Categories
Maharashtrian Bhaji Preparations Recipes in Marathi Vegetable Recipes

Lal Mathachi Bhaji Recipe in Marathi

लाल माठची भाजी : लाल माठ ही एक पालेभाजी आहे. ही भाजी चवीला उत्कृष्ट लागते. जास्ती करून ही भाजी महाराष्ट्रामध्ये बनवली जाते. भाकरी बरोबर खूप छान लागते.

बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य :
१ लाल माठची जुडी (Red Amaranth)
१ टे स्पून नारळ (खोवून)
मीठ चवीने
फोडणी साठी
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१ मध्यम आकाराचा कांदा
५-६ लसून पाकळ्या (ठेचून)
२ हिरव्या मिरच्या (मोठे तुकडे करून)
१/४ टी स्पून हळद

कृती :
प्रथम लाल माठ्ची जुडी निवडून, धुवून बारीक चिरावी. कांदा बारीक चिरावा.
कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, लसूण, कांदा, हिरवी मिरची घालून २-३ मिनिट परतून घ्यावा मग त्यामध्ये हळद, मीठ व चिरलेला भाजी घालून १/४ कप पाणी घालून कढई वर झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यावी. भाजी शिजल्यावर नारळ घालून मिक्स करून घ्यावी.
गरम गरम भाजी भाकरी बरोबर सर्व्ह करावी.

The English language version of the same Lal Mathachi Bhaji is published in this – Article

Share this Article

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *