How to Gift Wrap Chocolates Recipe in Marathi
गिफ्ट द्यायला चॉकलेट पँकिंग कसे करावे:
घरी बनवलेले चॉकलेट अगदी विकतच्या चॉकलेट सारखे बनतात. चॉकलेट ही वेगवेगळ्या आकाराची बनवून त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर वापरून बनवता येतात. तसेच आपण घरी चॉकलेट बनवून गिफ्ट देण्याचा आनंद सुद्धा वेगळाच असतो.
चॉकलेट बनवून झाले की त्याला रंगीत रँपिंग पेपर बाजारात मिळतात. ते पेपर घेवून त्याला कापून त्यामध्ये चॉकलेट पँक करून घ्या. मग पारदर्शक रंगीत पेपर घेऊन पँक केलेली चॉकलेट ठेऊन पेपर गुंडाळून त्याला सँटन रिबीनने बांधून त्याला छान शेप द्या. असे पँकिंग केलेले चॉकलेट गिफ्ट द्यायला छान दिसतील. पँकिंगचे सामान बाजारात सहज उपलब्द होतात. आपल्याला पाहीजेत्या आपल्या कल्पना सुद्धा वापरून पँकिंग करता येते. गिफ्ट देतांना तुम्ही विकतचे चॉकलेट बॉक्सेस सुद्धा वापरून छान पँक करता येतील. तसेच छोटीशी बास्केट किंवा पाऊच पण वापरता येईल.

How to Gift Wrap Chocolates
लहानांन बरोबर मोठ्यांना सुद्धा चॉकलेट आवडतात. आपण वाढदिवसाला भेट म्हणून किंवा आपण कोणाच्या घरी जाणार असू तर अशी चॉकलेट बनवून छान पँक करून देता येतील. हे गिफ्ट सगळ्यांना आवडणारे सुद्धा आहे. कमी वेळात कमी खर्चात चांगले गिफ्ट तयार होऊ शकते.
Leave a comment