गव्हाच्या पिठाचे समोसे | मिनिटात कुरकुरीत खुसखुशीत ढेरसारे मिनी समोसे
Zatpat Wheat Flour Mini Samosa | No Maida Healthy Samosa In Marathi
आपण समोसे बनवतो. समोसे हे सर्वाना प्रिय आहेत. पण मैदा वापरुन समोसे बनवले तर ते टेस्टि लागतात पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. तसेच आपण अश्या प्रकारे समोसे बनवले तर टेस्टि तर बनतातच व झटपट ढेर सारे समोसे बनवू शकतो ते एका ट्रिकने.
The Zatpat Wheat Flour Mini Samosa | No Maida Healthy Samosa In Marathi can be seen on our You tube Chanel Zatpat Wheat Flour Mini Samosa | No Maida Healthy Samosa
आपण समोसे बनवताना आपण मैदा आयवजी गव्हाचे पीठ वापरणार आहोत त्यामुळे समोसे छान तर लागतातच व खुसखुशीत लागतात. तसेच सारणासाठी उकडलेले बटाटे वापरले आहेत. अश्या प्रकारचे मिनी समोसे आपण झटपट बनवू शकता.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 16 समोसे बनतात
साहित्य:
आवरणासाठी:
1 कप गव्हाचे पीठ
1 टे स्पून रवा
1/2 टी स्पून ओवा
1 टे स्पून कोथिंबीर
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
2 टे स्पून तेल (मोहन गरम तेल)
मीठ चवीने
तेल समोसे तळण्यासाठी
सारणासाठी:
2 मध्यम आकाराचे बटाटे
1 छोटा कांदा चिरून
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची कुटून
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टीस्पून धने-जिरे
फोडणीसाठी:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
7-8 कडीपत्ता पाने
कृती: आवरणासाठी: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, रवा, ओवा, कोथिंबीर, चिलीफ्लेस्क, मीठ. गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करून थोडे पाणी वापरुन घट्ट पीठ मळून झाकून बाजूला ठेवा.
सारणासाठी: बटाटे उकडून, सोलून मॅश करून त्यामध्ये थोडेसे मीठ व लिंबुरस घालून मिक्स करा. आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या, कांदा चिरून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून चिरलेला कांदा घालून थोडासा परतून त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची घालून परतून त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून मिक्स करून कुस्करलेला बटाटा घालून मिक्स करून कोथिंबीर घालून परत मिक्स करून थोडेसे गरम करून विस्तव बंद करा.
समोसे बनवण्यासाठी: मळलेल्या पिठाचे दोन भाग करून घ्या, एक भाग घेऊन लाटून घ्या, लाटल्यावर सुरीने त्याचे एकसारखे त्रिकोणी 8 भाग करून घेऊन प्रतेक भागावर एक चमचा सारण ठेऊन गोलाकार भागाची दोन्ही टोके जोडून वरचा त्रिकोणी भाग मुडपून समोसाचा आकार द्या. अश्या प्रकारे सर्व समोसे बनवून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये समोसे खमंग कुरकुरीत होई पर्यन्त तळून घ्या. सर्व समोसे तळून झालेकी गरम गरम समोसे सर्व्ह करा.