Home Remedies For Back Pain Relief In Marathi

Back Pain Relief
Back Pain Relief

कंबर किंवा पाठदुखीवर सोपे घरगुती उपचार उपाय 

आजकालच्या जीवनशैली मूळे कंबर किंवा पाठीचे दुखणे वाढले आहे. काही जणांचे असे म्हणणे असते की कंबर किंवा पाठदुखी फक्त वय झाले की सुरू होते. पण तसे नाही कोणत्यासुद्धा वयामध्ये हे दुखणे सुरू होउ शकते. आज काल घरात बसून तासनतास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल वर बसून काम करावे लागते त्यामुळे अश्या प्रकारचे दुखणे सुरू होते. तसेच गर्भवती महिला किंवा मासिकपाळी च्या वेळी अश्या प्रकारचे दुखणे सुरू होते. बरेच जण एलोपेथीची औषध घेतात पण त्यामुळे तात्पुरता बरे वाटते. कंबर किंवा पाठदुखी साठी आपण घरगुती उपचार सुद्धा करू शकता.

The Home Remedies For Back Pain Relief can of be seen on our YouTube Channel Back Pain Relief

कॅल्शियम, विटामीनची कमी, आर्थराइटिस, मांसपेशिचे दुखणे, गर्भाशयमध्ये सूज, मासिक पाळी अनियमित, चुकीच्या पद्धतीने बसणे अश्या मुळे कंबर दुखणे किंवा पाठदुखी सुरू होते.

आपल्या शरीराचा भार आपल्या पाठीच्या मणक्याच्या खालच्या भागावर येतो. तसेच आपण कोणती वस्तु उचलताना वाकून घेतो तेव्हा सर्व भार कमरेवर येतो. किंवा आपण एका वेळी जास्त वेळ बसून राहिलो तरी कंबर दुखणे सुरू होते. किंवा आपल्या मास पेशीवर ताण येतो त्यामुळे सुद्धा दुखणे येते. किंवा वात किंवा कफने सुद्धा दुखणे येते.

कंबरदुखी किंवा पाठदुखीवर उपाय:
आपण डॉक्टर किंवा फिजियो थेरेपिस्टचा सल्ला घ्या. आपल्या मसल्स मजबूत होण्यासाठी एक्सरसाइज करा. आपले शरीराचे वजन कंट्रोलमध्ये ठेवा. कोल्ड किंवा हॉट पॅक ने शेका.
आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करा. खुर्चीवर बसताना किंवा उठताना पाठीला किंवा कंबरेल आराम मिळेल अश्या प्रकारे बसा. काम करताना मधून मधून उठून स्ट्रेच करा. एकदम खाली वाकू नका.
कॉम्प्युटरवर काम करताना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर 90 डीग्रीवर ठेवा. काम करताना फक्त डोळ्याच्या नजरेवर काम करा. मान सारखी हलवू नका.
मोबाइलवर बोलायचे असेल तर चालत चालत बोला. म्हणजे आपले थोडे चालणे सुद्धा होईल.
जेवण करताना पौष्टिक आहार घ्या. फास्ट फूड किंवा जंक फूड सेवन करू नका. योग्य तेव्हडा समतोल आहार घ्या.
रात्री झोपताना पाठीवर किंवा कंबरेवर दाब येणार नाही ह्याची काळजी घ्या. एका कुशीवर झोपून दोन्ही पायाच्यामध्ये उशी ठेवा.
मानसिक तनाव कमी करा. त्याने सुद्धा पाठ दुखी किंवा कंबर दुखी होते. त्यासाठी योगा, ध्यान व आलोम-विलोम करा. त्यामुळे डोके शांत राहते.

धूम्रपान करण्यामुळे सुद्धा पाठदुखीच्या समस्या होउ शकतात. धूम्रपान सोडलेतर पाठीचे दुखणे कमी होते. त्यामुळे कॅन्सर, डायबिटीज किंवा अजून काही आजार दूर होउ शकतात.

Back Pain Relief
Back Pain Relief

पाठ व कंबर दुखीवर घरगुती सोपे उपाय:
आले: आदरक: Ginger:
आले हे कंबर दुखीवर औषधा सारखे काम करते. जेव्हा सुद्धा कंबरेचे दुखणे सुरू होईल तेव्हा आले वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करा. आल्याचे 4-5 तुकडे घेऊन त्याची पेस्ट करून दुखणाऱ्या भागावर लाऊन वरतून निलगिरीचे तेल लावा.
1 12/ कप पाण्यात 4-5 आल्याचे तुकडे घालून 10-15 मिनिट मंद विस्तवावर उकळून घ्या. मग ते पाणी गाळून थंड करायला ठेवा. रोज अश्या प्रकारे पाणी बनवून सेवन करा.
½ टी स्पून काळी मिरी, 1 ½ चमचा लवंग पावडर व 1 चमचा आले पावडर घालून त्याचा हर्बल चहा बनवून सेवन करा असा चहा स्वादिष्ट लागतो त्याच बरोबर दुखणे सुद्धा कमी होते. खर म्हणजे आल्यामध्ये एंटी-इन्फ्लेमेटरी कंपाउड्स असतात. जे आपल्या दुखण्यामध्ये लाभदायक होतात. त्यामुळे महिलांच्या कंबर दुखीवर उपाय सुद्धा होतो.

तुळशीचा (Tulsi) वापर कंबर दुखीवर:
कंबर दुखीवर इलाज करण्यासाठी 1 कप पाणी घेऊन त्यामध्ये 8-10 तुळशीची पाने घालून उकळून घ्या. पाणी निम्मे आटले पाहिजे मग गाळून एक चिमूट मीठ घालून सेवन करा असे रोज करा त्यामुळे कंबर दुखीवर आराम मिळेल.

खसखसच्या सेवनाने कंबर दुखी कमी होते:
रोज सकाळी एक कप दुधा बरोबर 1 चमचा खसखस मिक्स करून सेवन करा. खसखस कंबर दुखीवर रामबाण औषधी उपाय आहे.

लसूण: Garlic:
कंबर दुखी साठी रोज सकाळी रिकाम्या पोटी 3-4 लसूण पाकळ्या सेवन करा. लसूण कंबर दुखी बरोबर शरीराच्या अजून काही भागावर फायदेमंद आहे. लसूणचे तेल बनवण्यासाठी खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये 2-3 लसूण पाकळ्या घालून गरम करा. लसूनच्या पाकळ्या काळ्या होई पर्यन्त गरम करा. मग ते तेल गाळून थंड करून त्याने मसाज करा त्यामुळे लगेच आराम मिळू शकेल.

बर्फने शेकून कंबर दुखी कमी होते:
बर्फने शेकल्याने दुखणे कमी होऊन सूज सुद्धा कमी होते. जेव्हा पण कंबर दुखी सुरू होईल तेव्हा बर्फानी शेका त्यामुळे तो भाग सुन्न होईल व आपल्याला आराम मिळेल. त्यासाठी बर्फ घेऊन तो कुटून एका कापडात बांधून दुखऱ्या भागावर ठेवून 10-15 मिनिट शेका. असे दर दोन तासांनी करा. त्यामुळे दुखने कमी होईल व आराम मिळेल.

हर्बल ऑईल:
हर्बल ऑइलनी कंबर दुखी कमी होते कारण त्यामुळे मास पेशीना मसाज होतो व दुखणे कमी होते. निलगिरी तेल, बदाम तेल, जवसचे तेल, खोबरेल तेल ई. प्रथम तेल थोडे गरम करून दुखऱ्या भागावर मसाज करा.

गव्हाच्या पिठाची चपाती व तिळाचे तेल:
गव्हाची चपाती बनवून टी एका बाजूनी भाजून घ्या दुसरी बाजू भाजायची नाही त्यावर तिळाचे तेल लेऊन कमरेचा जो भाग दुखतो तेथे ही चपाती बांधून मग झोपा सकाळी उठल्यावर कमरेचे दुखणे गायब होईल. असे रोज करा.

गरम पाण्याच्या वाफेनी शेका:
गरम पाण्याच्या वाफेनी शेकणे हा उपाय आयुर्वेदामध्ये आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्या. एक कोरड्या टॉवेल घेऊन गरम पाण्यात बुडवून पिळून घ्या. मग तो टॉवेल दुखऱ्या भागावर ठेवून शेका. त्यामुळे शरीराच्या त्वचेची छिद्र मोकळी होतील व आतपर्यंत शेक बसेल.

दुधाचे सेवन करा:
दुधामध्ये कैल्शियम भरपूर प्रमाणात असते. ते शरीरातील हाड व मासपेशी मजबूत बनतात. शरीरात कैल्शियम कमी झालेकी कंबर दुखी सुरू होते. म्हणून दुधाचे रोज सेवन करा. पाहिजे तर त्यामध्ये साखरे आयवजी मध घालून सेवन करा. तसेच नरम आसनावर बनण्याच्या आयवजी कडक आसनावर बासायची किंवा झोपायची सवय करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.