चटपटीत कोल्हापुरी ओली भेळ मुलांच्या नाश्तासाठी
Chatpati Kolhapuri Oli Bhel For Kids Nashta In Marathi
भेळ म्हंटले की तोंडाला पाणी सुटते. ओली भेळ म्हंटले की सर्वाना आवडते. आज आपण कोल्हापुरी पद्धतीने ओली भेळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. अश्या प्रकारची भेळ बनवताना आपण गोड चटणी व हिरवी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ह्या चटण्या खूप टेस्टि लागतात. त्याने भेळ खूप टेस्टि बनते.
ओली भेळ आपण मुलांच्या नाश्तासाठी किंवा संध्याकाळी नाश्तासाठी सुद्धा बनवू शकतो. किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर तेव्हा सुद्धा बनवू शकतो. ओली कोल्हापुरी स्टाइल भेळ मस्त चमचमीत लागते.
साहित्य:
1 बाउल चुरमुरे
1 बाउल फरसाण
1/2 बाउल शेव
2 टे स्पून शेगदाणे (भाजलेले)
1 मध्यम आकाराचा टोमॅटो (चिरून)
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
1/2 वाटी कोथिंबीर (चिरून),
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
1/2 टी स्पून मीठ,
गोड चटणी
जरूरत नुसार
हिरवी चटणी जरूरत नुसार

कृती: गोड चटणी बनवण्यासाठी: 1 कप चिंच घेऊन त्यामध्ये 1 1/2 कप पाणी, 1/2 कप गूळ, 1/2 टी स्पून काळे मीठ, 1/2 टी स्पून बडीशेप (भाजून), 1/4 टी स्पून साधे मीठ, 1/4 टी स्पून लाल मिरची पावडर घालून 15 मिनिट मिश्रण शिजवून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमद्धे वाटून घ्या.
हिरवी चटणी करिता: मिक्सरच्या भांड्यात 1 कप कोथिंबीर, 1/2 कप कांदा पात, 1 छोटा तुकडा आले, 2 हिरव्या मिरच्या 4-5 लसूण पाकळ्या, 1/2 टी स्पून बडीशेप, काळे मीठ चवीने, 1 टे स्पून पाणी घालून वाटून घ्या.
कोल्हापुरी पद्धतीने ओली भेळ कृती: एका बाउल मध्ये चुरमुरे, फरसाण, शेव मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये भाजलेले शेगदाणे, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी चटणी, गोड चटणी लागेल तशी घाला, मीठ घालून मिक्स करून घ्या.
एका प्लेटमध्ये ओली भेळ सर्व्ह करा, सर्व्ह करताना वरतून, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो व शेव घालून सजवून सर्व्ह करा.