Crispy Fried Arbi Recipe in Marathi

अरबी फ्राय: अरबी ही एक कंद मुळाची भाजी आहे. अरबीची भाजी, सलाड किंवा फ्राय करून घेता येते. अरबीच्या सेवनाने आपल्या शरीरात उर्जा मिळते. वजन कमी करण्यासाठी अरबीचे सेवन करणे चांगले आहे. अरबी मध्ये कॅल्शियम विटामीन “इ” “सी” भरपूर आहे. अरबीने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही तसेच हृदयसाठी व किडनी साठी चांगले आहे. एक महत्वाचे म्हणजे आपल्या शरीरात जे रोगजंतूमुळे जे विष निर्माण होते ते अरबीमुळे निघून जाते व आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.

मी अरबीची भाजी, सलाड व फ्राय करून घेते. अरबी फ्राय करतांना त्याला आधी उकडून, सोलून घेऊन थोडे दाबून त्यातील जास्तीचे पाणी काढून घेतल्याने छान कुरकुरीत होतात.

The English language version of this Talleli Arbi recipe and preparation method can be seen here – Fried Arbi

बनवण्यासाठी वेळ:
२५ मिनिट

वाढणी: २ जणासाठी

साहित्य:
६ अरबी
२ टे स्पून तांदळाचे पीठ
२ टे स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून हळद
१ टे स्पून व्हेनीगर
१/२ टी स्पून धने-जिरे पूड
मीठ चवीने
तेल अरबी फ्राय करण्यासाठी

Fried Arbi

Shallow Fried Arbi

कृती:
अरबी साफ करून पाण्यात पाच मिनिट भिजत ठेवा म्हणजे त्याची लागलेली माती निघून जाईन. अरबी स्वच्च करून मग थोड्याश्या पाण्यामध्ये कुकुरमध्ये ठेवून २-३ शिट्या काढा.
कुकर थंड झाल्यावर अरबी बाहेर काढून ठेवा. अरबी थंड झाल्यावर त्याची साले काढून घेऊन थोडेसे तळहातावर अरबी दाबून घेऊन थोडे चपटे करा.
एका प्लेटमध्ये अरबी ठेऊन त्याला मीठ, व्हेनीगर, हळद, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, तांदळाचे पीठ लाऊन १०-१५ मिनिट फ्रीजमध्ये ठेवा. नंतर फ्रीजमधून बाहेर काढा,
नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल घालून तव्यावर अरबी ठेवून बाजूनी तेल सोडून मंद विस्तवावर दोनीही बाजूनी तळून घ्या.

About Sujata Nerurkar (1897 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*