Pitru Paksha 2026: Should You Worship, Dress Up & Celebrate Birthdays? | Complete Guide

Pitru Paksha 2026
Pitru Paksha 2026: Should You Worship, Dress Up & Celebrate Birthdays?

पितृ पक्षात पूजा करावी का? शृंगार करावा का? जन्मदिवस साजरा करावा का? | Pitru Paksha 2026

Pitru Paksha 2026: Should You Worship, Dress Up & Celebrate Birthdays? | Complete Guide

पितृ पक्षमध्ये पूजापाठ करावे का?, शृंगार करावा का? जन्मदिवस साजरा करावा का? संपूर्ण माहिती

आता 26 सप्टेंबर 2026 शनिवार ह्या दिवसा पासून पितृपक्ष सुरू झाला असून 10 ऑक्टोबर 2026 शनिवार ह्या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे म्हणजेच पितृ पक्ष समाप्ती होत आहे. आज आपण पितृ पक्षमध्ये पूजापाठ आपण रोज देवाची पूजा करतो ती करायची का? जन्म दिवस साजरा करायचा का? तसेच महिलांनी शृंगार करायचा का? किंवा शृंगार साहित्य किंवा नवीन वस्तु खरेदी करायची का? ह्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

प्रथम आपण पाहू या रोज देवाची पूजापाठ करायचा का?
पितृ पक्षमध्ये आपण रोज पूजापाठ नियमित करायचा आहे त्यामध्ये खंड पडू देवू नका. जर आपण पूजा पाठ बंद करीत असाल तर ती खूप मोठी चूक करीत आहात.

पितृ पक्षमध्ये पूजापाठशी जोडले गेलेले काही नियम:
रोज पूजा करणे चालू ठेवा: पितृ पक्ष मध्ये कोणते सुद्धा सूतक किंवा अपवित्र वेळ नाही. म्हणून घरात रोज देवी देवतांची पूजा, आरती व भोग नियमित करीत जा.

पूजाचा क्रम: सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्य देवाला अर्ध्य द्या, तर्पण देवून पितरांचे स्मरण करा मग देवाची पूजा करा.

फ्रेमचे स्थान: घरातील मंदिरात पितरांची तसवीर देवी-देवतांच्या मूर्तीच्या जवळ ठेवू नका. पितरांची तसवीर दक्षिण दिशेला वेगळ्या जागी ठेवा.

दान व भोजन: देवांना भोग दाखवल्यावर गाय, कुत्रा, कावळा व जरूरतमंद लोकांना भोजन नक्की द्या.

पितृ पक्ष मध्ये संयम व सादगीचे पालन करा. ह्यामध्ये भारी शृंगार, नवीन वस्त्र व आभूषण घालण्या पासून दूर रहा म्हणजेच आपली परंपरा बदलू नका.

पितृ पक्ष व श्रृंगारशी जोडले गेलेले नियम:
* सादगीचे महत्व: पितृ पक्ष मध्ये 16 दिवस पूर्वजांची स्मृति व शांतीसाठी समर्पित आहे. ह्या काळात उत्सव किंवा उल्लासचा माहौल ठेवण्याच्या आयवजी शांत व साधे जीवन ठेवावे.

*सौभाग्यवती महिलासाठी: विवाहित महिला आपल्या नेहमीच्या सारखी सामान्य रूपात राहू शकतात. पण भारी मेकअप, फॅन्सिसाडी किंवा फॅन्सि कपडे, नवीन दागिने किंवा नटून सजून बाहेर जावू नये. * केस किंवा नख कापू नयेत: परिवारात श्राद्ध किंवा तर्पण करणाऱ्या लोकांनी 16 दिवस केस कापू नये किंवा नख कापू नये.

आता आपण पाहू या पितृ पक्ष मध्ये जन्मदिवस साजरा करायचा का?
हिंदू धर्मामध्ये पितृ पक्ष एक अत्यंत पवित्र व महत्व पूर्ण काळ मानला जातो. हा काळ 15 दिवस चालतो. ह्या काळात लोक आपल्या पितरांच्या शांती व मोक्षसाठी श्राद्ध, तर्पण व पिंडदानचे कर्म करतात. ह्या काळात आपले पूर्वज धर्तीवर येतात व आपल्या वंशजांचा आशीर्वाद घेतात. म्हणूनच ह्या काळात लोक शोक व श्रद्धाचा काळ मानतात.

पितृ पक्ष मध्ये कोणते सुद्धा शुभ कार्य केले जात नाही?
धार्मिक मान्यता अनुसार पितृ पक्ष काळात कोणते सुद्धा शुभ किंवा मंगल कार्य जसेकी लग्न, नवीन घर घेणे, सोने-चांदी खरेदी, कोणता सुद्धा मोठा उत्सव वर्जित मानला जातो. कारणकी ह्या काळात आपल्या पितरांचे स्मरण केले जाते व त्यांना तृप्त केले जाते.

Pitru Paksha 2026
Pitru Paksha 2026: Should You Worship, Dress Up & Celebrate Birthdays?

शास्त्रा नुसार जन्मदिवस साजरा करावा का?
नेहमी लोकांना प्रश्न पडतो की पितृ पक्ष मध्ये जन्म दिवस आला तर तो साजरा करणे उचित आहे का? ह्या विषयी शास्त्र जन्म दिवस साजरा करणे निषेध करीत नाही. पण काही विद्वान लोक म्हणतात की, पितृ पक्ष मध्ये जन्म दिवस आला तर शुभ संकेत आहेत. कारणकी ह्या काळात पितृ धर्तीवर उपस्थित राहतात, ते आपल्या वंशजाना हसते खेळते पाहून प्रसन्न होतात. पितृ पक्ष ला लोक केवळ दुखी वेळ मानतात. पण खर म्हणजे पूर्वजांची कृपा व आशीर्वाद मिळण्याची चांगली वेळ आहे. ह्या काळात जन्म दिवस साजरा करताना सादगी व शांततेत साजरा केला जातो. खूप धूम धडाक्यात केला जात नाही.

जन्म दिवसच्या दिवशी सकाळी मंदिरात जाऊन देवी देवतांचा व आपल्या कुलदेविचा पूजा पाठ करून आशीर्वाद घ्या, पितरांचा नाव घेऊन एक दिवा लाऊन प्रार्थना करा.

दान-पुण्य करा: ह्या दिवशी जरूरतमंद लोकांना अन्न, वस्त्र व धन दान करा. त्यामुळे पुण्य मिळते व पितरांचा आत्मा तृप्त होतो.

सात्विक भोजन करा: जन्म दिवस वर मांसाहारी जेवण किंवा दारू पिवू नका सात्विक भोजन सेवन करा.

वृक्ष रोपण करा: जन्म दिवस आठवणीत ठेवायचा आहे तर ह्या दिवशी वृक्ष रोपण करणे शुभ मानले जाते. हा भविष्य पिढ्यांसाठी एक सकारात्मक संदेश आहे.

पितृ पक्ष मध्ये जन्म दिवस हा अशुभ संकेत नाही. उलट पूर्वजांची सूक्ष्म उपस्थितीचे प्रतीक आहे. पण जन्म दिवस सध्या पद्धतीने व धार्मिक मर्यादाच्या पद्धतीने साजरा करा. पूजा पाठ, दान पुण्य व पितरांचे स्मरण केले पाहिजे जन्म दिवस फक्त आनंद देत नाहीतर पितरांचा व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.