Categories
Fish Recipes Kebab Recipes Maharashtrian Recipes Recipes in Marathi

Spicy Fish Cutlet Recipe in Marathi

फिश कटलेट: फिश किंवा माश्याचे कटलेट हे चवीला खूप टेस्टी लागतात. अश्या प्रकारचे कटलेट आपण जेवणात साईड डीश म्हणून बनवू शकतो. हे कटलेट बनवतांना मी बांगडा हा ताजा फिश वापरला आहे. प्रथम फिश साफ करून त्याचे पोट साफ करून घेवून त्याला थोडे मीठ व हळद लावून घेतली. मग तव्यावर १/२ टी स्पून तेल घालून मासे भाजून घेवून त्याचे बारीक बारीक काटे काढले व मग त्याचे कटलेट बनवले आहेत. ज्यांना मासे आवडतात त्यांना अश्या प्रकारचे कटलेट नक्की आवडतील. बांगडा ह्या माश्याचे कटलेट बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडतील.

The English language version of this Fish Cutlet Recipe can be seen here – Spicy Bangda Cutlets

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १५ बनतात

साहित्य:
२ बांगडा मासे
१/४ टी स्पून हळद
४ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१५-२० लसूण पाकळ्या
१” आले (तुकडा)
२-३ हिरव्या मिरच्या
१/२ कप पुदिना पाने (चिरून)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून दालचीनी पावडर
१ टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने
१ अंडे (फेटून)
३ टोस्ट (पावडर)
तेल कटलेट शालो फ्राय करण्यासाठी

 Fish Cutlet
Spicy Fish Cutlet

कृती:
प्रथम मासे साफ करून त्याचे पोट साफ करून धुवून घ्या. मग त्याला थोडे मीठ व हळद लावून घ्या. कांदा, आले-लसूण-हिरवी मिरची, कोथंबीर, पुदिना चिरून घ्या, बटाटे उकडून सोलून किसून घ्या. अंडे फेटून घ्या.

तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालून हळद-मीठ लावलेले फिश तव्यावर ठेवून ८-१० मिनिट मंद विस्तवावर दोनी बाजूनी भाजून मग विस्तव बंद करून मासे थंड करायला बाजूला ठेवा. मासे थंड झाल्यावर त्यातील बारीक बारीक काटे सुद्धा काढा.

कढईमध्ये १ टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आले-लसूण-हिरवी मिरची २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून मग त्यामध्ये सोलेलेल मासे, उकडलेले बटाटे, मीठ, लिंबूरस, चिरलेली कोथंबीर, पुदिना घालून एक सारखे मिक्स करा.

मग त्यामध्ये फेटलेले अंडे, दालचीनी पावडर घालून चांगले मिक्स करा. टोस्ट बारीक करून एका बाउल मध्ये ठेवा. तयार केलेल्या मिश्रणाचे एक सारखे गोळे बनवून बनवलेल्या टोस्ट पावडर मध्ये घोळून बाजूला ठेवा. अश्या प्रकारे सर्व गोळे ह्या पद्धतीने बनवून बाजूला ठेवा.

नॉन स्टिक पॅन गरम करून त्यामध्ये बनवलेले कटलेट मांडून ठेवा. मग बाजूनी थोडे थोडे तेल सोडून दोनी बाजूनी शालो फ्राय करून मंद विस्तवावर छान खरपूस भाजून घ्या.

गरम गरम फिश कटलेट टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

Share this Article

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *