Tomato Beetroot Burfi Recipe in Marathi

टोमाटो बीटरूट बर्फी: ह्या अगोदर आपण टोमाटो व बीटरूटची वेगवेगळी बर्फी बघितली आहे. आता टोमाटो बीटरूट दोन्ही मिक्स करून बनवली आहे. ही बर्फी चवीला व दिसायला सुद्धा छान दिसते.
ही बर्फी बनवतांना बीटरूट व टोमाटो उकडून घेऊन त्याची पेस्ट करून वापरली आहे. बीटरूट व टोमाटो हे दोन्ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहेत.

The English language version of this Tomato Burfi recipe and the preparation method can be seen here – Tomato-Beet Burfi

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४०-५० वड्या बनतील

साहित्य:
१ कप बीटरूट
१/२ कप टोमाटो
२ कप नारळ (खोऊन)
१ १/२ कप साखर
२ कप दुध
१ टी स्पून वेलची पूड
२ टे स्पून बदाम-काजू तुकडे
१ टी स्पून तूप

कृती: बीटरूट व टोमाटो वेगवेगळे उकडून सोलून पेस्ट करून घ्या. नारळ खोऊन घ्या.
एका कढईमधे दुध, खोवलेला नारळ व बीटरूट पेस्ट घालून मिक्स करून घट्ट होई परंत आटवत ठेवा. मिश्र घट्ट झालेकी त्य्मध्ये साखर व टोमाटो पेस्ट घालून परत मंद विस्तवावर मिश्रण आटवत ठेवा. मिश्रण घट्ट झाली की त्यामध्ये वेलचीपूड घाला.
एका स्टीलच्या प्लेटला तुपाचा हात लाऊन त्यावर मिश्रण थापून थंड झाल्यावर वड्या कापून घ्या.

बीटरूट टोमाटो वड्या थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

© 2016, www.royalchef.info. All rights reserved.

Authors

About Sujata Nerurkar (1752 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*