Pithori Amavasya 2026: September 10 or 11? | Vrat Vidhi, 64 Yogini Puja, Bail Pola & 5 Powerful Remedies

Pithori Amavasya 2026
Pithori Amavasya 2026 Date: Sept 10 or 11? Complete Puja Vidhi & 5 Powerful Remedies

Pithori Amavasya 2026: September 10 or 11? | Vrat Vidhi, 64 Yogini Puja, Bail Pola & 5 Powerful Remedies

पिठोरी अमावस्या 2026: तिथि, व्रत विधि, बैल पोळा, कुशोत्पाटिनी अमावस्या गाइड, 5 सटीक उपाय संपूर्ण माहिती

10 सप्टेंबर का 11 सप्टेंबर 2026 पिठोरी अमावस्या कधी आहे. ह्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. द्रिक पंचांग अनुसार, ह्या वर्षी कृष्ण पक्ष अमावस्या तिथी 10 सप्टेंबर सकाळी 10:33 मिनिट पासून सुरू होत असून 11 सप्टेंबर सकाळी 8:56 मिनिट पर्यन्त आहे म्हणून 10 सप्टेंबर 2026 गुरुवार ह्या दिवशी अमावस्या तिथी साजरी करायची आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या व्रत ठेवले जाते. पिठोरी अमावस्याला कुशाग्रहणी अमावस्या असे सुद्धा म्हणतात. हे व्रत आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्य, चांगले स्वास्थ, व सुखी जीवनासाठी प्रार्थना करून व्रत करतात. तसेच ह्या दिवशी स्नान, दान, पितरांना तर्पण व धार्मिक अनुष्ठान करण्याची परंपरा आहे. ह्या वर्षी पिठोरी अमावस्या 10 सप्टेंबर ला करायचे आहे.
पिठोरी अमावस्या 2026 तिथि व मुहूर्त: द्रिक पंचांग अनुसार, ह्या वर्षी अमावस्या तिथी 10 सप्टेंबर सकाळी 10:33 आसून सुरू होत असून 11 सप्टेंबर सकाळी 8:56 मिनिट पर्यन्त आहे. म्हणून पिठोरी अमावस्या 10 सप्टेंबर रोजी साजरी करायची आहे.

पिठोरी अमावस्याच्या दिवशी पूजेचा सर्वश्रेष्ठ मुहू्र्त सकाळी 6:07 सुरू होत असून सकाळी 09:18 पर्यंत आहे. तर पितरांच्या तर्पण व पिंडदानसाठी दुपारी 11:45 मिनिट पासून दुपारी 01:30 पर्यन्त शुभ वेळ आहे.

64 देवीची पूजा विधी:
पिठोरी अमावस्याला सर्वात खास परंपरामध्ये 64 योगिनींची पूजा केली जाते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी देवी शक्तिचे 64 विभिन्न स्वरूपांची पूजा कशी करायची आहे त्याची विधी पुढे दिली आहे. खर महणजे पिठोरी शब्द गव्हाचे पीठ पासून बनवलेल्या देवीचे प्रतकात्मक आकृति बनवून पूजा केली जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी पिठा पासून दिवेच्या आकृति बनवून त्याची विधी पूर्वक पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येऊन सौभाग्य बनून राहते.

लोक मान्यता अनुसार पिठोरी अमावस्याच्या दिवशी 64 योगिनीना ब्रह्मांडची रक्षा शक्ति मानले गेले आहे. अश्या वेळी त्यांची पूजा कल्यास आपल्या संतान येणारि संकट व अकाल मृत्यूचे भय टळून जाते. देवी आपल्या मुलांना सुरक्षा कवच प्रदान करते.

पिठोरी अमावस्या महत्व व परंपरा:
आपल्या संतानला दीर्घायुष्य: पिठोरी अमावस्याचे व्रत आई आपल्या मुलांसाठी त्यांचे चांगले आरोग्य, दीर्घायुष्य व सुखी जीवन कामनासाठी करतात.
64 योगिनी पूजा: ह्या दिवशी पिठा पासून माता दुर्गा, सप्त मातृका व 64 योगिनीची आकृति (पिंड) बनवून विधि-विधान पूर्वक पूजा केली जाते. ‘पिठोरी’ शब्द ‘पिष्टक’ (आटा) पासून बनवतात.

पितृ तर्पण व दान:
अमावस्या तिथि ला स्नान, दान, पिंडदान व पितरांना तर्पण दिल्याने विशेष पुण्य प्राप्ति होते व पितृ दोष शांत होतो.
कॅलेंडरमध्ये म्हणजे काही कॅलेंडर मध्ये 10 सप्टेंबर व 11 सप्टेंबर अमावस्या असे आहे:

पंचांग मध्ये अशी कोणती सुद्धा चूक नाही. असे लिहिले आहे कारणकी तिथी नुसार ये. अमावस्या 10 सप्टेंबर सकाळी सुरू होत असून 11 तारखेला सूर्योदय झाला की लगेच समाप्त होत आहे.

संध्याकाळी केले जाणारे अनुष्ठान:
पिठोरी व्रत पूजा, बैल पोळा व पिंपळाच्या वृक्षा खाली मोहरीच्या तेलाचा दिवा 10 सप्टेंबर ला लावावा कारणकी ह्या दिवशी संध्याकाळी अमावस्या आहे.

दुपारी केलेजाणारे अनुष्ठान:
अमावस्या श्राद्ध, तर्पण व पिंडदान 10 सप्टेंबरला केले जाणार, कारणकी 11 तारखेला अपराहण काळ तिथी समाप्त होत आहे.

सूर्योदयशी जोडले गेलेले अनुष्ठान:
पवित्र स्नान, दान व कुश घास कापणे 11 सप्टेंबर होणार आहे. जर आपले परिवार एक दिवसाच्या प्रथाचे पालन करतात तर 10 सप्टेंबर एक सुरक्षित विकल्प आहे. कारणकी, ह्या दिवशी दुपार व संध्याकाळ दोन्ही वेळेस करू शकता.

Pithori Amavasya 2026
Pithori Amavasya 2026 Date: Sept 10 or 11? Complete Puja Vidhi & 5 Powerful Remedies

पिठोरी अमावस्या व्रत विधि (चरण-दर-चरण):
सकाळचे स्नान व संकल्प: सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्नान करताना पाण्यात थोडेसे गंगाजल घालावे. पूर्व दिशेला तोंड करून आपल्या मुलांचे नाव घेऊन त्यांच्या दीर्घायुष्य व स्वास्थसाठी प्रार्थना करून व्रत संकल्प करावा.

देवघर साफ करावे:
फरशी साफ करून स्वस्तिक काढा व लाल रंगाचे कापड एका लाकडी चौकी वरती घाला.

पिठाच्या मूर्ती बनवा:
गव्हाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ मळून त्याचे 64 छोट्या आकाराच्या मूर्ती बनवा काही परिवारात मूर्ती बनवण्याच्या आयवजी 64 छोटे गोळे बनवून एका प्लेटमध्ये ठेवून चौरंगावर व्यवस्थित ठेवावे.

कलश स्थापना:
एक तांब्याचा कलश पाणी भरून घ्या, मग त्यामध्ये अक्षता, एक कॉईन व एक हळकुंड घालून योगिनीच्या जवळ ठेवावे.

षोडशोपचार पूजा:
चंदन, रोली, अक्षता, फूल, धूप व तुपाचा दिवा ठेवावा. कलशच्या चारही बाजूला मौली बांधावी.

नेवेद्य (भोग) :
पुरी, खीर किंवा हलवा व आपल्या मुलांना आवडणारी भाजी बनवावी मग नेवेद्य दाखवून त्याच्या बरोबर पंचमेवा ठेवावा.
कथा वाचा व आरती करा: पिठोरी अमावस्या कथा मोठ्यांदा वाचा, मग भीमसेनी कपूर लाऊन आरती करा.

मुलांचा आशीर्वाद:
पारंपारिक रिवाजा नुसार आई मुलांच्या डोक्यावर प्रसादाची थाली ठेवते मग विचारते :आथिति कोण” माझ्या मागे कोण आहे. व मुलांच्या हातून प्रसाद प्राप्त करते असे छोटेसे आदान-प्रदान खूप हृदय पूर्ण आहे.
संध्याकाळी पूजा करून मगच व्रत सोडावे.

पिठोरी अमावस्या व्रत नियम:
आई मुलांच्यासाठी प्रार्थना करतात व विवाहित महिला व्रत करून निर्जल व फलाहार करून करतात. तसेच दूध, साबुदाणा, शिंगाडाचे पीठ खाऊ नये, जेवणात कांदा, लसूण, मांसाहारी, शराब घेवू नये तसेच नख कापू नये.
पारण: संध्याकाळी पूजा करून मुलांसाठी आशीर्वाद नंतर 10 सप्टेंबर रोजी कोणी महिला अवस्थ किंवा गर्भवती आहे तर त्यांनी फक्त व्रत संकल्प करून पूजा करावी व साधे जेवण करून व्रत सोडावे.

कुशोत्पाटिनी अमावस्या: कुश कापण्याचा एक दिवस:
कुश (दर्भ) घास श्राद्ध, तर्पण, हवन व लगभग प्रतेक संस्कार साठी आवश्यक आहे. परंपरा अनुसार, ह्या अमावस्या ला एकत्रित कुश संपूर्ण वर्षासाठी धार्मिक रूपनी शुद्ध असते. कुश कापताना चाकू किंवा कोणते सुद्धा शस्त्र वापरू नये हातानी ओढून काढावे. ॐ हूं फट ह्या मंत्राचा जाप करावा.

बैल पोळा: महाराष्ट्रत बैलांना धन्यवाद देतात:
महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगढ़ व तेलंगाना काही भागात ही अमावस्या शेतकरी बैलांसाठी करतात. त्याची दोरी काढतात व नदी वरती नेऊन त्यांना स्नान घालतात, मग त्यांची शिंग रंगांनी रंगवतात त्यांच्या गळ्यात माळ घालतात पायात घुंगरू बांधतात, पाठीवर शाल घालतात, मग संपूर्ण दिवस त्यांना काम देत नाहीत, तसेच गावात त्यांची मिरवणूक काढून देवला पर्यन्त नेतात त्यांची पूजा करून आरती करतात, मग घरी आल्यावर पहिल्यांदा आपल्या बैलांना जेवण म्हणजेच पुराण पोळी देतात मग नंतर घरातील लोक जेवण करतात.

अमावस्याला पितृ तर्पण:
प्रतेक अमावस्या ही पितरांसाठी असते. पण ह्या अमावस्याला विशेष महत्व आहे. काही परिवार ह्या अमावस्याला पितृ दोष निवारण ह्या रूपात मानतात.

सूर्योदयच्या अगोदर स्नान करून पाण्यात काळे तीळ घालून सूर्य देवाला अर्ध्य द्या.
अपराह्न काळात तर्पण द्या, दक्षिण दिशेला मुख करून जानव उजव्या खांद्यावर घाला, तीळ व कुश मिश्रित करून जल आपल्या पूर्वजांचे नाव घेऊन अर्पित करा.
दान करा:
भोजन, वस्त्र, काळे तीळ, ब्राह्मण किंवा गाईला भोजन द्या.
संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व आपल्या पूर्वजांचे नाव घेत 7 परिक्रमा करा. ही अमावस्या काल सर्प दोष निवारण व शनि देव पूजा साठी प्रभावी मानली जाते.

संकट दूरकरण्यासाठी 5 अचूक उपाय:
पिंपळाच्या वृक्षची पूजा व दीपदान:
पिठोरी अमावस्याच्या संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षा खाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व 7 परिक्रमा घाला असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते व परिवारातील आलेले संकट टळले जाते.

पितृ तर्पण व दान:
सकाळी स्नान झाल्यावर पाण्यात काळे तीळ मिक्स करून दक्षिण दिशेला मुख करून पितरांना तर्पण द्या, मग गरीब जरूरत मंद लोकाना अन्न, वस्त्र, तीळ व गूळ दान करा.

आटाच्या गोळयानी मत्स्य सेवा:
गव्हाच्या पिठात थोडा गूळ मिक्स करून त्याच्या गोळ्या बनवा व तालाब मधील मासा ना खाऊ घाला, असे केल्याने आपले अडकलेले पैसे म्हणजेच धन परत येऊन कर्ज मुक्ती होते.

मुंग्या व पक्षी ह्यांना भोजन:
ह्या दिवशी पिठात साखर मिक्स करून मुंग्यांना किंवा पक्षांना द्या, असे केल्याने कुंडली मधील ग्रह दोष व मानसिक शांती मिळते.

कालसर्प व ग्रह दोष निवारण हेतु शिव पूजा:
भगवान शिव ना कच्चे दूध व पाणी मिक्स करून अभिषेक करा, शिवलिंग वर काले तीळ अर्पित करा, व ‘ॐ नमः शिवाय’ मंत्र जाप करा. हा उपाय काल सर्प दोष व जीवनात येणारे मोठे संकट दूर करण्यासाठी अत्यंत कारगर आहे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.