Tasty Crispy Cheese Corn Balls

Tasty Crispy Cheese Corn Balls
Tasty Crispy Cheese Corn Balls For Nasta

टेस्टी कुरकुरीत चीज कॉर्न बॉल्स

Tasty Crispy Cheese Corn Balls

टेस्टी कुरकुरीत चीज कॉर्न बॉल्स हे खूप टेस्टी लागतात. चीज कॉर्न बॉल्स बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. आपल्याला चीज घालून कोणती डिश बनवायची असेल तर ही मस्त डिश आहे. अश्या प्रकारची डिश आपण नाश्त्याला किंवा जेवाणात किंवा पार्टीला सुद्धा बनवू शकतो. चीज घातल्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान लागते.

चीज कॉर्न बॉल्स बनवताना बटाटे, चीज कोथबिर, आले-हिरवी मिरची घालून बनवले आहेत. आपण ह्या विडियो मध्ये एक प्रकारचे तळून घेणार आहोत व दुसर्‍या प्रकारचे शालो फ्राय करणार आहोत. त्याला मैदा व ब्रेड क्र्म्ब व टोस्ट लावून तळून घेतले आहेत. दोन्ही प्रकार मस्त लागतात.

The Marathi language video of this Cheese Corn Balls can be seen on our YouTube Channel: Tasty Crispy Cheese Corn Balls

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 12-14 बनतात

साहीत्य:
2 मोठ्या आकाराचे बटाटे
3/4 कप स्वीट कॉर्न दाणे
1” आले तुकडा
3 हिरव्या मिरच्या
2 टे स्पून कोथबिर
2 टे स्पून ब्रेड क्र्म्ब
2 मोठे चीज क्युब (किसून)
मीठ चवीने

आवरणासाठी:
2 टे स्पून मैदा
1/2 कप पाणी
1/2 कप ब्रेड क्र्म्ब
1/2 टोस्ट पावडर
तेल तळण्यासाठी

Tasty Crispy Cheese Corn Balls
Tasty Crispy Cheese Corn Balls For Nasta

कृती: प्रथम बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. स्वीट कॉर्न दाणे उकडून घ्या. ब्रेड क्र्म्ब करून घ्या. कोथबिर व हिरवी मिरची चिरून घ्या. आल किसून घ्या. टोस्टची पावडर करून घ्या. एका बाउलमध्ये मैदा व पाणी मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. चीज किसून घ्या.

एका बाउलमध्ये किसलेले बटाटे घेवून त्यामध्ये स्वीट कॉर्न दाणे, आल, हिरवी मिरची, कोथबिर, ब्रेड क्र्म्ब, मीठ व किसलेले चीज घालून मिक्स करून चांगले मळून घ्या. मग मळलेल्या मिश्रणाचे दोन भाग करून घ्या.

एका भागाचे गोल एक सारखे गोळे बनवा हे गोळे आपण डिप फ्राय करणार आहोत. दुसर्‍या भागाचे एक सारखे कटलेटच्या आकाराचे चपटे गोळे बनवा हे आपण शालो फ्राय करणार आहोत.

कढईमद्धे तेल गरम करायला ठेवा. प्रथम आपण एक गोळा घेवून आपण मैदयाच्या मिश्रणात घोळून मग ब्रेड क्र्म्ब मध्ये घोळून गरम तेलात गोळा सोडून गोल्डन ब्राऊन रंगावर मध्यम विस्तवावर छान कुरकुरीत तळून घ्यायचे. अश्या प्रकारे सर्व गोळे तळून घ्या.

नॉनस्टिक तवा गरम करून घ्या. त्यावर थोडे तेल सोडून चपटे गोळे टोस्ट पावडर मध्ये घोळून मग नॉनस्टिक तव्यावर ठेवा व बाजूनी थोडे तेल तेल घालून छान दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय करून घ्या.

टेस्टी कुरकुरीत चीज कॉर्न बॉल्स व कटलेट टोमॅटो सॉस बरोबर अथवा चटणी बरोबर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.