11 का 12 फेब्रुवारी? माघ पूर्णिमा व्रत 2025 तिथी, महत्व, उपाय केल्याने मिळेल धनसंपत्ती व आशीर्वाद
Magh Purnima Vrat 2025 Tithi, Mahatva And Upay In Marathi
माघ पूर्णिमा व्रत कधी करायचे ह्याबाबत काही कंफ्यूजन आहे. कारणकी पूर्णिमा तिथी 11 व 12 ह्या दोन्ही दिवशी आहे. पूर्णिमा तिथीचे व्रत हे सर्व शास्त्रा मध्ये उत्तम असून फलदायी आहे असे सांगितले आहे. पण प्रतेक महिन्याच्या पूर्णिमा तिथीला व्रत केल्याने विविध फळ प्राप्त होतात. पण ह्या वेळी माघ पूर्णिमा तिथी बद्दल लोकांमध्ये कंफ्यूजन आहे. तर आपण माघ तिथीला चंद्रोदय कधी आहे ते पाहू या त्यावर माघ पूर्णिमा कधी आहे ते समजेल.
माघ पूर्णिमा पवित्र मानली जाते. कारणकी ह्या दिवशी चंद्र देव आपल्या संपूर्ण केलेमध्ये असतो. माघ पूर्णिमा ह्या दिवशी स्नान, दान व जाप करणे खूप फलदायी मानले जाते. असे म्हणतात की माघ महिन्यात सर्व देवी देवता गंगा स्नान करण्यासाठी धर्तीवर येतात. असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान विष्णु स्वयं गंगानदीच्या पाण्यात वास्तव्य करतात.
माघ पूर्णिमा व्रत 11 का 12 फेब्रुवारीला?
पंचांग नुसार 11 फेब्रुवरी संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिट पासून पूर्णिमा सुरू होत असून 12 फेब्रुवरी संध्याकाळी 6 वाजून 53 मिनिट पर्यन्त आहे. म्हणून 12 फेब्रुवरी ह्या दिवशी व्रत ठेवायचे आहे. ह्या दिवशी स्नान, दान व काही उपाय करावयाचे आहेत.
माघ पूर्णिमा महत्व:
माघ महिन्यातील पूर्णिमा तिथी ही विशेष मानली जाते. कार्तिक महिन्याच्या पूर्णिमाला जसे महत्व आहे तसेच ह्या पूर्णिमाचे सुद्धा महत्व आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु ह्याची पूजा अर्चा करा. पितरांचे श्राद्ध करा, गरीब लोकांना भोजन द्या, वस्त्र किंवा गरम कपडे द्या, गूळ, तीळ, तूप, मोदक, फळ, अन्न दान करा, ब्राह्मणांना भोजन द्या, व पूजा पाठ करा.
माघ पूर्णिमा चंद्रोदय वेळ:
12 फेब्रुवरी माघ पूर्णिमा चंद्रोदय संध्याकाळी 6 वाजून 53 मिनिट ला होत असून ह्या वेळी चंद्राला अर्ध्य द्यायचे आहे.
माघ पूर्णिमा पूजा विधि:
माघ पूर्णिमा ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्य देवाला अर्ध्य देवून व्रत संकल्प करा.
त्या नंतर पूजा घर साफ करून भगवान विष्णु या माता लक्ष्मीची पूजा करा.
लाकडी चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरूण मग भगवान विष्णुह्या पंचामृत नी स्नान घालून वस्त्र घालून त्यांची चौरंगावर स्थापना करावी. हळद-कुंकू, फूल अर्पित करून गोड पदार्थाचा नेवेद्य दाखवावा. कथा आइकावी व आरती म्हणावी.
माघ पूर्णिमा ह्या दिवशी भगवान विष्णु, भगवान हनुमान व माता लक्ष्मी ह्यांची उपासना केली जाते. ह्या दिवशी मनोभावे पूजा अर्चा केल्याने भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होते.
माघ पूर्णिमा ह्या दिवशी करावयाचे उपाय:

धन समृद्धीचा आशीर्वाद मिळण्यासाठी:
जीवनात धन समृद्धीचा आशीर्वाद मिळण्यासाठी माघ पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची उपासना करा त्याच बरोबर माता लक्ष्मी ला 11 कवड्या अर्पित करून हळदीचा टिळा लावावा.
तुळशी माताची करा उपासना:
माघ पूर्णिमा ह्या दिवशी माता तुळशीची पूजा करा तुळशी ही माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. संध्याकाळी तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावावा.
पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पित करा:
माघ पूर्णिमा तिथीला सकाळी स्नान झाल्यावर पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करून काही गोड पदार्थ नेवेद्य महणून ठेवा.