In 20 Minutes Healthy Veg Paneer Pulao In Pressure Cooker For Kids In Marathi
झटपट हेल्दी व्हेज पनीर पुलाव मुलांसाठी 20 मिनिटात कुकरमद्धे
मुलांना रोज जेवणात किंवा डब्यात निरनिराळे पदार्थ पाहिजे असत्तात. पण आपण विचार करतो की मुलांचा डब्बा किंवा जेवण ही हेल्दी असायला पाहिजे.
आज आपण मुलांच्या आवडीचा हेल्दी पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे व्हेज पनीर पुलाव. व्हेज पनीर पुलाव ही एक मस्त हेल्दी व चोप छान डिश आहे तसेच झटपट स्वादिष्ट होणारी आहे.
The In 20 Minutes Healthy Veg Paneer Pulao In Pressure Cooker For Kids In Marathi can be seen on our You tube Chanel In 20 Minutes Healthy Veg Paneer Pulao In Pressure Cooker
व्हेज पनीर पुलाव बनवताना आपण गाजर, मटार, बिन्स, कांदा वापरले आहे त्यामुळे त्याची टेस्ट अजून वाढते. व्हेज पनीर पुलाव आपण इतर वेळी कोणी पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो तसेच बनवायला सुद्धा सोपा आहे व झटपट होणारा आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 वाट्या बासमती तांदूळ
250 ग्राम पनीर
1 मध्यम आकाराचा कांदा (उभा पातळ चिरून)
1 छोटे गाजर (सोलून चिरून)
2 टे स्पून मटार
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
मसाले:
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून बिर्याणी मसाला
2 टे स्पून कोथिंबीर (धुवून चिरून)
2 टे स्पून पुदिना (धुवून चिरून)
मीठ चवीने
फोडणी करिता:
3 टे स्पून तेल
1 टे स्पून तूप
1 टी स्पून शहाजिरे
2 लवंग
1” दालचीनी तुकडा
7-8 मिरे
1 चक्रफूल
1 तमालपत्र
कृती: व्हेज पनीर पुलाव बनवताना होममेड पनीर वापरणार असालतर प्रथम पनीर बनवून घ्या. तांदूळ धुवून अर्धातास बाजूला ठेवा. कांदा उभा पातळ चिरून घ्या, बिन्स चिरून घ्या, गाजर धुवून सोलून चिरून घ्या, आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून पनीरचे तुकडे थोडेसे गरम करून घ्या. कुकरमद्धे 2 टे स्पून तेल व 1 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये शहाजिरे, लवंग, मिरे, दालचीनी, तमालपत्र, चक्रफूल घालून चिरलेला कांदा घालून 2 मिनिट मंद विस्तवावर थोडा परतून त्यामध्ये चिरलेली बिन्स, गाजर, मटार घालून दोन मिनिट परतून घेऊन तांदूळ घालून 2-3 मिनिट मंद विस्तवार परतून घ्या.
मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला, मीठ घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये 3 वाट्या पाणी घालून मिक्स करा, (पाणी घेताना ज्या वाटीचे तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने पाणी घ्यावे.)
आता त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर व पुदिना घालून पनीर घालून कुकरचे झाकण लावून एक शिट्टी काढावी. मग कुकर थंड झाल्यावर झाकण काढून व्हेज पनीर पुलाव सर्व्ह करावा.
व्हेज पनीर पुलाव सर्व्ह करताना वरतून कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा. मुलांचे जेवण किंवा डब्बा मिनिटांत संपेल व मुले आवडीने खातील.