रथ सप्तमी 2025 कधी आहे? पूजा मुहूर्त महत्व सूर्य भगवान मंत्र उपाय
Rathsaptami 2025 Full Information, Mantra And Upay In Marathi
हिंदू धर्मामध्ये रथ सप्तमी ही महत्वपूर्ण मानली जाते. ह्यालाच माघ सप्तमी सुद्धा म्हंटले जाते. ही तिथी सर्वात श्रेष्ट मानली जाते. ह्या दिवशी सूर्य देव प्रकट झाले होते त्यामुळे रथ सप्तमी हा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. ह्या दिवशी साधक सूर्य देवाची पूजा अर्चा करतात. त्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळून सुख-सौभाग्यची प्राप्ती होते. तसेच करियर व व्यवसायात प्रगती होते. त्याच बरोबर बिघडलेली कामे मार्गी लागतात.
रथ सप्तमी तिथि:
हिंदू पंचांग नुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमीची सुरुवात सोमवार 4 फेब्रुवारी सकाळी 4 वाजून 37 मिनिट होत असून समाप्ती 5 फेब्रुवारी रात्री 2 वाजून 30 मिनिट होत आहे. त्यामुळे 4 फेब्रुवारी ह्या दिवशी रथ सप्तमी साजरी करायची आहे.
रथ सप्तमी शुभ मुहूर्त:
रथ सप्तमी ह्या दिवशी सकाळी स्नानाचा शुभ मुहूर्त 5 वाजून 23 मिनिट पासून 8 वाजे पर्यन्त आहे. ह्या वेळेत स्नान करून सूर्य देवाला अर्ध्य द्यायचे आहे.
रथ सप्तमी पूजा विधि:
रथ सप्तमी ह्या दिवशी ब्राह मुहूर्तच्या वेळी स्नान करून सूर्य देवाला तांब्याच्या कलशमध्ये पाणी भरून दोन्ही हातांनी हळू हळू अर्ध्य द्या, असे करताना सूर्य देवाचा मंत्र जाप करा. अर्ध्य दिल्यावर तुपाचा दिवा लाऊन सूर्य देवाची पूजा करा मग लाल रंगाचे फूल, धूप व कपूर वापरा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते व प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
सूर्य देवाचे मंत्र:
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ।
ॐ सूर्याय नम: ।
ॐ घृणि सूर्याय नम: ।
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।
ऊँ आदित्याय विदमहे प्रभाकराय धीमहितन्न: सूर्य प्रचोदयात्।।
ऊँ सप्ततुरंगाय विद्महे सहस्त्रकिरणाय धीमहि तन्नो रवि: प्रचोदयात्।।

रथ सप्तमी का महत्व:
रथ सप्तमी ह्या दिवशी भगवान सूर्यची पूजा अर्चा केल्याने साधकाला अक्षय फळ मिळते, तसेच सूर्य भगवान प्रसन्न होऊन सुख समृद्धी व चांगले आरोग्य प्राप्त होऊन आशीर्वाद मिळतात. ह्या दिवशी सूर्या कडे पाहून सूर्य स्तुति केली तर त्वचा रोग दूर होऊन डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. ह्या दिवशी पूर्ण श्रद्धेने व्रत केल्यास वडील-मुलाचे प्रेम वाढते.
रथ सप्तमीच्या दिवशी करा हे उपाय:
रथ सप्तमीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा करून उपवास करून तांब्याची भांडी, लाल वस्त्र, गहू, लाल चंदन, गरम कपडे, किंवा लाल रंगाच्या वस्तु दान करणे शुभ मानले जाते. हा उपाय केल्याने कुंडली मधील सूर्य दोष दूर होतो. त्याच बरोबर परिवारात आनंद येतो.
रथ सप्तमीच्या दिवशी सूर्य देवाच्या 7 घोड्यांनी पुन्हा वेग घेतला, त्यामुळे असे म्हणतात की ह्या दिवशी सूर्य देवाची पूजा अर्चा मंत्र जाप केल्यास आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात. ह्या दिवशी लाल चंदनाचे उपाय केल्यास आपल्या जीवनात बरेच फायदे होतात. ह्या दिवशी सूर्याल अर्ध्य देताना पाण्यात लाल चंदन मिक्स करून जल अर्पण करावे त्यामुळे कुंडलीतील स्थिति मजबूत बनते व आपल्या जीवनात प्रगती होते.
रथ सप्तमी ह्या दिवशी लाल रंगाच्या कापडात लाल रंगाचे चंदनची चिमूटभर पावडर बांधावी मग ते कापड अशोकाच्या झाडाला लटकवावे असे केल्याने आपल्या कोणत्या सुद्धा शुभ कार्यात अडथळे दूर होऊन आर्थिक समस्या सुद्धा दूर होतात.
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व अभ्यासाच्या खोलीत लाल चंदन ठेवल्याने व्यवसायात प्रगती होते व करियरमध्ये यश मिळून प्रगती होते.