मोक्षदा एकादशी करा हे उपाय धन संपत्ति व वास्तु दोष प्रतेक समस्याचे निराकरण होईल
Mokshada Ekadashi 2024 Upay In Marathi
प्रतेक महिन्यात दोनवेळा एकादशी व्रत केले जाते. सगळ्या तिथीमध्ये एकादशी तिथी ही महत्वाची मानली जाते. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. आपण मोक्षदा एकादशीच्या दिवशी प्रभू श्रीहरी व धनाची देवी लक्ष्मी माताची कृपा मिळण्यासाठी काय उपाय करावे.
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी तिथीवर मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाते. ह्या वर्षी 11 डिसेंबर 2024 बुधवार ह्या दिवशी मोक्षदा एकादशी आहे.
The Mokshada Ekadashi 2024 Upay In Marathi can be seen on our You tube Chanel Mokshada Ekadashi 2024 Upay
भगवान विष्णु प्रसन्न होतील:
मोक्षदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाच्या समोर तुपाचा दिवा आवश्य लावावा. त्यानंतर तुलसी रोपाला 11 प्रदक्षिणा घालाव्या. प्रतेक प्रदक्षिणाच्या वेळी ॐ वासुदेवाय नम: ह्या मंत्राचा जाप केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतील. एक गोष्ट लक्षात ठेवा की एकादशीच्या दिवशी तुळशीला कधी सुद्धा पाणी अर्पण करू नये. कारणकी तुळशी ह्या दिवशी निर्जल व्रत ठेवत असते.
मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा झाल्यावर विष्णु सहस्त्रनामचे वाचन करावे. असे केल्याने भगवान विष्णुची कृपा आपल्याला मिळून सुख समृद्धीमध्ये वाढ होते. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच सौभाग्यमध्ये वृद्धी होते. मोक्षदा एकादशीच्या दिवशी काही उपाय केले तर धना संबंधित प्रश्न सुटतील.
विष्णु सहस्त्रनाम पाठ:
मोक्षदा एकादशीच्या सकाळी स्नान करून पूजा अर्चा झाल्यावर विष्णु सहस्त्रनामचे वाचन करावे. असे केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होऊन सर्व दुखांचे हरण करून सुख प्रदान करतील.
कामधेनूची मूर्ती आणावी:
आपल्या कडे धन टिकत नसेलतर व आपल्यावर कर्जाचा बोजा झाला असेलतर मोक्षदा एकादशीच्या दिवशी कामधेनूची मूर्ती घरी आणून स्थापन करावी. कारणकी कामधेनु मध्ये 33 कोटी देवी देवताचा निवास असतो. व घरात कामधेनूची मूर्ती ठेवल्याने आर्थिक प्रगती होईल.
पांढऱ्या हत्तीची मूर्ती आणावी:
मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्या घरात पांढऱ्या हत्तीची मूर्ती आणावी. असे केल्याने घरातील वास्तु दोष पासून मुक्ती मिळून जीवनात सुख समृद्धीचे आगमन होईल.
केळ्याच्या वृक्षाची पूजा करावी:
एकादशीच्या केळ्याच्या वृक्षाची पूजा करणे अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. शास्त्रा नुसार केळ्याच्या वृक्षामध्ये भगवान विष्णुह्यांच्या वास असतो. म्हणून ह्या दिवशी पूजा करणे विशेष महत्वाचे मानले जाते. जर कोणाच्या कुंडलीमध्ये गुरु ह्या ग्रहाची स्थिति कमजोर असेल तर एकादशीच्या दिवशी केळ्याच्या वृक्षाची पूजा करणे शुभ मानले जाते.
विडयाच्या पानाचा उपाय:
एकादशीच्या दिवशी स्वच्छ विडयाचे पान घेऊन त्यावर केसरमध्ये 1-2 थेंब पाणी किंवा दूध मिक्स करून त्याने ‘श्रीं’ लिहावे. मग ते पान भगवान विष्णु ह्यांच्या चरणाशी श्रद्धापूर्वक ठेवावे. मग दुसऱ्या दिवशी ते पान आपण जेथे धन ठेवतो तेथे ठेवावे. त्यामुळे आर्थिक तंगी दूर होईल.