी 4 फेब्रुवरी 2025 मंगळवार ह्या दिवशी आहे.
रथ सप्तमी ह्या दिवशी आपल्या घराच्या अंगणात मातीच्या बोळक्यात दूध घेऊन ते मुद्दामुन उतू घालतात. असे म्हणतात की जय दिशेला दूध उतू जाईल त्या दिशेला समृद्धी येते. रथ सप्तमी च्या दिवशी सूर्य देवाला तांब्याच्या कलशात पाणी घेऊन अर्ध्य दिले जाते त्यामुळे सूर्य देवाची कृपा आपल्याला मिळते.
दूध कधी उतू घालावे?
अग्नि देवाला दूध उतू घालायचे तेव्हा दुपारी 12 च्या आत दूध उतू घालावे. त्यासाठी एका तव्यावर छोट्या 2-3 गौरयाचे तुकडे ठेवावे. थोड्याच्या सुक्या काड्या ठेवाव्या, तवा तुळशी समोर ठेवायचा आहे. किंवा देवघरात देवा समोर ठेवावा. मातीचे भांडे घेऊन त्यामध्ये 3/4 बोळके भरून दूध घ्यावे त्यामध्ये थोडेशे पांढरे तीळ,साखर घाला.
बोलक्या मधील दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला जाईल अश्या पद्धतीने ठेवावे. तव्यावरील गौरी व काड्या प्रजवतील करून त्यावर दुधाचे बोळके ठेवा, मग दूध उतू गेल्यावर राहिलेलया दुध घरातील व्यक्तींना प्रसाद म्हणून द्या.
आपल्याला माहिती आहे का आपण कोणत्या रंगाचे कपडे परिधान केल्याने शुक्र ग्रहाचा व्यक्तिवर चांगला परिणाम होतो. त्याच बरोबर सर्व ग्रह्यांचे चांगले परिणाम पाहायला मिळतात.

रथसप्तमी ह्या दिवशी कोणत्या शुभ रंगाचे कपडे घालावे?
रथसप्तमी ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे किंवा ड्रेस घालावा. पिवळा रंग हा खूप शुभ आहे. पिवळ्या रंगांमध्ये काही शेड असतात त्यामधील कोणती सुद्धा पिवळ्या रंगाची शेड वापरू शकता. कारणकी सूर्याच्या सुद्धा पिवळ्या रंगाच्या शेड बदलत असत्तात.
सूर्याचा प्रकाश आपल्याला अंधारतून उजेडाकडे नेत असतो. आपल्या कडे लग्नाच्या वेळी नवरा-नवरीला पिवळी हळद लावायची पद्धत आहे. कारण की हळद ही शुभ आहे व ती पिवळ्या रंगाची आहे. पिवळा रंग हा गुरु ग्रहाचे प्रतीक आहे.
पिवळ्या रंगामुळे नाकारात्मकता निघून जाते व सकारात्मकता येते. म्हणून ह्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालावा.