शारदीय नवरात्री 2026 कलश स्थापना शुभ मुहूर्त, देवी माताचे वाहन, प्रमुख दिवस कोणते
Shardiya Navratri 2026: Kalash Sthapana Auspicious Muhurat, Goddess Durga’s Vahan and Key Days
शारदीय नवरात्री कधी सुरू होणार? कलश स्थापना शुभ मुहूर्त व माता दुर्गाची पूजा ह्याची महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या.
माता दुर्गाची आराधना करण्यासाठी सर्वात पवित्र पर्व म्हणजे शारदीय नवरात्री ह्या वर्षी 11 ऑक्टोबर रविवार पासून सुरू होणार असून 20 ऑक्टोबर मंगळवार ह्या दिवशी विजयादशमी आहे.
ह्या वर्षी नवरात्रीमध्ये एक विशेष धार्मिक मान्यता समोर आली आहे. ज्योतिषी गणना व पंचांग अनुसार, ह्या वर्षी जगत जननी माता दुर्गाचे आगमन हत्तीवर विराजमान होऊन होणार आहे. धार्मिक परंपरामध्ये माता दुर्गाचे आगमन हत्तीवर वरजमान होऊन होणार आहे ते आगमन खूप शुभ मानले आहे. असे म्हणतात की हत्तीवर विराजमान होऊन देवी मताचे आगमन खूप शुभ मानले जात असून चांगली वर्षा, कृषि मध्ये उन्नती, सुख-समृद्धी, शांती व स्थिरताचा संकेत देतो.
11 ऑक्टोबर 2026 रविवार पासून शारदीय नवरात्रीचा शुभारंभ होत आहे. ह्या दिवशी आश्विन शुल्क पक्ष प्रतिपदा तिथी आहे. विधी पूर्वक कलश स्थापना केली जाते व माता दुर्गाचे प्रथम स्वरूप माता शैलपुत्री ची पूजा करतात.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात कलश स्थापना करून माता भगवती ची आराधना सुरू केली जाते. श्रद्धालु नऊ दिवस पर्यन्त माताच्या वेग वेगळ्या रूपांची पूजा करतात. मग आपण आपल्या श्रद्धा व सामर्थ्य नुसार व्रत, जप, पाठ व साधना करावी.
कलश स्थापनाचा शुभ मुहूर्त:
पंचांग अनुसार, 11 ऑक्टोबर रविवार ह्या दिवशी चित्रा नक्षत्र व वैधृति योग आहे. कलश स्थापना सकाळी शुभ मुहूर्त 6:19 मिनिट पासून 10:12 मिनिट पर्यन्त आहे. कलश स्थापना करण्यासाठी अभिजीत मुहूर्त विशेष महत्वाचा दिला जाते. ह्या दिवशी अभिजीत मुहूर्त सकाळी 11:36 मिनिट पासून 12:24 मिनिट पर्यन्त आहे. ह्या मध्ये कलश स्थापना करणे शुभ मानले जाते.
खर म्हणजे वेगवेगळ्या शहरात सूर्योदय व स्थानीय वेळचे अंतर ह्या कारणामुळे मुहूर्त मध्ये थोडा बदलाव होतो म्हणून श्रद्धालु आपल्या येथील स्थानिक पंचांग अनुसार मुहूर्त प्रमाणे कलश स्थापना करतात.
नवरात्रीमध्ये करा दुर्गा सप्तशतीचा पाठ:
नवरात्रीमध्ये फक्त व्रत करणे हे पर्व नाही. तर ते शक्ति ची उपासना व आत्मिक साधना ची वेळ आहे असे मानले जाते. आश्विन शुक्ल पक्ष च्या नवरात्री मध्ये आदि शक्ति माता दुर्गाची आराधनाच्या बरोबर भगवान श्रीराम व रावणवर विजय मिळवणे ह्याच्याशी जोडला गेला जातो. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठन करणे व योग्य ब्राह्मण व पुरोहित कडून संकल्प करून पाठ करणे धार्मिक रूपसे पुण्यकारी मानले जाते. असे म्हणतात की माता भगवतीच्या आराधनेने घर-परिवार मध्ये सुख-शांती राहून सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो.
आता आपण पाहूया नवरात्रीमधील प्रमुख दिवस व त्याच्याशी जोडले गेलेले धार्मिक कार्यक्रम काय आहेत:
16 ऑक्टोबर 2026, शुक्रवार ह्या दिवशी बेलवरण पूजा होते. बेलवरण दुर्गा पूजा खूप महत्वाची परंपरा नुसार एक मानली जाते. खासकरून बंगाली व पूर्व भारत मधील दुर्गा पूजा परंपरा नुसार विशेष महत्वाची मानली जाते.
17 ऑटोबर 2026, शनिवार ह्या दिवशी महा सप्तमी जोडली गेलेली पूजा असते. पंचांग अनुसार, सकाळी 8:58 मिनिट च्या नंतर सप्तमीशी संबंधित पूजा केली जाते. ह्या दिवशी नवरात्री मधील काही महत्वपूर्ण परंपरा पूर्ण केल्या जातात. नौपत्रिका प्रवेश, निशा पूजा, व मुळ नक्षत्र मध्ये पूजेच्या पंडालमध्ये देवीची स्थापना केली जाते.
ह्या दिवशी श्रद्धालुना दर्शन घेण्यासाठी माता दुर्गाचे पट उघडले जाते. 17 ऑक्टोबर पासून दुर्गा पूजा उत्सव वाढत जातो व भक्त मोठ्या संखेने माताचे दर्शन करायला येतात.
18 ऑक्टोबर दुर्गा अष्टमी: 18 ऑक्टोबर, रविवार ह्या दिवशी श्री दुर्गा अष्टमीचे व्रत ठेवतात. ह्या दिवशी माता दुर्गाचे आठवे स्वरूप माता महागौरीची पूजा केली जाते.
अष्टमी ह्या दिवशी नवरात्र साधनाचे खूप महत्व मानले जाते. श्रद्धालु ह्या दिवशी व्रत ठेवतात. माता दुर्गाची पूजा करतात व आपल्या श्रद्धा अनुसार कन्या पूजन च्या बरोबर काही अन्य धार्मिक अनुष्ठान करतात. ह्या दिवशी विशेष पूजा व महानिशी पूजाचे पण विधान आहे.
19 ऑक्टोबर 2026 सोमवार ह्या दिवशी अष्टमी व नवमी तिथीची संधि बेला मध्ये संधि पूजा केली जाते. पंचांग अनुसार, संधि पूजा विशेष वेळी सकाळी 6:53 मिनिट वाजता करायची आहे. अष्टमी व नवमीचे मिलन ह्या वेळी धार्मिक दृष्टी ने खूप महत्वपूर्ण मानली जाते. म्हणून संधि पूजाला विशेष विधी-विधान व श्रद्धा ने संपन्न केली जाते. ह्या दिवशी महानवमीचे पर्व सुद्धा साजरे केले जाते.
20 ऑक्टोबर 2026, मंगळवार विजयादशमी व विसर्जन: 20 ऑक्टोबर, मंगळवार ह्या दिवशी उदय तिथी अनुसार नवमी आहे व नवमी तिथी सकाळी 9:35 मिनिट वाजे पर्यन्त आहे. त्यानंतर मग नवरात्री व्रतचे पारण केले जाईल. ह्या दिवशी विजया दशमी म्हणजेच दसरा साजरा करायचा आहे. माता दुर्गाच्या प्रतिमाला विसर्जित करायचे आहे.
माता दुर्गा हत्तीवर विराजमान होऊन आगमन करणार आहे:
धार्मिक मान्यता व ज्योतिषीय गणना नुसार , ह्या वर्षी माता दुर्गाचे आगमन हत्तीवर बसून होणार आहे. देवी माता चे हत्तीवर आगमन धार्मिक परंपरा नुसार खूप शुभ मानले जाते. हत्ती ला समृद्धी, स्थिरता व ऐश्वर्यचे प्रतीक मानले जाते. म्हणून मान्यता आहे की, देवीचे हत्तीवर बसून आगमन त्यामुळे चांगली वर्षा, कृषि मध्ये उन्नती, सुख-समृद्धी व खुशालीचे वातावरण निर्माण होते.

विशेष रूपने कृषि प्रधान समाज मध्ये चांगली वर्षा ह्याचे विशेष महत्व आहे. खर म्हणजे, येथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, देवीचे वाहनच्या संबंधित फलादेश धार्मिक मान्यता व परंपरागत पंचांग गणनावर आधारित आहे.
माता दुर्गाची आराधना करताना ठेवा श्रद्धा व संयम:
11 ऑक्टोबरला कलश स्थापना झाल्यावर शारदीय नवरात्री चे पावन पर्व 20 ऑक्टोबर ला विजयादशमी म्हणजेच दसरा संपन्न होईल. नवरात्री हा फक्त दाखवणार पर्व नाही तर आपल्या मध्ये शक्ति ची ओळख, मनाला शुद्ध करणे व माता भगवती च्या प्रती आपली श्रद्धा मजबूत करण्यासाठी ही वेळ आहे.
आपण ह्या नऊ दिवसांत माता दुर्गाच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो. माता शैलपुत्री पासून माता सिद्धीदात्री पर्यन्त देवीच्या प्रतेक स्वरूपमध्ये शक्ति, भक्ति व जीवनशी जोडलेले वेगवेगळे संदेश लपलेले आहेत.
नवरात्रीमध्ये आपल्या घरात श्रद्धा व सामर्थ्य नुसार माता भगवतीची पूजा करा, संभव असेलतर प्रतिदिन देवी मंत्राचा जाप करा, सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करा, दुर्गा सप्तशतीचे पठन करा व देवी कवचचे पठन करा. तेच बरोबर जरूरत मंद लोकांना सहाय्यता जरूर करा. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे पूजा फक्त दाखवण्यासाठी करू नका तर श्रद्धा, संयम व सकारात्मक भावना ठेवा.
आपण पुढे देवी माताची कलश स्थापना शुभ मुहूर्तवर कशी करायची व देवी मताची विविध रूप कोणती आहेत ते पाहणार आहोत.
