Avidhava Navami 2026: Shraddha for Mother & Married Women | Date, Muhurat, Rituals & Significance

Avidhava Navami 2026: Mother & Married Women’s Shraddha
Avidhava Navami 2026: Mother & Married Women’s Shraddha | Date, Muhurat & Complete Rituals

Avidhava Navami 2026: Shraddha for Mother & Married Women | Date, Muhurat, Rituals & Significance

अविधवा नवमी 2026 आई व सौभाग्यवती महिला श्राद्ध संपूर्ण माहिती

मातृ नवमी म्हणजेच अविधवा नवमी 4 ऑक्टोबर 2026 रविवार ह्या दिवशी आहे मातृ नवमी पितृ पक्ष मध्ये नवमी ह्या दिवशी आहे व ही नवमी मातानसाठी आहे. माता व ताई किंवा परिवारातील ज्या स्त्रियाचे देहांत पति असताना झाले आहे.

नवमी तिथी: 4 ऑक्टोबर 2026, रविवार
नवमी तिथि: 4 ऑक्टोबर सकाळी 5:53 मिनिट पासून 5 ऑक्टोबर सकाळी 3:55 मिनिट पर्यंत आहे.
कुतुप मुहूर्त: सकाळी 11:46 ते दुपारी 12:33
रौहिण मुहूर्त: दुपारी 12:33 ते दुपारी 1:20
अपराह्न: दुपारी 1:20 ते 3:42

मातृ नवमी म्हणजेच अविधवा नवमी कोणाचे स्मरण होते:
प्रतेक तिथीला जसे श्राद्ध केलेजाते तशीच नवमी तिथी आहे ज्यांचे देहांत नवमी तिथीला झाले आहे त्यांची सुद्धा तिथी केली जाते. पण ह्या तिथीचा दूसरा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे ही तिथी कुळाच्या मातानचा दिवस आहे. जेव्हा माता किंवा ताई ह्यांचे देहांत ज्या तिथीला झाले व तिथी माहीत नाही किंवा लक्षात नाही त्यांची तिथी

अमावस्याच्या आयवजी नवमी ह्या दिवशी करतात.
अविधवा नवमी ह्या दिवशी ज्या विधवा नाहीत व त्यांचे देहांत झाले, म्हणजेच ज्या सौभाग्यवती अवस्था मध्ये म्हणजेच ज्यांचे पती जीवंत आहेत त्या महिलांना ह्या दिवशी विशेष रूपात आठवण करून श्राद्ध केले जाते. ह्या दिवशी सौभाग्यवती महिला ला बोलवून तिला व ब्राह्मनाना भोजन दिले जाते. विवाहित महिलेला 16 शृंगार वस्तु दिल्या जातात. त्यामुळे पितर खुश होऊन सुखी जीवनाचा आशीर्वाद देतात.

अविधवा नवमी परंपरा:
नवमी ह्या दिवशी तर्पण, पिंड व पितरांचे भोजन, त्याच बरोबर काही परंपरा आहे.
ज्या स्त्रीचे श्राद्ध करायचे आहे तिच्या नावावर एक विवाहित महिलेला भोजनसाठी बोलावले जाते. तिला सुहागनच्या वस्तु दिल्या जातात. जसे की साडी, बांगड्या, सिंदूर व वस्त्र त्याच बरोबर दक्षिणा सुद्धा दिली जाते.
बऱ्याच घरात घरातील सून भोजन बनवण्याची प्रमुख भूमिका निभावते. कारण की, घरात दिवंगत स्त्री चे स्थान आता तीचेच आहे.
दिवा लाऊन तुळशीचे पान अर्पण केले जाते.

अविधवा नवमी श्राद्ध कसे करावे:
सकाळी लवकर उठून स्नान करावे मग बिना कांदा-लसूण भोजन बनवा. कुतुप मुहूर्तवर सकाळी 11:46 मिनिट पासून दक्षिण दिशेला मुख करून जल, काळे तीळ व कुशाचे तर्पण द्या. माता किंवा ताईचे नाव व गोत्र बोलून मग पिंड व भोजन अर्पित करा. अतिथिना भोजन देण्याच्या अगोदर गाय, कुत्रे, व कावळा हयना भोजन द्या, दुपारी अपराहन समाप्त होण्याच्या अगोदर सर्व कर्म पूर्ण करा.
समजा मातृ नवमी श्राद्ध नवमीच्या दिवशी चुकून करायचे राहिले तर 10 ऑक्टोबर 2026 शनिवार सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी करावे.

अनुष्ठान म्हणजेच परंपरा:
नवमी हा दिवस कोमलता व सावधानीने केला जातो. अपराहन मध्ये केलेले श्राद्ध अनुष्ठानच्या रूपात केले जाते.
तर्पण व पिंडदान: दिवंगता सुहागिन स्त्री साठी जल (तर्पण) किंवा भाताचे पिंड (पिंडदान) केले जाते. म्हणजेच श्राद्ध सारखे केले जाते.
अपराह्न च्या वेळेचे पालन: हे अनुष्ठान अपराह्न मध्ये, म्हणजेच अपराह्न किंवा कुतुप ह्या वेळेत केले जाते.
सुवासिनीचा सम्मान: अनुष्ठान मध्ये सुवासिन म्हणजेच सुहागण स्त्रीला भोजन सन्मानाने दिले जाते.
सौभाग्य ची वस्तु अर्पित करतात: ज्या सुहागन स्त्रीला बोलवणार त्या स्त्री ला सौभाग्यच्या वस्तु म्हणजेच कुंकू, बांगड्या अर्पित करून सन्मान द्या.
भाव श्रद्धामय ठेवा: हा दिवस स्मरण दिन म्हणून शांत ठेवा. उत्सव नाहीतर योग्य वेळ विधी पूर्वक पूर्ण करा.

अविधवा नवमी श्राद्ध कोणी करावे व कोण करू शकत नाही?
अविधवा नवमी पितृ पक्षमध्ये केली जाणारी एक विशेष तिथी मानली जाते. जी विवाहित महिलांचे श्राद्ध केले जाते ज्यांचे निधन पतीच्या निधनाच्या अगोदर होते. जी मृतुच्या वेळी विधवा नसते.

Avidhava Navami 2026: Mother & Married Women’s Shraddha
Avidhava Navami 2026: Mother & Married Women’s Shraddha | Date, Muhurat & Complete Rituals

अविधवा नवमी म्हणजे काय?
* अविधवा नवमी म्हणजे पितृ पक्ष मधील येणारी नवमी तिथी त्या दिवशी श्राद्ध केले जाते.
* अविधवा नवमी ही तिथी विवाहित महिलांसाठी असते ज्यांचे निधन पतीच्या अगोदर झालेले असते.
* अविधवा नवमी च्या दिवशी विवाहित मृत महिलांचे श्राद्ध करून त्यांची आठवण करून त्याचे श्राद्ध केले जाते.

श्राद्ध का करावे?
पितृ पक्ष मध्ये नवमी ह्या तिथीला विवाहित मृत महिलांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्माला शांती मिळते.
ह्या दिवशी श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात व परिवाराला सुख समृद्धी जीवनाचे आशीर्वाद देतात.

कोणी हे श्राद्ध करावे व कोणी करू नये?
कोण करू शकते?
ज्या महिलाचे निधन झाले आहे व त्यांचा मुलगा जीवंत आहे त्या मुलाने हे श्राद्ध करावे. जर सख्या आईचे निधन झाले आहे व सावत्र आई आहे तरी सुद्धा मुलाने हे श्राद्ध करावे.

कोणी हे श्राद्ध करू शकत नाही?
* जर मृत महिलाचे पती जीवंत आहेत त्या महिलाचे अविधवा नवमी ह्या दिवशी श्राद्ध करीत नाहीत.
* जर मृत महिलेला मुलगा नाही किंवा मुलाचे सुद्धा निधन झाले आहे तर त्या मुलाची मुले अविधवा नवमी श्राद्ध करू शकत नाही.
* जर मृत महिलाला मुलगा नाही, तर अविधवा नवमी ह्या दिवशी तिची मुलगी किंवा जावई हे श्राद्ध करू शकत नाही.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.