Should You Stop Pitru Tarpan in a Busy Life? | 5-Minute Pitru Tarpan at Home | Shastriya Vidhi
धकाधकीच्या जीवनात तर्पण देणे सोडावे का? घरी 5 मिनिटांत पितृ तर्पण, शास्त्रीय तर्पण विधी
हिंदू धर्ममध्ये व आपल्या संस्कृतिमध्ये पितृ पक्षमध्ये आपल्या पूर्वजांना जल देणे (तर्पण) देणे अत्यंत आवश्यक व महत्वपूर्ण मानले आहे. ते आपल्या कुल, संस्कार व आपल्या पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आहे. ज्यांच्यामुळे आज आपले अस्तित्व आहे.
पण आजचे कटू सत्य असे आहे की आज च्या वेळी 40-50 वर्षा पूर्वीची पद्धत राहिली नहे. आज काल बरेच लोक शहरात राहतात व व्यवसायात बिझी असतात किंवा नोकरी मध्ये व्यस्त झालेले असतात. सकाळी लवकर उठून रात्री उशिरा पर्यन्त घरी येतात दिवसभर नुसती धावपळ चालू असते. मग अश्या परिस्थितीत पारंपारिक पद्धतीने तर्पण कसे देता येतील.
मग एक असा मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे धकाधकीच्या जीवनात आपल्या पूर्वजांना तर्पण देणे सोडावे का?
नाही, आपल्या पूर्वजांना तर्पण न देणे किंवा तर्पण देणे एकदम सोडून देणे हे समाधान कारक नाही. जेव्हा आपल्या पितरांच्या प्रती आपली श्रद्धा व भक्ति खरी असेलतर हा प्रश्न निर्माण झालाच नाही पाहिजे. आज कालच्या धकाधकीच्या जीवनात तर्पण कसे द्यावे.
नदीमध्ये स्नान करून तर्पण देणे संभव किंवा सुरक्षित नाही.
पूर्वीच्या काली लोक सकाळी लवकर उठून नदीकाठी जाऊन स्नान करून तर्पण देत असत. पण आज कालची परिस्थिति नुसार असे करू शकत नाही.
सुरक्षा व जिवाची काळजी: आजच्या काळात नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नाही कारणकी नदीच्या पाण्याची पातळी कधी कमी-जास्त असते तसेच नदीकिनारी दलदल असते तसेच नदीमध्ये मगरी असू शकतात त्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
नदीचे पानी दूषित असते: आता लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे नदीचे पानी साफ नसते त्यामध्ये स्नान करणे योग्य नाही.
महिलांसाठी सुविधा नसतात: छोटे शहर असो किंवा मोठे शहर असो. नदीचा घाट साफ नसतो व लोकांची गर्दी सुद्धा असते त्यामुळे महिलांना नदीकिनारी स्नान करणे संभव नसते.
वेळेचा अभाव: सकाळी लवकर उठून नदीवर जाऊन स्नान करून घरी येऊन मग वेळेवर ऑफिसला जाणे शक्य नाही त्यामुळे आजकालच्या जीवन शैली मध्ये नदी घाटावर स्नान करणे संभव नाही.
शास्त्र समाधान: गरुड पुराण मध्ये किंवा स्कंद पुराण मध्ये असे सांगितले आहे की जर पवित्र नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नसेल किंवा जवळ पवित्र नदी नसेलतर घरीच अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल घालून स्नान करावे ते जल गंगाच्या पाण्या सारखेच पवित्र होते.
तर्पण देण्याची योग्य वेळ व ऑफिसचे कामकाज:
बरेच लोकांचे असे मत आहे की सकाळी लवकर उठून स्नान करून लगेच तर्पण द्यायचे. पण शास्त्रा नुसार तर्पण व श्राद्ध करण्याची योग्य वेळ दुपारची आहे. ती म्हणजे कुतुप वेळ 11;30 ते 12:30 किंवा अपराह वेळ दुपारी 1 ते 3:30 पर्यन्त आहे.
आपण जर ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी व्यस्त आहात तर आपण दुपारच्या वेळी किंवा सकाळी घरातून निघताना फक्त 5 मिनिट वेळ काढून घरीच ही क्रिया करू शकता.
पितरांना खूप मोठे कर्म कांड किंवा दिखावा नको तर आपली खरी श्रद्धा व भावना पाहिजे तसेच भक्तिपूर्वक अर्पित केलेले तर्पण म्हणजेच जल पितरांना तृप्त करू शकते.
घरीच तर्पण देण्यासाठी साहित्य:
आपल्याला फक्त योग्य ते साहित्य घेऊन तर्पण द्यायचे आहे.
एक तांब्याचा लोटा किंवा पात्र भरून जल
त्यामध्ये 2-3 थेंब गंगाजल मिक्स करा.
थोडेसे काळे तीळ पितृ तर्पण देण्यासाठी
कुशा (पवित्र गवत) जर कुशा मिळाले नाहीतर अनामिका उगली मध्ये सोन्याची अंगठी किंवा अक्षता घ्या.
पांढरी फुले जल अर्पित करताना त्यामध्ये घाला.
घरी पांच मिनिटात तर्पण देण्याच्या विधी:
आपण आपल्या घराच्या बाल्कनी किंवा गच्चीवर किंवा अंगणात साफ जागी बसून हे विधी करू शकता.
1. दिशा व पात्र तयार करा:
साफ कपडे परिधान करून दक्षिण दिशेला मुख करून उभे राहावे किंवा बसावे. मग तांब्याच्या किंवा पितळच्या पात्रा मध्ये साफ जल भरून त्यामध्ये थोडे गंगाजल व तीळ मिक्स करून घ्या.
2. कुशा व पितृ तीर्थ मुद्रा:
उजव्या हाताची अनामिका उगली कुशा घालावे मग अंगठा व तर्जनी च्या बोटानी जल हळू हळू खाली सोडावे.
3. पितरांचे ध्यान व जलांजलि:
आपले माता-पिता किंवा आजी-आजोबा किंवा अन्य कोणी पूर्वजांचे ध्यान करून मनातल्या मनात पुढे दिलेले वाक्य म्हणावे.
” हे माझे पितृदेव! मी तीळ घातलेले जल तुम्हाला अर्पित करीत आहे. ते तुम्ही स्वीकार करून माझ्या परिवाराला आशीर्वाद द्या.”

4. तीन वेळा जल अर्पित करा:
कमीत कमी 3 वेळा आपल्या हातानी जल कुंडीत किंवा खाली जमिनीवर किंवा मातीत अर्पित करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुळशीच्या रोपाला हे जल अर्पित करू नये. व जल अर्पित करताना कोणाच्या पायाखाली जाईल असे करू नये.
5. प्रणाम व क्षमा याचना:
तर्पण दिल्यावर शेवटी हात जोडून दक्षिण दिशेला तोंड करून प्रणाम करा व आपल्या हातून काही चूक-भूल झाली असेलतर क्षमा मागा.
जर 5 मिनिट सुद्धा वेळ नसेलतर काय करावे?
जर आपण जास्तच बिझी आहात व 5 मिनिट सुद्धा नाही विधी करण्यासाठी तर शास्त्रा नुसार एक अत्यंत सोपा उपाय करू शकता.
सूर्यदेव ना जाल अर्पित करा: दुपारच्या वेळी दक्षिण दिशेला मुख करून शुद्ध जल चे अर्ध्य देवून पूर्वजांचे स्मरण करा.
जीव सेवा (पंचबली): आपल्या जेवणातून एक चपाती बाजूला काढून कावळा, गाय किंवा कुत्रा ल खायला द्या. हे सुद्धा एक प्रकारे तर्पण समान आहे.
दक्षिण दिशाला दीपदान करा: संध्याकाळी घरच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावा.
सनातन धर्मचा उद्देश मनुष्य च्या जीवनात कठीण किंवा बोज जाणवेल अशी पद्धत नाही आपल्या वेळे नुसार किंवा परिस्थिति नुयायस्ट भक्ति सहज ठेवा. आपल्या व्यस्त जीवन शैली मध्ये नदीवर जाऊन स्नान करून अनुष्ठान न केल्याने काही पाप होत नाही.
खरी भक्ति व श्रद्धा व पवित्र मन ठेवून घरी 5 मिनिटात आपण जल अर्पित करू शकतो. त्यामुळे आपल्या पूर्वजांना तर्पण प्राप्त होऊंन ते परिवाराला आशीर्वाद देतात.
