Sharad Purnima 2021 Importance Puja Vidhi Katha And Masala Milk in Marathi

Sharad Purnima 2021
Kojagiri Poornima 2021

शरद पूर्णिमा 2021 महत्व पूजाविधी कहाणी व मसाला दूध कसे बनवायचे 

शरद पूर्णिमा 2021 धन संपत्ति देणारी पूर्णिमा 19 ऑक्टोबर 2021 ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी आकाशातून अमृत वर्षा होते असे म्हणतात.
प्रतेक महिन्याची पूर्णिमा ही धनदायक व शुभ मानली जाते. पण त्यामधील काही खास पूर्णिमा ह्या जास्त शुभ व समृद्ध मानल्या जातात. त्यामधील एक पूर्णिमा म्हणजे शरद पूर्णिमा होय. असे म्हणतात की ह्या दिवशी आकाशातून अमृत वर्षाव होतो व माता लक्ष्मी ची कृपा सदैव राहते. ह्या वर्षी कोजागिरी पूर्णिमा शरद पूर्णिमा 19 ऑक्टोबर 2021 मंगळवार ह्या दिवशी आहे. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवसापासून थंडीचा सीझन चालू होतो. शरद पूर्णिमा हा दिवस माता लक्षीला प्रसन्न करण्यासाठी खास दिवस मानला जातो. त्याच बरोबर ह्या दिवशी चंद्राची पूजा करतात.

The Sharad Purnima 2021 Importance Puja Vidhi Katha And Masala Milk can of be seen on our YouTube Channel Sharad Purnima 2021 Importance Puja Vidhi Katha And Masala Dudh

शरद पूर्णिमा महत्व:
पूर्वीच्या काळा पासून असे मानले जाते की शरद पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्षीची उत्पती समुद्र मंथन मधून झाली होती. ह्याच तिथीला धनदायक मानले जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते व जे लोक रात्री जागून माता लक्ष्मी ची पूजा अर्चा भजन कीर्तन करतात त्यांच्या घरी ती नीवास करते. असे सुद्धा म्हणतात की ह्या दिवशी रात्री दूध आटवून त्याची खीर बनवतात किंवा मसाला दूध बनवतात व ते चंद्र प्रकाशात रात्री ठेवतात त्याने मग त्यामध्ये अमृत समावले जाते असे म्हणतात.

शरद पूर्णिमा तिथी मुहूर्त:
शरद पूर्णिमा तिथी 19 ऑक्टोबर 2021 मंगळवार
पूर्णिमा आरंभ: 19 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजता
पूर्णिमा समाप्ती: 20 ऑक्टोबर 2021 बुधवार रात्री 8 वाजून 20 मिनिट

शरद पूर्णिमा ह्या दिवशी खीर का बनवतात:
शरद पूर्णिमा ह्या दिवशी खीर बनवून चांदीच्या भांड्यात ठेवावे व ते भांडे चंद्र प्रकाशात ठेवावे. रोग राई पसरत नाही

Sharad Purnima 2021
Kojagiri Poornima 2021

शरद पूर्णिमा पूजाविधी:
शरद पूर्णिमा ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. समजा हे शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून आंघोळ करावी. व स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
एका लकडी पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे कापड घालून गंगाजल शिंपडावे.
आता ह्या चौरंगावर माता लक्षीची मूर्ती किंवा फोटो ठेवून लाल रंगाची चुनरी घालावी. मग धूप, दिवा, सुगंधित फूल पान सुपारी व नेवेद्य अर्पण करावा
मग माता लक्ष्मी ची पूजा करून लक्षीचालीसा वाचावी.
मग संध्याकाळी घर स्वच्छ करून आपल्या घरच्या मुख्य दरवाजा समोर सडा रांगोळी काढून लक्षीची पावल काढून आपल्या घरातील देव्हाऱ्या पर्यन्त काढावी.
मग संध्याकाळी भगवान विष्णुची पूजा करून तुपाचा दिवा लावावा. व त्याच बरोबर तुळशीच्या समोर सुद्धा रांगोळी काढून तुपाचा दिवा लावावा.
मग तांदळाची व गाईच्या दुधाची खीर बनवून चांदीच्या भांड्यात ठेवून चंद्र प्रकाशात ठवावी. रात्र जागवून सकाळी सर्वाना खीर प्रसाद म्हणून द्यावी.

शरद पूर्णिमाची कहाणी:
एक सावकार होता त्याला दोन मुली होत्या. दोघी जणी शरद पूर्णिमाचे व्रत करत होत्या. मोठी मुलगी पूर्ण व्रत करायची व धाकटी नेहमी अर्धवट व्रत करायची त्यामुळे धाकट्या मुलीचे मूल नेहमी जन्मले की मारायचे. तिने ब्रह्मणाला ह्याचे कारण विचारले तेव्हा ब्रह्मणाने उत्तर दिलेकी तू नेहमी पूर्णिमा व्रत अर्धवट करत होतीस. त्यामुळे तुझे मूल जगत नाही. तू जर पूर्णिमा व्रत अगदी विधी पूर्वक केले तर तुझी संतती जगू शकेल.
त्यानुसार धाकट्या मुलीने शरद पूर्णिमा ह्याचे व्रत विधी पूर्वक पूर्ण केले. मग तिला मुलगी झाली पण तिची मुलगी लगेच मरण पावली. मग तिने मुलीच्या अंगावर कापड घातले व मोठ्या बहिणीला बोलवायला गेली. मोठी बहीण आल्यावर तिने बहिणीला जेथे मुलीला ठेवले होते त्या जागेवर बसायला सांगितले. जेव्हा मोठी बहीण बसणार तेव्हडयात तिचा घागरा त्या मुलीच्या अंगाला लागला व ती मरण पावलेली मुलगी लगेच रडायला लागली.

मोठी बहीण म्हणाली की तू मला पाप करायला सांगत होतीस. मी जर मुलीच्या अंगावर बसले असते तर मी बसल्यावर ती मरून गेली असती. तेव्हा धाकटी बहीण म्हणाली अग तुझ्या घागरा त्या मुलीच्या अंगाला लागला म्हणून ती जीवंत झाली. त्यानंतर धाकटी बहीण नेहमी नियमित शरद पूर्णिमाचे व्रत पूर्ण करायला लागली.

कोजागिरी पूर्णिमा करिता मसाला दूध:
मसाला मिल्क हे महाराष्टात कोजागिरी पौर्णिमेला अगदी आवर्जून करतात. हे मसला दुध पौस्टिक तर आहेच व टेस्टला पण खूप छान लागते. कोजागिरी पौर्णिमेला देवीची पूजा करून घरात देवीची पावले काढून आनंदी वातावरण ठेवले जाते. शरद पौर्णिमा ह्या दिवशी रात्री जागरण करून चांदण्या रात्री मसाला दुध आटवून सगळ्यांना दिले जाते. नाच, गायन ह्याचा प्रोग्राम केला जातो, चटपटीत भेळ व मसाला दुध बनवले जाते. मसला दुधामध्ये काजू, बदाम, पिस्ते, जायफळ पूड, वेलचीपूड व केसर वापरले आहे.

साहित्य :
१ लिटर दुध (म्हशीचे)
१ १/२ कप साखर (गोडी आपल्या आवडीनुसार)
८-१० काजू
८-१० बदाम
७-८ पिस्ते
१/४ टी स्पून जायफळ पूड
१ टी स्पून वेलचीपूड
८-१० केसर काड्या
चरोळी (आवडत असल्यास)

कृती : काजू, बदाम, पिस्ताची पूड करून घ्या. जायफळ किसून घ्या. वेलचीपूड करून घ्या.
दुध गरम करून १० मिनिट मंद विस्तवावर आटवून घ्या. त्यामध्ये साखर मिक्स करूनपरत ५-७ मिनिट आटवून घ्या.
मग त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते ची पूड, जायफळ पूड, वेलचीपूड, केसर घालून मिक्स करून घ्या.
सर्व्ह करतांना गरम-गरम सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.