ज्येष्ठ गौरी आवाहन 2026 तिथी, शुभ मुहूर्त व पूजा साहित्य व पूजा विधी
Jyeshtha Gauri Avahan 2026 | September 17 Date, Shubh Muhurat, Puja Samagri & Puja Vidhi | Gauri Ganpati
महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण म्हणजे ज्येष्ठ गौरी माता चे स्वागत श्री गणेश चतुर्थीच्या सणाच्या वेळी असते.
महाराष्ट्रात 17 सप्टेंबर 2026 गुरुवार ह्या दिवशी ज्येष्ठ गौरी प्रथम दिवस साजरा करतात. ह्या दिवशी ज्येष्ठ गौरी आवाहन करतात. हा दिवस श्री गणेश चतुर्थी नंतर तिसऱ्या दिवशी येतो. 17 सप्टेंबर 2026 ह्या दिवशी ज्येष्ठ गौरी आवाहन मुहूर्त आहे. भगवान गणेश ह्यांच्या सोबत ज्येष्ठ गौरी ची विशेष प्रतिमा स्थापित केली जाते. गौरी माता ही श्री गणेशजिना शोधत येत असते. हा क्षण घरात शुभता व समृद्धीचे प्रतीक आहे.
ज्येष्ठ गौरी आवाहन 2026 ह्यांची संपूर्ण माहिती:
ज्येष्ठ गौरी आवाहन महाराष्ट्रातील एक विशेष परंपरा आहे. हा दिवास 10 दिवसांच्या गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी येतो. म्हणजेच 17 सप्टेंबर गुरुवार ह्या दिवशी आहे. ज्येष्ठ गौरी आवाहन सूर्यास्त पासून संध्याकाळी 7 वाजून 52 मिनिट पर्यन्त आहे. 18 सप्टेंबर 2026 शुक्रवार ह्या दिवशी ज्येष्ठ गौरी पूजा आहे. 19 सप्टेंबर शनिवार ह्या दिवशी ज्येष्ठ गौरी विसर्जन आहे.
गणेश प्रतिमा म्हणजेच मूर्ती बरोबर 2 गौरी माताच्या प्रतिमा आणल्या जातात. ह्या दिवशी विशेष स्वागत करून आणतात तेव्हा शेजातील लोक किंवा मैत्रिणी ना सुद्धा बोलावले जाते. मग हळद-कुंकू समारोह केले जाते. हा क्षण म्हणजे परिवारातील एकता दर्शवतो.
ज्येष्ठ गौरी आवाहन आध्यात्मिक महत्व:
ज्येष्ठ गौरी जेव्हा श्री गणेश ह्यांना शोधत येते तेव्हा तिचे आगमन शुभताचा संदेश देते. ती येताना समृद्धी व कल्याणचे वरदान आणते. विवाहित महिला विशेष रूपात भाग घेतात व आपल्या सुखी विवाहित जीवन जावे म्हणून प्रार्थना करते. गणेश गौरी ह्यांची मिलन मातृ भक्तिचे प्रतीक आहे. ही पूजा गणेश चतुर्थी उत्सव चे अभिन्न अंग आहे. महाराष्ट्रामध्ये खोल आस्था आहे. गौरी माताला माहेरी आगमनाच्या समान सन्मान दिला जातो. ही परंपरा पिढीजात चालत येते.
ज्येष्ठ गौरी आवाहन पूजाविधी:
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. मग श्री गणेश मूर्तीच्या जवळ स्वच्छ जागा करून तेथे लाल रंगाचे कापड घाला. दोन ज्येष्ठ गौरी प्रतिमा ठेवा. उत्तर किंवा पूर्व दिशेला त्याचे मुख आले पाहिजे. त्याच्या जवळ एक कलश स्थापना करा.
आवाहन पूजाविधी:
आवाहन चरण पूजा करताना प्रथम श्री गणेश पूजन नी प्रारंभ करा, मोदक अर्पित करा. गौरी माताच्या स्वागतासाठी आरती करा. षोडशोपचार पूजा करा, मग चंदन तिलक लावावा. हळद-कुंकू लावून समारोह करा. तेथे येणाऱ्या सर्व महिलांना तिलक लावावा. फळ, मिठाई, पान सुपारी भोग ठेवावा.
ज्येष्ठ गौरी आवश्यक पूजा साहित्य:
गौरी प्रतिमा: 2 मिट्टी किंवा 2 चांदीच्या छोट्या मूर्ती
पूजा वस्त्र: लाल, हिरवा किंवा पिवळा कपडा
श्रृंगार: हळद-कुंकू, बिंदी, चंदन
भोग: 21 मोदक, फल, नारळ
आरती कापुर, अगरबत्ती, तूप व दिवा
हळद-कुंकू समारोहचे विशेष महत्व:
हळद-कुंकू विवाहित महिलाचे सुहागचे प्रतीक आहे. आपल्या शेजारी पाजारी राहणाऱ्या लोकांना म्हणजे महिलांना आमंत्रण द्या त्याच्या गौरी माताच्या समोर बसण्यासाठी आसन द्या. मग त्यांना तिलक लावून आरती करून थाळी मध्ये पान, सुपारी व फळ द्या. हा समारोह सामाजिक एकता वाढवण्यास मदत करते. त्यामुळे महिलांमध्ये प्रेम वाढते. त्याच बरोबर गौरी माताचा आशीर्वाद प्राप्त होतो. प्रतेक महिलेला सौभाग्यवती भव ह्याची कामना केली जाते.

ज्येष्ठ गौरी पूजा दैनिक क्रम:
18 सप्टेंबर 2026 मुख्य गौरी माता पूजा: सकाळी विशेष स्नान, गौरी माताला सोळा श्रृंगार करा. लाल रंगाची जरीची साडी नेसवा, बांगड्या, बिंदी, काजळ, लावा, दूर्वा व लाल गुलाब अर्पित करा. पंचामृत भोग ठेवा.
19 सप्टेंबर 2026 शनीवार विसर्जन: भावपूर्ण विदाई पूजा, कृतज्ञता प्रकट करा, गणपति बप्पा मोरया च्या बरोबर माता गौरीला विदा करा. (सकाळी 7 वाजल्या पासून दुपारी 3:`15 मिनिट पर्यन्त) विदा करा) माती आपल्या घरातील किंवा जवळ पास मधील झाडांना घाला.
ज्येष्ठ गौरीचे पारिवारिक महत्व:
ज्येष्ठ गौरी परिवार मध्ये मंगळकारी मानले जाते. त्यांचे आगमन घरात सुख-शांती आणते. संतान सुखची कामना पूर्ण होते. विवाहित जीवनात मधुरता आणते. गणेश माताचे पुनर मिलन पुत्रि प्रेमचे प्रतीक आहे.
महाराष्ट्रामध्ये गृहस्त परिवार ही परंपरा जीवंत ठेवतात. ह्यासाठी शेजारी राहणाऱ्या लोकांचा विशेष सहयोग राहतो. हा एक सामूहिक उत्सव आहे.
ज्येष्ठ गौरी आवाहनचे लाभ:
विवाहित सुखाची प्राप्ती मिळते. परिवारीक समृद्धी येते. राजस्वला दोषचे निवारण होते. शुभ फळ प्राप्त होतात. माता गौरीचा आशीर्वाद राहतो. सामाजिक बंधन मजबूत होतात.
