मार्गशीर्ष गुरुवारचे सटीक उपाय माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कृपा मिळेल
Margashirsha Guruvar Satik Upay In Marathi
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत बाकीच्या गुरुवारच्या तुलनेने खूप खास मानले जाते. भगवान श्रीकृष्ण ह्यांनी स्वतः मार्गशीर्ष महिन्याचे महत्व सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण ही भगवान विष्णु ह्यांचे अवतार आहेत व भगवान श्रीहरी ह्यांची पूजा माता लक्ष्मी च्या बिना पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच मार्गाशीष महिन्यातील गुरुवारी केले जाणारे उपाय त्याने जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.
The Margashirsha Guruvar Satik Upay In Marathi can be seen on our You tube Chanel Margashirsha Guruvar Satik Upay
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केले जाणारे उपाय:
गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
घरातील देवघर स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे.
चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरूण भगवान विष्णु व माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी.
भगवान विष्णु ह्यांची मनोभावे पूजा करून पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करावे.
भगवान सत्यनारायण ह्यांची कथा आइकावी.
भगवान विष्णुना गूळ, चणे व पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करावे.
घराच्या मुख्य दरवाजा जवळ दिवा लावावा.
कोणाला सुद्धा पैसे उधार देवू नयेत.
मार्गाशीष महिन्यात विष्णुसहस्त्रनाम, भगवत गीता व गजेन्द्रमोक्ष ह्याचे वाचन करावे.
सन्न झाल्यावर ब्राह्मण च्या कडून पितृ तर्पण व पितृ पूजा करावी.
गुरुवार ह्या दिवशी चुकून सुद्धा केस किंवा नख कापू नये.
गुरुवारच्या दिवशी कोणाची सुद्धा निंदा करू नये.
आपले माता-पिता, बहीण, भाऊ, कन्या ह्याचा अनादर करू नये.
मान्यता अनुसार मार्गाशीस महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते व असे म्हणतात की ह्या दिवशी ज्या घराची साफ-सफाई होते तेथे माता लक्ष्मी वास करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ ठेवा.
गुरुवारच्या दिवशी आपले घराचे मुख्य दार व समोरील आंगण स्वच्छ करून रांगोळी काढा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. गुरुवारच्या दिवशी मुख्य दरवाजा जवळ माता लक्ष्मीची पावल काढायला विसरू नका कारण पावल काढण खूप शुभ मानले जाते. त्यामुळे धनप्राप्ती होते.
माता लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांची विधीपूर्वक पूजा करावी. ह्या दिवशी माता लक्ष्मीला खीरचा नेवेद्य दाखवावा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व भगवान विष्णु ह्यांना चणे व गूळचा भोग दाखवावा.
मार्गाशीष महिन्यातील गुरुवारी गाईला गूळ, चनाडाळ हळद मिक्स करून सेवन करायला द्यावे त्यामुळे भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळते गाईला कुंकवाचा टिळा लाऊन तिची पूजा केल्याने जीवनातील सर्व परेशानी दूर होतात.