Categories
Tutorials

खजुराचे औषधी गुणधर्म

खजूर : खजूर हा चवीला गोड व पौस्टिक आहे. खजूर वाळवून त्याची खारीक बनवतात हे आपल्याला माहीत आहेच.

खजुरा मध्ये जीवनसत्व “ए”, “बी” व “सी” पुष्कळ प्रमाणात असते. खाजुरात लोह, क्यालशीयम, तांबे, आहे. “ए” जीवनसत्वमुळे शरीरातील अवयवांचा चांगला विकास होतो. “बी” जीवनसत्व ह्रुदयास हितावह आहे भूक चांगली लागते. “सी” जीवनसत्व मुळे प्रतिकारशक्ती वाढते व बाहेरील विषारी जंतूचा शरीरावर विपरीत परिणाम होत नाही तसेच ते जंतू शरीरात प्रवेश सुद्धा करू शकत नाही.

खाजुरामध्ये ८५% साखरेचे प्रमाण आहे. गोड, थंड, गुरु गुणाचा खजूर वात-पित्तशामक आहे. चक्कर येणे, पाठ दुखी,, कंबरदुखी यावर खूप उपयोगी आहे.

खजूर पचण्यास जड व शीतल असा आहे. आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी व वजन वाढवण्यासाठी खजूर दुधात उकळून घ्यावा. खजूर गरम नसून थंड आहे.

खजूर हा धातू वर्धक आहे तसेच कृमी नस्ट करतो. शरीराचा दाह होत असेल तर त्यावर खजूर खूप उपयोगी आहे. खजूर हा कफावर गुणकारी आहे, क्षय रोगात खूप उपयोगी आहे.

रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाले असता थकवा येणे, धाप लागणे, छातीत धडधडणे, अश्या वेळी खजूर खावा. खाजुरात खोकला व कफनाशक गुणधर्म आहेत. खूप काम केल्यावर थकवा आला असेलतर खजूर खावा.

स्त्रियांमध्ये पाय दुखणे, सांधे दुखणे बऱ्याच प्रमाणात आढळते. त्यासाठी एक सोपा उपाय आहे. एक कप दुध चांगले गरम करून घ्या त्यामध्ये एक टी स्पून गाईचे तूप व एक टे स्पून खारीक पावडर घालून मिक्स करून गरम गरम घ्यावे.

तुपामुळे आपल्या सांध्यांना ऑयलीन होते व खारीक पावडर मुळे आपली हाडे बळकट होतात. पण हे रोज नियमित घ्यावे त्यामुळे सांधेदुखी, गडघे दुखी होत नाही. मी स्वतः हा प्रयोग नियमित करते.

असा आहे हा खजूर गुणकारी.

Share this Article

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *