Diwali 2019 Dates, Puja-Vidhi, Shubh Muhurat, Timings and Mantras in Marathi

Muhurat Diwali Festival 2019
Important information about Diwali Festival 2019

दिवाळी हा हिंदू लोकांचा वर्ष भरातील एक महत्वाचा सण आहे. दीपावली ह्या सणाला दिव्यांचा सण सुद्धा म्हणतात. आपल्या भारतात दिवाळी ह्या सणाला आध्यात्मिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या खूप महत्व आहे. हा सण सगळ्या धर्माचे लोक अगदी आनंदाने साजरा करतात.

आपल्याकडे अशी दंतकथा आहे की दिवाळीच्या सणाच्या दिवशी श्री राम आपला १४ वर्षाचा वनवास संपवून आयोध्याला परत आले म्हणजे आपल्या प्रिय राजाच्या स्वागतासाठी दिवे लाऊन त्यांचे स्वागत केले. आपल्याकडे असा विश्वास आहे की ह्या दिवशी सत्याचा वीजय होऊन झूटची हार होते. आमावस्याच्या रात्री दिवे लाऊन झगमगाट होतो.

आपल्याकडे दिवाळीची तयारी एक महिना अगोदर पासून सुरु होते. आपले घर, दुकान, ऑफिस, आपल्या कामाची जागा, बाजारपेठा स्वच्छ केल्या जातात व फुलांनी व विदूत रोषणाई करून सजवले जातात.

दिवाळीचे पाच दिवस अगदी आनंदात जातात. ह्या काळात सगळे आपले मनातील वैर दूर करून एक मेकाच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुबेच्छा देतात.

Muhurat Diwali Festival 2019
Important information about Diwali Festival 2019

वसुबारस:
२४ ऑक्टोबर २०१९ गुरुवार ह्या दिवशी वसू बारस ह्या दिवशी गाईची पूजा (गोमाता) करून तिला गोडाचा नेवेद्य दिला जातो.

धनत्रयोदशी:
२५ ऑक्टोबर २०१९ धनत्रयोदशी कार्तिक कृष्ण पक्ष मधील तिसरी तिथी आहे. असे म्हणतात की धनत्रयोदशी ह्या दिवशी भगवान धन्वंतरी व लक्ष्मी माता ह्याचा जन्म दिवस आहे व ह्याच दिवशी भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे भारतात आयुर्वेद दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात. ह्या दिवशी भांडी किंवा वस्तुंची खरेदी केली जाते. तसेच चांदीचे नाणे सुधा खरेदी करतात. ह्या दिवशी लक्ष्मी पूजन साठी लक्षी माताची मूर्ती घरी आणतात..

धनत्रयोदशी ह्या दिवशी संध्याकाळी आपल्याकडे पहिला दिवा लावण्याची पद्धत आहे. तसेच ५ दिवे लावतात. घरासमोर अंगणात सडा घालून रांगोळी काढतात व त्यामध्ये रंग भरतात. तसेच दारासमोर व तुळशीमाता समोर दिवा लावतात. धनलक्ष्मी ची पूजा करून आपले भावी आयुष्य सुखी समाधानी व आरोग्यदाई जावो अशी विनंती करून धने व गुळाचा नेवेद्य दाखवतात. झाल्यावर पुढे दिलेला मंत्र जाप करतात.

पूजा मुहूर्त:
धनत्रयोदशी पूजा शुक्रवार २५/१०/२०१९
पूजा मुहूर्त: ०७:२३ ते ८: ३९ संध्याकाळी (१ तास १५ मिनिट)
कालावधी: १ तास १५ मिनिट

धनत्रयोदशी च्या दिवशी खाली देलेला मंत्र जाप करावा.
‘ॐ नमो भगवते धन्वंतराय विष्णुरूपाय नमो नमः।

नरक चतुर्थी:
२७ ऑक्टोबर २०१९ कार्तिक कृष्ण पक्ष चौथी तिथी रविवार आहे. हा दिवस म्हणजे नरक चतुर्थी ह्या दिवशी अभ्यंगस्नान करतात. शुभकाळा मध्ये चंदनाचे उटणे व तेल लावून स्नान करतात.

नरक चतुर्थी शुभकाळ मुहूर्त:
नरक चतुर्थी: रविवार २७ ऑक्टोबर २०१९
अभ्यंगस्नान वेळ: – 05:33 AM to 06:36 AM
कालावधी – 01 Hour 04 Mins
सूर्योदय स्नान करण्यासाठी – 05:33 AM
अभ्यंगस्नान सूर्योदय ते चतुर्दशी
चतुर्दशी चालू – 03:46 PM on Oct 26, 2019
चतुर्दशी समाप्ती – 12:23 PM on Oct 27, 2019

लक्ष्मी पूजन:
२७ ऑक्टोबर २०१९ अश्विन महिना कृष्ण पक्ष अमावस्या ह्या वर्षी लक्ष्मी पूजनचा रविवारचा दिवस आहे. ह्या दिवशी दुपारी व्यापारी लोक आपल्या चोपड्यांची पूजा करतात त्यासाठी दुपारी १:४८ ते ३: १३ हा काल चांगला आहे.

लक्ष्मी पूजा मुहूर्त वेळ:
लक्ष्मी पूजा रविवार, २७ ऑक्टोबर २०१९
लक्ष्मी पूजन मुहूर्त – 07:15 PM to 08:38 PM
कालावधी – 01 Hour 23 Mins
प्रदोष काल – 06:08 PM to 08:38 PM
अमावस्या तिथी चालू – 12:23 PM on Oct 27, 2019
अमावस्या तिथी समाप्ती – 09:08 AM on Oct 28, 2019

लक्ष्मी पूजन विधी खालील प्रमाणे
ह्या दिवशी संध्याकाळी भगवान गणेश व लक्ष्मी माता ची पूजा करतात.

एका स्वच्छ जागी चौरंग ठेवून त्यावर गंगाजल शिंपडावे. त्यावर भगवान श्री गणेश, लक्ष्मी माता व कुबेर व श्री यंत्र मांडावे. जवळच तांब्याचा कलश ठेवून कुमकुमची पेस्ट बनवून त्यावर स्वस्तिक काढावे. कलश मध्ये पाणी ठेवून आंब्याची पाच पाने व नारळ ठेवावा.

समोर पाच फळे, फुले, मिठाई लाह्या बतासे ठेवावे. एक कमळाचे लक्ष्मी माताला अरपावे कारण की लक्ष्मी मातांना कमळ फुल खूप प्रिय आहे. तेलाच्या दिव्याची समईलावून ५ शुद्ध तुपाचे दिवे लावावे.

श्री गणेशजी व लक्ष्मीमाताची साग्रसंगीत पूजा अर्चा करावी त्याच बरोबर कुबेर ह्याची पण पूजा करावी. भगवान ह्याची पूजा झालावर आपल्या घरातील धनाची व पैशाची पूजा करावी. म्हणजे आपल्याला मग कधी काही कमी पडत नाही.

माता लक्ष्मी साठी खाली देलेला मंत्र जाप करावा.
ॐ ह्री श्रीं क्रीं श्रीं क्रीं क्लीं श्रीं महालक्ष्मी मम गृहे धनं पूरय पूरय चिंतायै दूरय दूरय स्वाहा

बालिप्रतिपदा (पाडवा):
२८ ऑक्टोबर २०१९ बालिप्रतिपदा सोमवार कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी ह्या दिवशी गोवर्धन पूजा करतात. त्याच बरोबर भगवान श्रीकृष्ण ह्याची पण पूजा करतात. श्री भगवान कृष्ण यांना ५६ भोग दाखवतात. हा दिवस पाडवा म्हणून सुद्धा लोकप्रिय आहे. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त आहे पूर्ण दिवस शुभ मानला जातो. ह्या दिवशी नवीन घराची पूजा करून गृह प्रवेश करून कलश ठेवतात. तसेच नवीन वासूची खरेदी करतात. ह्या दिवशी महिला आपल्या पतीराजाना ओवाळून त्याच्या दीर्घयुशाची प्राथना करतात. आपले मराठी नवीन वर्ष चालू होते.

बालिप्रतिपदा: पाडवा सोमवार २८ ऑक्टोबर २०१९
बालिप्रतिपदा मुहूर्त: 03:49 PM to 06:07 PM
कालावधी- 02 Hours 18 Mins
गोवर्धन पूजा सोमवार २८ ऑक्टोबर २०१९
प्रतिपदा तिथी चालू – 09:08 AM on Oct 28, 2019
प्रतिपदा समाप्ती – 06:13 AM on Oct 29, 2019

भाऊबीज:
२९ ऑक्टोबर २०१९ मंगळवार ह्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घयुशाची प्राथना करते.

भाऊबीज मंगळवार २९ ऑक्टोबर २०१९
ओवाळण्याचा मुहूर्त: 01:31 PM to 03:49 PM
मुहूर्त कालावधी 02 Hours 18 Mins

हे दिवाळीचे पाच दिवस आपले खूप आनंदाचे जातात.
आपणा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा Happy Diwali !!

The Marathi language video of this information on the Shubh Muhurat, timings, dates, Puja-Vidhi and Mantras for Vasubaras, Dhanteras, Narak Chaturdashi, Laxmi Pujan, Balipratipada, Bhai Duj of 2019 Diwali Festival can be seen on our YouTube Channel – Important Information about Diwali Festival 2019

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.