Simple Home Remedies For Skin In Winter Season in Marathi

Simple Home Remedies For Skin In Winter Season
Simple Home Remedies For Skin In Winter Season

घरगुती नुस्खे थंडीमध्ये स्कीनची काळजी कशी घ्यायची व सोपे उपाय 

थंडीचा सीझन चालू झाला की सर्वजण शुष्क व कोरडी त्वचा ह्या समस्या पासून परेशान होतात. मग बाजारातून महागडी मॉश्चराइजर व बॉडी लोशन वापरली जातात. प आपल्याला माहिती आहेका थंडीच्या सीझनमध्ये आपल्या स्कीनची का काळजी घ्यायची आहे.

The text Simple Home Remedies For Skin In Winter Season in Marathi be seen on our You tube Chanel Simple Home Remedies For Skin In Winter Season

मॉश्चराइजर व बॉडी लोशनच्या व्यतिरिक्त अजून काही पद्धतीने आपल्या स्कीनची काळजी घेऊ शकतो. जर आपण पुढे दिलेल्या टिप्स आचरणात आणल्या तर तुम्हाला लोक विचारतिलकी तुमच्या सुंदर त्वचेचे रहस्य?​​

थंडीच्या सीझनमध्ये स्कीनची काळजी कशी घ्यायची त्याच्या काही टिप्स – Winter Skin Care Tips
1. आपल्या आहारावर लक्ष द्या: Watch Your Diet
प्रतेक जणाला वाटते की आपली स्कीन तरुण दिसावी. त्यासाठी ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरले जातात. पण आपली स्कीन फक्त बाहेरूनच सुंदर असण्यापेक्षा आतून सुद्धा निरोगी असली पाहिजे. आपले खाणे-पिणे जेव्हडे हेल्दी असेल तेव्हडे चांगले. आपण थंडीच्या सीझनमध्ये ताज्या हिरव्या भाज्या व फळे सेवन केली पाहिजेत जी एंटीऑक्सिडेंट भरपूर असणारी असली पाहिजेत. त्याच बरोबर मासे, कडधान्ये, ड्रायफ्रूट, शेगदाणे व बदाम सुद्धा सेवन केले पाहिजेत.

2. मॉइश्चराइज करायला विसरू नका: Do Not Forget To Moisturize
थंडी व थंडीमधील प्रदूषण आपली त्वचा कोरडी करते. त्यामुळे चेहरा सुद्धा शुष्क दिसतो. व चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतात. त्यामुळे चेहऱ्याला आर्टिफिशियल पद्धतीने ओलावा आणण्याची जरूरी असते. त्यासाठी घरगुती पद्धतीने आपण आपली स्कीन मॉइश्चराइज करू शकतो पण थंडीच्या सीझनमध्ये रोज करा.

3. तेल थेरेपी : Oil Therapy
तेल आपल्या स्कीनसाठी जरुरीचे आहे त्यामुळे आपली स्कीन मऊ राहते. थंडीमध्ये आपण खूप गरम पाणी अंघोळीसाठी वापरतो. त्यामुळे स्कीन ड्राय होते व केसांमध्ये डैंड्रफ होतो. आपण सकाळी आंघोळ केलीकी लगेच अंगाला तेल लावावे. त्यासाठी कोकनट ऑइल किंवा ऑलिव ऑइल वापरू शकता. सरसुचे तेल किंवा बदाम तेल सुद्धा वापरू शकता.

4. ओठांची काळजी: Lip Care
आपल्याला माहिती आहेका आपले ओठ आपल्या स्कीनच्या 10 पटीने ड्राय होतात. थंडीमद्धे आपले पूर्ण शरीर झाकले जाते पण ओठ नाही. ओठ सर्वात संवेदनशील असतात ते जास्त पातळ असतात व त्याची जास्त काळजी घ्यायला पाहिजे.

5. केसांची काळजी: Hair Care
थंडीच्या सीझनमध्ये केसांची काळजी घेण्याची गरज असते. कारण की थंडीमध्ये डैंड्रफच्या समस्या जास्त प्रमाणात असतात. डैंड्रफ झालाकी केस तुटू लागतात व गळणे चालू होते.
केसांच्या काळजीसाठी ऑलिव ऑयल जास्त उपयोगी आहे. पण तेल लावताना मुळाशी लावले पाहिजे.
जर केसांमध्ये डैंड्रफ जास्त प्रमाणात झाला तर सरसूच्या तेलात एक चमचा लिंबुरस घालून मिक्स करून कसांच्या मुळाशी मसाज करा. मग एक ते दीड तासांनी मालीश करून शांपु केस स्वच्छ दुवावे व सकाळच्या कोवळ्या उन्हात केस वाळवावे पण ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवू नका.

थंडीमध्ये स्कीनची काळजी कशी घ्याल सोपे घरगुती उपात- Home Remedies For Winter Skin Care Tips

Simple Home Remedies For Skin In Winter Season
Simple Home Remedies For Skin In Winter Season

प्राचीन काळापासून स्कीनची काळजी कशी घ्यायची त्यासाठी घरगुती उपाय:
1. ग्लिसरीन : Glycerin
पाणी व सूनगंधीत वस्तुच्या बरोबर ग्लिसरीन हे कॉस्मेटिक उत्पादने बनवताना वापरतात. ग्लिसरीन आपल्या बाहेरील स्कीनच्या लेरला हाइड्रेड करते. स्कीनला मऊ व शांत ठेवते त्याच बरोबर काही जखम झालीतर लवकर बरी करते. ग्लिसरीन व गुलाब पाणी मिक्स करून ते आपण स्कीनवर लाऊ शकतो.

2. कोकनट तेल : Coconut Oil
कोकनट तेल हे प्रदूषण मुळे हानी झालेल्या स्कीनचे नुकसान भरून काढते. व इन्फेक्शन होण्यापासून बचाव करते. कोकनट तेल आपली स्कीनला नैचुरल मॉइश्चराइजर करते. कोकनट तेल आपण डोळ्याच्या खाली किंवा ओठांवर सुद्धा लाऊ शकतो.
रात्री झोपताना नारळाचे तेल लावणे फायदेमंद आहे.
हातावर नारळाच्या तेलाचे 8-10 थेंब घेऊन मालीश करा मग सकाळी उठल्यावर धुवावे.

3. पेट्रोलियम जैली : Petroleum Jelly
पेट्रोलियम जैली हे मिनिरल ऑइल व मेण ह्याचे मिश्रण आहे. ते आपल्या स्कीनसाठी फायदेमंद आहे. पण लहान मुलांनी ह्याचा वापर करू नये. टाचा किंवा ओठांसाठी सुद्धा फायदेमंद आहे.

4. कच्चे दूध व मध : Raw Milk And Honey
कच्च्या दुधामध्ये लैक्टिक एसिड व एल्फा हाइड्रॉक्सी एसिड असते. ब्युटि प्रोडक्टस बनवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. थंडीमध्ये ड्राय स्कीनला मॉइस्चराइज करण्याचे चांगले काम करते. मध आपल्या स्कीनला बऱ्याच काळ पर्यन्त मऊ ठेवते.
एक चमचा मध व दोन चमचे कच्चे दूध घेऊन चांगले मिक्स करा. मग कापसाच्या बोळयानि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिट झाल्यावर चेहरा थंड पाण्यांनी स्वच्छ धुवावा. मग मॉइश्चराइजर लावावे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.