New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora

New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora
New Different Style Crispy Moong Dal Bhaji for nashta

अगदी निराळी कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी रेसिपी 

New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora Recipe 

भजी म्हंटले की सर्वांना आवडतात. भजी आपण नाना प्रकारची बनवतो. ह्या अगोदर आपण कांदा भजी, खेकडा भजी, बटाटा भजी बघीतली आता आपण चविस्ट मूग डाळीची भजी बघणार आहोत. आपण जेवणात किंवा नाश्त्याला भजी बनवू शकतो.

मुग डाळीची भजी बनवतांना बटाटा, कांदा, मुग डाळ, आले-लसूण-मिरची, ओवा, बडीशेप व चाट मसाला वापरला आहे. त्यामुळे त्याची टेस्ट खूप निराळी लागते व खूप क्रिस्पि सुद्धा लागतात.

The Marathi language video of this Crispy Moong Dal Bhaji can be seen on our YouTube Channel: New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी

साहीत्य:
1 वाटी मुग डाळ
2 मध्यम आकाराचे बटाटे
1 मध्यम आकाराचा कांदा
2 टे स्पून तांदळाचे पीठ
5-6 लसूण पाकळ्या
1” आले, 2 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून बडीशेप, 1/2 टी स्पून ओवा
1/4 टी स्पून हळद, 1/4 टी स्पून हिंग
2 टे स्पून कोथबिर
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी

New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora
New Different Style Crispy Moong Dal Bhaji for nashta

कृती: प्रथम मुग डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून 2 तास भिजत ठेवा. बटाटे सोलून किसून घ्या. कोथबिर धुवून चिरून घ्या. दोन तासा नंतर मिक्सरच्या भांड्यात मुग डाळ व अगदी थोडेसे पाणी, आले, लसूण व हिरवी मिरची घालून वाटून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या.

एका बाउलमध्ये वाटलेली मुगाची डाळ, किसलेला बटाटा, कांदा, तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, बडीशेप, ओवा, हिंग, कोथबिर, मीठ घालून मिक्स करून घ्या.

एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये छोटी छोटी भजी घालून मध्यम विस्तवावर गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या.
गरम गरम भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *