Sarva Pitru Amavasya 2026 | 10 October Shani Amavasya & Gajachhaya Yog
सर्व पितृ अमावस्या 2026 | 10 ऑक्टोबर शनि अमावस्या, गजच्छाया योग | पितरांना निरोप देताना हे 3 उपाय जरूर करा!
सर्व पितृ अमावस्याला ह्या वर्षी गजच्छाया योग आहे, ह्या दिवशी कोणते उपाय करणे योग्य आहे.
आता सध्या पितृपक्ष चालू आहे. सर्वपितृ अमावस्या खूप खास मानली जाते. ह्या दिवशी सर्व पितरांना निरोप दिला जातो. ह्या दिवशी अश्या पितरांचे श्राद्ध केलेजाते ज्यांची तिथी लक्षात नाही. तसेच जर कोणी विसरले असेलतर ह्या दिवशी पितरांना जल अर्पित केले जाते. संध्याकाळी सुद्धा ह्या दिवशी काही उपाय केले जातात जे खूप खास आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया एकादशी नंतर अमावस्या पर्यन्त कोणते श्राद्ध केले जातात. ह्या वर्षी सर्वपितृ अमावस्याचा योग शनिवार ह्या दिवशी आहे व अजून काही योग येत आहेत.
एकादशी नंतर अजून कीती श्राद्ध बाकी आहेत?
7 ऑक्टोबर बुधवार ह्या दिवशी आश्विन कृष्ण द्वादशी तिथी रात्री 11:17 मिनिट पर्यन्त आहे. म्हणून ह्या दिवशी द्वादशीचे श्राद्ध होईल. ह्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध होते जे संन्यासी होते. त्यानंतर 8 ऑक्टोबर गुरुवार आश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी रात्री 10:17 मिनिट पर्यन्त आहे. ह्या दिवशी त्रयोदशीचे श्राद्ध होईल. 9 ऑक्टोबर शुक्रवार आश्विन कृष्ण चतुर्थी तिथी रात्री 09:36 मिनिट पर्यन्त आहे. ह्या दिवशी चतुर्दशी श्राद्ध होईल. ह्या दिवशी अश्या पितरांचे श्राद्ध होते जे शस्त्र-विष-दुर्घटनादि (अपमृत्यु)नी गेलेले आहेत.
शनि अमावस्या कोणत्या दिवशी आहे, कोणता योग ह्या दिवशी आहे.?
10 ऑक्टोबर शनिवार 2026 आश्विन कृष्ण अमावस्या तिथी रात्री 09:20 मिनिट पर्यन्त आहे. संपूर्ण दिवस अमावस्या तिथी राहील. ह्या दिवशी अमावस्या श्राद्ध आहे. पितृ विसर्जन होईल. असे पितर जे अज्ञात तिथी आले आहेत. त्यांचे श्राद्ध ह्या दिवशी करायचे आहे. ह्या दिवशी शनि अमावस्या आहे व गजच्छाया योग सूर्योदय पासून सूर्यास्त पर्यन्त आहे. आपल्याला माहिती आहे का? हा योग तेव्हा येतो जेव्हा सूर्य आश्विन मास कृष्ण पक्ष त्रयोदशी किंवा अमावस्याच्या वेळी हस्त नक्षत्र मध्ये व मघा नक्षत्र मध्ये असेल. तेव्हा हा योग येतो.
सर्वपितृ अमावस्या ह्या दिवशी संध्याकाळी पितरांना निरोप कसा द्यावा व कोणते उपाय करावे?
1. अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी पितरांना निरोप दिला पाहिजे. त्यासाठी दीपदान करावे. चार मुख वाला दीपक लाऊन प्रार्थना करा की आमच्या पितरांनी आपआपल्या दिशेला प्रस्थान करावे. हा दीपक दक्षिण दिशेला ठेवला पाहिजे.
2. ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी तुपाचा दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा, तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने पितृ प्रसन्न होतील. ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षा जवळ जल अर्पित करून प्रदक्षिणा करताना धागा बांधावा. ब्रह्मणला भोजन द्यावे, पांढरे कपडे दान करावे. असे म्हणतात की तुपाचा दिवा लावल्याने धन प्राप्ती होते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आरोग्य चांगले राहते व कोणते आजारपण येत नाही. व तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात.
3. अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी कपडे, छत्री, मीठ, जुते, छडी दान करावे. असे केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते.
अमावस्या श्राद्ध व तर्पणचे शुभ मुहूर्त:
पहला मुहूर्त- सकाळी 11:34 मिनिट पासून दुपारी 12:21 मिनिट पर्यन्त
दूसरा मुहूर्त- दुपारी 12:21 मिनिट पासून 1:07 मिनिट पर्यन्त
सर्व पितृ अमावस्या दान करण्याचे महत्व:
सनातन धर्ममध्ये दान करण्याला त्याग, करुणा, व परोपकारचे श्रेष्ट माध्यम मानले जाते. दान करणे म्हणजे फक्त कोणत्या वस्तुचा त्याग करणे नाहीतर आपल्या सामर्थ्य नुसार कोणत्या जरूरतमंद च्या जीवनात सहयोग व प्रसन्नता पोहचणे हा भाव आहे.
पितृ पक्ष मध्ये केलेले दान पितरांच्या निमितताने श्रद्धा अर्पित करणे हे एक माध्यम मानले जाते. गरुड पुराणमध्ये दान करण्याचे संबंध पितरांच्या तृप्तीचा उल्लेख मिळतो. ग्रंथा मध्ये सांगितले आहे की, श्रद्धा पूर्वक बंधु-बांधव द्वारा पितरांच्या निमित्ताने दिले गेलेले अन्न, धन हे पितरांना प्राप्त होते. व तसेच अन्न, जल, शाक ह्या माध्यमनी केलेले श्राद्ध पितरांना तृप्त करते.
सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी केलेले दान केवळ संसार आवश्यकता पूर्ति माध्यम नाही तर पितरांचे प्रती श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करण्याचा अवसर आहे. दान करत्या वेळी अहंकार नाही झाला पाहिजे. दान करण्याचा उद्देश म्हणजे मोठे पणा दाखवणे नाही तर देवानी देलेल्या सामर्थ्य नुसार जरूरतमंद लोकांना समर्पित करणे होय. खरोखरचे दान करण्यामध्ये श्रद्धा, विनम्रता, करुणा व सेवा भाव असला पाहिजे.

सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी कोणत्या वस्तु दान कराव्या?
सर्व पितृ अमावस्या ह्या पावन अवसरवर आपल्या सामर्थ्य नुसार अन्न,भोजन, वस्त्र, फळ, तीळ, गूळ,तांदूळ, गहू, व तूप दान करू शकता. जरूरतमंद लोकांना भोजन द्यावे, त्यांच्या आवशक्ता नुसार त्यांना मदत केली तर पुण्य प्राप्त होते.
ह्या मध्ये अन्नदान, व भोजन सेवा विशेष महत्वाची आहे. कोणी भुकेल्या व्यक्तिला श्रद्धा पूर्वक भोजन देणे मानव सेवा केल्याचे पुण्य कार्य आहे, त्यामध्ये करुणा, परोपकार व सेवाची भावना एकत्रित होते.
