Lavang Aushadhi Gundharm Health Benefits And Side effects Of Cloves In Marathi

Lavang Benefits and Side effects
Health Benefits of Cloves

आपल्याला लवंग माहिती आहेच. लवंग इतके लहान आहे पण त्याचे सेवन करण्याचे औषधी गुणधर्म खूप आहेत. आपल्याला माहिती असेल त्याच्या सेवनाचे किती फायदे आहेत पण त्याच्या अनुभव घेतल्या शिवाय आपल्याला कसे कळणार.

The Marathi language video Lavang Health Benefits and Side effects in Marathi can of be seen on our YouTube Channel of Side effects and Health Benefits of Cloves

आयुर्वेद ग्रंथमध्ये लवंगच्या सेवनाचे बरेच गुणधर्म सांगितले आहेत. लवंगच्या सेवनाने भूक लागते, उलटी होण्याचे थांबते, पोटातील गॅस कमी होतो, कफ व पित्त दोष कमी होतो, रक्त विकार, उचकी, टिबी, ह्या रोगावर गुणकारी आहे. तसेच एक महत्वाचे म्हणजे पुरुषानसाठी लवंग सेवन करणे खूप फायदेमंद आहे. त्यामुळे स्पर्म काउंट वाढतो.

लवंग सेवन करण्याचे फायदे

Lavang Benefits and Side effects
Health Benefits of Cloves

लवंग म्हणजे काय?
लवंग ह्याच्या झाडाला साधारणपणे 9 वर्ष झाल्यावर फूल येतात. त्याच फुलांना सुकवून लवंग बनवतात. गर्भवती महिलांसाठी लवंग ही उलटी वर लाभदायक आहे. त्याचे फायदे आपण पुढे पाहूया.

पोटातील गॅसच्या समस्या दूर करते
आजकाल धकाधकीच्या जीवनात तसेच आपल्या बदलेल्या जीवनशैली मुळे आपल्याला पोटातील गॅसच्या समस्याना तोंड द्यावे लागते. अश्या वेळेस सारखा औषधांचा वापर करणे योग नाही. त्यासाठी पण कधी घरगुती उपाय करू शकतो. पोटातील गॅस साठी लवंग एक रामबाण उपाय आहे. पोटातील गॅस जाण्यासाठी रोज सकाळी अनोश्या पोटी 1 ग्लास पाण्यामध्ये 3-4 थेंब लवंगच्या तेलाचे थेंब घालावे व त्याचे पाणी प्यावे त्यामुळे लवकरच आराम मिळेल.

सर्दी खोकला ह्यासाठी फायदेमंद
सीझन बदलला की सर्दी-खोकला ह्या समस्या निर्माण होतात. लवंगचे सेवन केल्यामुळे आपल्याला ह्या समस्या पासून आराम मिळू शकतो. अश्या वेळी तोंडात एक लवंग ठेवावे. त्यामुळे सर्दी खोकला कमी होऊन गळा दुखत असेल तर कमी होतो.

तोंडातील दुर्गंध त्यामुळे कमी होतो
पायरिया ह्या तोंडातील रोगामुळे ग्रासलेले असाल किंवा बराच वेळ उपाशी पोटी राहिल्या मुळे सुद्धा तोंडाला वास येतो. तसेच दात दुखी कायमची बंद होऊ शकते. त्यासाठी 40 दिवस रोज सकाळी एक लवंग सेवन करावे.

चेहऱ्यावरील डाग धब्बे दूर करते
लवंग च्या सेवनाने आपण आपले सौदर्य वाढवू शकतो. ज्याच्या चेहऱ्यावर दाग, धब्बे, किंवा डार्क सरकल्स आहेत त्यांच्या साठी लवंग फायदेशीर आहे. त्यासाठी लवंगची पावडर बनवून फेस पॅकमध्ये किंवा बेसन मध्ये मिक्स करून लावावी. पण लवंग पावडर डायरेक्ट चेहऱ्यावर लावू नये. कारण की खूप गरम असते त्यामुळे चेहऱ्यावर आगआग होऊ शकते.

केस गळण्यावर खूप फायदेशीर
बरेच जणांचे केस गळणे किंवा केस रुक्ष होणे अश्या समस्या असतात. त्यावर लवंग खूप फायदेशीर आहे. त्यासाठी पाण्यात लवंग घालून ते उकळून ते पाणी केस धुण्यास वापरावे. त्यामुळे केसांना चमक येवून केस मजबूत बनतात.

रोग प्रतिकार शक्ति वाढते
लवंगमध्ये इम्युनिटी बूस्टरचे तत्व आहे. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते. लवंगचे नियमित सेवन केल्याने आशक्तपणा कमी होतो. तसेच लवंगमध्ये एंटीऑक्सीडेंटचे गुण आहेत.

रोज रात्री झोपण्याच्या अगोदर दोन लवंग व कोमट पाणी पिण्यामुळे फायदे
लवंगमध्ये फायबर अजून काही तत्व आहेत. जर रोज रात्री झोपण्याच्या अगोदर लवंग व गरम पाणी सेवन केले तर पोटा संबंधित आजार दूर होतील. म्हणजे पोट दुखी,, गॅस, एसिडिटी ह्या समस्या कमी होतील. तसेच बोन्समध्ये होणारे दुखणे कमी होईल. व जाइंट पेन्स पण कमी होईल.

लवंगचे अति सेवन करणे त्यामुळे नुकसान किंवा तोटे
लवंग ही आपले रक्त पातळ करण्याचे काम करते जर कोणत्या व्यक्ती रक्त पातळ करण्याचे औषध सेवन करत असेल त्यांनी किंवा रक्त संबंधीत काही तक्रारी असतील त्यांनी, किंवा कोणाची सर्जरी होणार असेल त्यांनी लवंग सेवन करू नये. ज्यांच्या रक्तात ग्लुकोजचे प्रमाण कमी आहे त्यांनी सुद्धा लवंग सेवन करू नये.

कोणाला लवंगची एलर्जी असू शकते. किंवा स्कीन रैशेज़ , सूज येत असेल तर त्यांनी लवंग सेवन करू नये.

लवंगाचे तेल स्कीनवर लावल्यावर आग होऊ शकते त्यामुळे त्याचा अति वापर करू नये. लवंगचे अति सेवन केल्याने तोंडाच्या आतील बाजूस इजा पोचू शकते. पाच वर्षाच्या आतील मुलं ह्याच्या साठी लवंग तेलाचा वापर करणे टाळावे.

डिस्क्लेमर:
ही माहिती फक्त सामान्य जाणकारी देण्यासाठी दिली आहे. जर आपल्याला कोणतासुद्धा रोग असेल तर कोणतेसुद्धा पदार्थ सेवन करण्याच्या अगोदर डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *