Khamang Kachori Recipe in Marathi

Kachori
Khamang Kachori

खमंग कचोरी: आपण कचोरी बनवतांना नेहमी मुगाची डाळ वापरून कचोरी बनवतो. खमंग कचोरी बनवतांना जरा वेगळ्या प्रकारची बनवली आहे. अश्या प्रकारची कचोरी बनवतांना सुके खोबरे, शेगदाणे कुट, तीळ, खसखस, कोथंबीर, गोडा मसाला, गरम मसाला व लिंबूरस वापरला आहे. खमंग कचोरी ही नाश्त्याला किंवा जेवणा बरोबर सुद्धा बनवता येते. चिंचेच्या चटणी बरोबर व वरतून शेव घालून त्याची टेस्ट अजून चांगली होते.

The English language version of this Kachori recipe can be seen here – Khamang Kachori

बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २० बनतात

साहित्य: आवरणासाठी:
२ कप मैदा
१ टे स्पून बेसन
१ टे स्पून बारीक रवा
२ टे स्पून तेल (कडकडीत)
मीठ चवीने

सारणासाठी:
१ कप सुके खोबरे (किसून)
१/४ कप शेगदाणे कुट
२ टे स्पून तीळ
२ टे स्पून खसखस
१/४ कप कोथंबीर (चिरून)
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
२ टी स्पून धने-जिरे पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून गोडा मसाला
१०-१२ लसून पाकळ्या
१ लिंबूरस
साखर व मीठ चवीने
तेल कचोरी तळण्यासाठी

सजावटी साठी:
चिंचेची चटणी व शेव

 Kachori
Khamang Kachori

कृती: कोथंबीर धुऊन, चिरून नँपकीनवर १० मिनिट पसरवून ठेवा. शेगदाणे भाजून, सोलून, जाडसर कुट करून घ्या. लसून बारीक चिरून घ्या.

आवरणासाठी: मैदा, रवा, बेसन, मीठ व गरम तेल मिक्स करून त्यामध्ये थोडे पाणी वापरून घट्ट पीठ मळून २०-३० मिनिट बाजूला झाकून ठेवा. मग त्याचे एकसारखे २० गोळे बनवा.

सारणासाठी: सुके खोबरे किसून गुलाबी रंगावर भाजून घ्या. तीळ, खसखस थोडी भाजून घ्या. एका बाऊलमध्ये भाजलेले खोबरे, खसखस, तीळ, शेगदाणे कुट, कोथंबीर, हिरवी मिरची, लसून, धने-जिरे पावडर, लिंबूरस, साखर, गरम मसाला, गोडा मसाला, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.

कचोरी करीता: बनवलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन छोटी पुरी लाटून घ्या त्यामध्ये बनवलेले सारण १ टे स्पून ठेवून पुरी बंद करून थोडीशी लाटून घ्या. अश्या प्रकारे सर्व कचोऱ्या बनवून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून कचोऱ्या छान कुरकुरीत तळून घ्या.

खमंग कचोरी सर्व्ह करतांना वरतून चिंचेची चटणी व शेवने सजवून सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *