जया एकादशी 2025 शुभ मुहूर्त, महत्व व उपाय काय आहेत?
Jaya Ekadashi 2025 Shubh Muhurat, Mahatva And Upay In Marathi
जया एकादशी एक महत्वपूर्ण व्रत आहे. जे माघ महिन्यात शुल्क पक्ष ह्या तिथीला साजरे केले जाते. हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रत हे विशेष मानले जाते. एकादशी ही डर महिन्यात दोन वेळा येते. एक शुक्ल पक्ष व दुसरी कृष्ण पक्षमध्ये. ह्या एकादशीला अन्न व पाणी काही सुद्धा सेवन केले जात नाही. ह्या दिवशी साधक सकाळी लवकर उठून श्री हरी विष्णु ह्यांची पूजा अर्चा करतात.
जया एकादशी ही माघ महिन्यात शुक्ल पक्ष ह्या तिथीला साजरी करतात. ही एकादशी भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी व्रत व पूजा अर्चा केल्याने सर्व पापा पासून मुक्ती मिळून मोक्ष मिळतो. असे म्हणतात की जी व्यक्ति एकादशीचे व्रत करते तिला पुढच्या जन्मात दिव्य सुख व विष्णु लोकमध्ये स्थान प्राप्त होते. चला तर मग पाहूया 2025 मध्ये जया एकादशी कधी आहे तसेच विष्णु पूजा करायची शुभ वेळ व महत्व काय आहे.
जया एकादशी व्रत 2025 तिथि:
हिंदू धर्मा नुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी 7 फेब्रुवरी रात्री 9 वाजून 26 मिनिट पासून सुरू होत असून तिथी समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 फेब्रुवरी रात्री 8 वाजून 15 मिनिट होत आहे. म्हणून जया एकादशी व्रत 8 फेब्रुवरी 2025 शनिवार ह्या दिवशी आहे.
जया एकादशी व्रत 2025 पूजा शुभ मुहूर्त:
पंचांग अनुसार जया एकादशीच्या दिवशी मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त सकाळी 5 वाजून 21 मिनिट पासून सकाळी 6 वाजून 13 मिनिट पर्यन्त आहे.
विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 26 मिनिट पासून 3 वाजून 10 मिनिट पर्यन्त आहे.
गोदुली मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिट पासून 6 वाजून 30 मिनिट पर्यन्त आहे.
निशिता मुहूर्त रात्री 12 वाजून 9 मिनिट पासून 1 वाजून 1 मिनिट पर्यन्त आहे.

जया एकादशी व्रत पूजा विधि:
जया एकादशी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान कारा. मग भगवान विष्णु ह्याच्या मूर्तीला गंगाजलनी अभिषेक करून त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र, चंदन, फूल व धूप-दीप अर्पित करा. भगवान विष्णु ह्यांना फळ, मिठाई व तुळशीचा भोग दाखवावा. मग विष्णु मंत्र जाप करून व्रत कथा वाचावी.
जया एकादशी व्रत महत्व: धार्मिक मान्यता अनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापा पासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो. ह्या दिवशी व्रत केल्याने व्यक्तिच्या जीवनात सुख-समृद्धी व शांती प्राप्त होते. हे व्रत भगवान विष्णुना समर्पित आहे त्यामुळे त्यांची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते.
जया एकादशीला करा हे उपाय:
जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लाऊन विधी पूर्वक पूजा करावी. त्याच बरोबर भगवान विष्णु चालीसाचे वाचन करावे. त्यामुळे भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळते. त्याच बरोबर धनलाभ होतो.
जया एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळ्या रंगाचे फळ व फूल अर्पित करावे. भगवान विष्णु ह्यांना पिवळा रंग अतिप्रिय आहे त्यामुळे त्यांना पिवळे वस्त्र, पिवळे फळ व पिवळे फूल अर्पित केल्याने ते प्रसन्न होऊन सुख-समृद्धी व आशीर्वाद मिळतात.
जय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांच्या बरोबर तुळशी माताची पूजा करणे शुभ मानले जाते. तुळशी समोर तुपाचा दिवा लाऊन भगवान विष्णु ह्यांचा मंत्र जाप करावा व भगवान विष्णु ह्यांना तुळशी पत्र अर्पित करावे त्यामुळे श्री हरी प्रसन्न होतात व जीवनात विविध कष्टा पासून मुक्ती मिळते.